भारतातील अतिप्राचीन अशा तिरुपती बालाजी मंदिराला "सात टेकड्यांचे मंदिर" असे देखील म्हटले जाते. या मंदिरात भगवान विष्णू, ज्यांना दक्षिणेत श्रीनिवास किंवा बालाजी किंवा वेंकटाचालपैथी म्हटले जाते, त्यांची आराधना केली जाते. या मंदिराच्या बाबतीत अनेक दंतकथा आणि रहस्यकथा प्रचलित आहेत. आता माहिती करून घेऊया या मंदिराशी संबंधित अशाच काही रहस्यमय गोष्टी -
तिरुपती मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात जाण्याची परवानगी केवळ काही लोकांनाच आहे. मंदिरपासून साधारण २३ किलोमीटर अंतरावर एक गाव आहे. केवळ या गावातील निवासीच मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करू शकतात. तसेच याच गावातून देवासाठी फुले, फळे, प्रसाद इत्यादी येते.
मूर्तीच्या मागील भाग कायम दमट असतो. जर इथे अतिशय लक्षपूर्वक कान देऊन ऐकले तर समुद्राच्या लाटांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो.
मूर्तीला वेळोवेळी स्नान आणि चंदन लेप लावून देखील भगवान वेंकटेश्वरांच्या मूर्तीचे तापमान सदैव ११० फेरेनहाईट असते. एवढेच नव्हे, तर या मूर्तीला घाम देखील येतो. पुजारी थोड्या थोड्या वेळाने हा घाम पुसत असतात.
देवाच्या मूर्तीवर अर्पण केलेली फुले, तुलसीपत्रे ही भक्तांमध्ये न वाटता मागील बाजूस असलेल्या विहिरीत फेकून दिली जातात, एवढेच नाही तर या फुलांना आणि तुलसीपत्राना पुन्हा वळूनही बघायचे नसते.
स्वामी वेंकटेश्वर भगवंतांच्या मूर्तीवर पचाई कापूर अर्पण करण्यात येतो. हा कपूर जर सामान्य दगडावर ठेवला तर ताबडतोब विरघळतो, पण मूर्तीवर मात्र त्याचा असा कोणताही परिणाम होत नाही.
मंदिरात भगवान वेंकटेश यांच्या मूर्तीवर उगवलेले केस खरे आहेत. असे म्हटले जाते की हे केस अगदी मुलायम आहेत आणि कधीही गुरफटत किंवा गळत नाहीत.