धर्म ग्रंथांनुसार विश्वामित्र जन्माने क्षत्रिय होते, परंतु त्यांच्या घोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन ब्रम्हदेवाने त्यांना ब्रम्हर्षी पदवी दिली होती. आपला यज्ञ पूर्ण करण्यासाठी विश्वामित्र श्रीराम आणि लक्ष्मण यांना आपल्यासोबत वनात घेऊन गेले होते, जिथे त्यांनी रामाला अनेक अद्भुत आणि दिव्य अस्त्रांचे शिक्षण दिले. रामचरितमानस नुसार श्रीरामाला सीतेच्या स्वयंवराला महर्षी विश्वामित्रच घेऊन आले होते.
म्हणून नंतर ब्रम्हर्षी बनले विश्वामित्र
राजा गाधी विश्वामित्रांचे वडील होते. राजा गाधि च्या कन्येचा विवाह महर्षी भृगु यांचा पुत्र ऋचिक याच्याशी झाला होता. विवाहानंतर सत्यवतीने आपले सासरे महर्षी भृगु यांच्याकडून स्वतःसाठी आणि आपल्या मातेसाठी पुत्र प्राप्तीचे वरदान मागितले. तव्हा महर्षी भृगु यांनी तिला २ फळे दिली आणि सांगितले की ऋतू स्नानानंतर तू गूलर च्या झाडाला आणि तुझ्या आईने पिंपळाच्या झाडाला आलिंगन द्यायचे आणि मग हे फळ खायचे. परंतु सत्यवती आणि तिच्या आईने या कामात चूक केली आणि चुकीच्या झाडांना आलिंगन देऊन फळ खाल्ले. जेव्हा ही गोष्ट महर्षी भृगुना समजली तेव्हा त्यांनी सत्यवतीला सांगितले की तुम्ही चुकीच्या झाडाला आलिंगन दिले आहे. म्हणूनच तुझा पुत्र ब्राम्हण असूनही क्षत्रिय गुणांचा होईल आणि तुझ्या मातेचा पुत्र क्षत्रिय असून देखील ब्राम्हणासारखे वर्तन करेल. हेच कारण होते की परशुराम ब्राम्हण असून देखील क्षत्रिय गुणांचे होते आणि विश्वामित्र क्षत्रिय असून देखील त्यांनी ब्रम्हर्षी पद प्राप्त केले.