भगवान शंकरांनी एकदा पार्वतीला कथा सांगताना म्हटले की गणांत सर्वांत प्रिय गण घंटा नावाचा गण आहे. देवतांच्या संगीत सभागृहात स्वेच्छेने सामील होण्यासाठी चतुर गन्धर्वांतील श्रेष्ठ चित्रसेनाला भेटले आणि सभेत समाविष्ट होण्याचा उपाय विचारला. उपाय सांगण्यापूर्वी चित्रसेनाने गणाची परीक्षा घेतली आणि त्याला संगीत ऐकवायला सांगितले. गणाकडून संगीत ऐकल्यावर चित्रसेन प्रसन्न झाले आणि गणाला सभेत जाण्याची आज्ञा दिली. थोड्या वेळाने तिथे भगवान शंकरांचा द्वारपाल आला आणि गणाला म्हटले की भगवान शंकरांना सोडून तू इथे बसला आहेस? तुला ब्रम्हदेवाच्या सभेत जाण्यायची अनुमती मिळणार नाही. एवढे ऐकून गण दूर जाऊन बसला.
अशाच प्रकारे विचार करण्यात एक वर्ष गेले परंतु ब्रम्हदेवाच्या सभेत काही जाणे झाले नाही. तितक्यात त्याने हातात वीणा घेतलेले नारद मुनी ब्रम्हदेवाच्या सभेकडे जात असल्याचे पहिले. त्यांना बघून गणाने सांगितले की तुम्ही ब्रम्हदेवाला माझ्या येण्याची सूचना द्या. हे ऐकून नारद मुनी म्हणाले की ब्राम्हदेवानी मला महत्त्वाच्या कामासाठी देवाचार्य बृहस्पती यांच्याकडे जाण्यास सांगितले आहे, मी तिकडे जाऊन येतो. असे म्हणून ते निघाले आणि त्यांनी भगवान शंकरांना सर्व वृत्तांत सांगितला. हे ऐकून शंकराला राग आला. त्यांनी गणाला शाप दिला की तू पृथ्वीवर जाऊन पडशील. शापाच्या प्रभावाने गण पृथ्वीवर देवदारु वनात येऊन पडला. भगवान शंकर म्हणाले की जो व्यक्ती आपला स्वामी सोडून दुसऱ्याची सेवा करेल तो असाच नरकात जाऊन पडेल. देवदारु वनात गणाला तप करणारे काही ऋषी भेटले. गणाने रडत त्यांना सांगितले की नारद मुनींनी मला धोका दिला आहे. आता मी दोन्ही स्थानांवरून निसटलो आहे.
गणाचा पशात्ताप पाहून शंकराने सांगितले की तू महाकाल वनात जा आणि रेवन्तेश्वर महादेवाच्या पश्चिमेला असलेल्या उत्तम शिवलिंगाचे दर्शन पूजन कर. हे लिंग तुला सुख समृद्धी देईल आणि भविष्यात हे शिवलिंग घंटेश्वर महादेव या नावाने ओळखले जाईल.
असे मानले जाते की जो कोणी मनुष्य या महादेवाचे दर्शन पूजन करतो त्याला संगीताच्या सर्व विद्यांचे ज्ञान मिळते.