अणुबॉंब आणि अणुशक्ति या जोडीने जाणार्या गोष्टी आहेत. भारताने या क्षेत्रात काय प्रगति केलेली आहे हे आता पाहू.भारताने ट्रॉंबे येथे पहिला research reactor बांधला त्याचे नाव होते अप्सरा. Reactor  मध्ये वर वर्णिलेली chain reaction ताब्यात ठेवणे हे प्रमुख काम असते. सुटे प्रोटॉन व ऊर्जा या दोन्हीवर नियंत्रण ठेवावयाचे असते. त्यानंतर भारत व कॅनडा यांच्या सहकार्य़ाने एक मोठा रिसर्च रिअॅक्टर तेथेच बांधला गेला. त्याला कॅनडा-इंडिया रिअॅक्टर असे म्हटले जात होते. या CIR Project मध्ये मी काही काळ काम केले. त्यामध्ये वापरण्यासाठी Fuel Rods, जे युरेनिअम ऑक्साइडचे असत, ते नंतर अमेरिकेकडून मिळत होते. त्यामुळे या रिअॅक्टरचे नाव नंतर CIRUS असे झाले. तरुण भारतीय इंजिनिअर व शास्त्रज्ञ यांची एक पलटणच या प्रकल्पावर काम करून तयार झाली. त्यानंतरहि कॅनडाने भारताला अणुक्षेत्रात अनेक प्रकारे सहाय्य केले व शास्त्रज्ञ तंत्रज्ञांना शिक्षण दिले. हा रिअॅक्टर नैसर्गिक युरेनिअमचे fuel rods वापरतो. (भारताकडे युरेनिअमचे प्रमाण वाढवण्याची - enrichment - क्षमता नाहीं.) CIR कार्यान्वित होण्या आधीच एक नवे प्रोजेक्ट ट्रॉम्बे येथे सुरू झाले. रिअॅक्टर काही काळ चालवला गेला कीं त्याच्या uranium fuel rods मधील U235 चे विघटन होते तसेच U238 च्या अणूंवर सुटे न्यूट्रॉन आदळून त्यांचे pu239 - pu240, उर्फ प्लुटोनिअम मध्ये रूपांतर होत असते. वापरलेले fuel rod  रिअॅक्टरधून बाहेर काढून त्याची पावडर करून त्यांतील प्लुटोनिअम मिळवण्याची तयारी भारताने लगेचच सुरू केली. Plutonium extraction plant बांधण्यास लगेच सुरवात झाली. त्याचे डिझाइन बव्हंशी भारतीय होते. Main plant building  च्या बांधकामाचे टेंडर काढण्यापासून बांधकामावर देखरेख करण्याचे काम मला मिळाले व दोन वर्षे या महत्वाच्या कामात माझा प्रत्यक्ष सहभाग होता. मात्र माझे काम फक्त बिल्डिंग बांधण्याचे होते. प्लुटोनियम मिळवण्याबद्दल मी पूर्णपणे अनभिज्ञ होतो!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel