भारताच्या अणुबॉंब बनवण्याच्या क्षेत्रातील प्रगतीबद्दल पुन्हा केव्हातरी खुलासेवार बोलूं. थोडक्यांत माहिती अशी कीं पोखरण येथील पहिला अणुस्फोट प्लुटोनिअम (नागासाकी प्रकार) वापरून केलेला होता. हा होईपर्यंत अमेरिका व इतर राष्ट्रे अंधारात होतीं. त्यानंतर भारतावर करडी नजर ठेवली जाऊं लागली व थोडेफार सहकार्य फक्त रशियाकडूनच मिळत राहिले. हळूहळू power reactors साठी fuel rods ची टंचाई भासूं लागली. दुसरा स्फोट झाला त्यात plutoneum bomb तसेच hydrogen bomb देखील होता असा भारताचा दावा होता. मात्र इतर देशांचे अभ्यासाअंती असे मत बनले कीं यांतील प्लुटोनिअम बॉंब पहिल्या स्फोटासारखाच पण थोडा मोठा होता पण hydrogen bomb चा स्फोट यशस्वी झालेला नव्हता. याबाबत मतभेद व वादंग आहे.

भारताने स्वत:हून प्रथम अणुबॉंब वापरणार नाहीं असे वेळोवेळी जाहीर केले आहे. मात्र पुन्हा टेस्ट करण्यावर बंधने स्वीकारलेलीं नाहींत. भारताकडे काही अणुबॉंब (प्लुटोनिअम आधारित) तयार असावे व अधिक लागल्यास ३-४ दिवसात जोडण्याची क्षमता आहे कारण भारताकडे weapons grade plutonium आहे असे जगातील अनेक जाणकारांचे मत आहे. भारताने गेल्या वर्षी केलेल्या अणुकरारान्वये Imported fuel rods पासून मिळणार्या प्लुटोनिअमच्या वापरावर काही बंधने मान्य केलीं आहेत म्हणजे त्याचा वापर बॉंब बनवण्यासाठी करतां येणार नाही. मात्र CIRUS, DHRUVA किंवा भविष्यातील नवीन research reactors मधील fuel rods वा त्यापासून मिळणार्या प्लुटोनिअमवर कोणतींहि बंधने स्वीकारलेलीं नाहींत. ही गोष्ट विचारात घेऊनच व राजकारण बाजूला ठेवून कराराबद्दल मत बनवावें हें माझ्यामते उचित ठरेल. आज दिलेली माहिती आपणाला उपयुक्त ठरेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel