पार्ल्यातल्या
गझाली रेस्टाॅरन्टजवळ 'परमार' नावाची इमारत आहे. या इमारतीत 'शाह'
आडनावाचा एक गृहस्थ राहतो. प्रचंड अध्यात्मिक मनुष्य. ज्योतीषशास्त्रावर या
गृहस्थाचा इतका विश्वास की याचं भविष्य सांगणा-याला त्याच्या भविष्य
सांगण्यावर नसेल. कुठल्याशा ज्योतिषाने या शाहला 'हत्ती' या प्राण्यापासून
दूर राहण्यास सांगितले. जमल्यास हत्ती पाहणंही टाळायला सांगितलं. मग काय?
जसं जमेल तसं हत्तीला टाळण्या़चा प्रयत्न हा गृहस्थ करत असतो.
आता
हेच पाहा ना... 'टाइम्स आॅफ इंडिया'च्या लोगोमध्ये दोन हत्तींचे चित्र
आहे. म्हणून या महाशयाने 'टाइम्स'चं नाव फाडून पेपर टाकण्याचे आदेश
पेपरवाल्याला देऊन ठेवलेत.
कमालच आहे बुवा एक-एकाची.
- नामदेव अंजना
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.