काही
निवडक उद्योजकांना त्यांच्या आर्थिक हव्यासापोटी संपूर्ण मानवजातीचं भविष्य
निश्चित करण्याचे अधिकार आपण का देतो आहोत? – लिओनार्डो
लिओनार्डोला
‘ऑस्कर’ मिळाला. खूप आनंद झाला. कारण अभिनयासह हा एक सजग माणूस आहे. त्याच्या
अभिनयाबद्दल फार बोलणार नाही. कारण 'टायटॅनिक' सोडला तर त्याचा कोणताच सिनेमा मी पाहिलेला नाही. पण तरीही त्याचा मोठा
फॅन आहे ते त्याच्या सिनेमाव्यतिरिक्त इतर कामामुळं.
लिओनार्डो
पर्यायवरणाबाबत प्रचंड जागरुक आहे. तो पर्यावरणवादी चळवळीत अॅक्टिव्हली काम करतो.
यूनोने कुठल्यातरी समितीवरही त्याची नेमणूक केलीय आणि
पर्यावरण क्षेत्रातील कुठलातरी महत्त्वाचा पुरस्कारही त्याच्या नावे आहे. मला आता
नाव आठवत नाही. क्रिस्टल की बिस्टल असं काहीतरी नाव आहे पुरस्काराचं. असो. तर
एकंदरीतच भारी माणूस आहे हा.
स्वीत्झर्लंडमध्ये
जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम पार पडलं ना, त्यात
लिओनार्डोचं एक भाषण झालं होतं. मीही या भाषणाच्या बातम्या वाचल्यात. कुठे
व्हिडीओ-ऑडिओ क्लिप मिळाली नाही. पण त्याच्या या भाषणाची जगभरातील प्रमुख
प्रसारमाध्यमांमध्ये प्रचंड चर्चा झाली होती.
या
फोरममधील भाषणातील लिओनार्डोचा एक प्रश्न मला प्रचंड प्रभावी वाटला. विशेष म्हणजे
जगातील अनेक देशांच्या महत्त्वाच्या नेत्यांसमोर तो म्हणाला- "काही निवडक
उद्योजकांना त्यांच्या आर्थिक हव्यासापोटी संपूर्ण मानवजातीचं भविष्य निश्चित
करण्याचे अधिकार आपण का देतो आहोत?"
लिओनार्डोचा हा सवाल खरंतर आपण नेहमीच विचारत असतो. पण उद्योगाला चालना देण्यासाठी जमलेल्या फोरममध्ये केलेल्या भाषणात असा सवाल करुन पर्यावरणाचं रक्षण करण्याचं आवाहन करणं, हे मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.