भरताचे दोन पुत्र होते - तार्क्ष आणि पुष्कर. लक्ष्मणाचे पुत्र - चित्रांगद आणि चंद्र्केतू तर शत्रुघ्नचे पुत्र सुबाहु आणि शूरसेन होते. मथुरेचे नाव आधी शूरसेन होते. लव आणि कुश राम आणि सीतेचे जुळे पुत्र होते. जेव्हा रामाने वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याचा निश्चय करून भरतचा राज्याभिषेक करण्याचे ठरवले तेव्हा भरत तयार झाला नाही. तेव्हा दक्षिण कोसल प्रदेश (छत्तीसगड) मध्ये कुश आणि उत्तर कोसल मध्ये लव यांचा अभिषेक करण्यात आला.
रामाच्या काळात देखील कोसल राज्य उत्तर आणि दक्षिण असे विभाजित होते. कालिदासाच्या रघुवंशानुसार रामाने आपला पुत्र लव याला शरावती आणि कुश याला कुशावती चे राज्य दिले होते. शरावती ला श्रावस्ती मानले तर निश्चितच लव चे राज्य उत्तर भारतात होते. आणि कुश चे राज्य दक्षिण कोसल मध्ये. कुश ची राजधानी कुशावती वर्तमानातील बिलासपुर मध्ये होती. कोसला ला रामाची माता कौसल्या हिचे जन्मस्थान मानले जाते. रघुवंशा नुसार कुशला अयोध्येला जाण्यासाठी विंध्याचल पार करावा लागत असे. यावरून देखील सिद्ध होते की त्याचे राज्य दक्षिण कोसल मध्ये होते.
राजा लव पासून राघव राजपुतांचा जन्म झाला. ज्यांच्यात बर्गुजर, जयास आणि सिकरवार यांचे वंश चालले. याची दुसरी शाखा होती सिसोदिया राजपूत वंश ज्यामध्ये बैछला (बैसला) आणि गैहलोत (गुहील) वंशाचे राजा झाले. कुश पासून कुशवाह (कच्छवाह) राजपुतांचा वंश चालला.
ऐतिहासिक तत्थ्यांनुसार लव ने लवपुरी नगराची स्थापना केली होती जे वर्तमानात पाकिस्तानातील लाहोर आहे. (येथील एका किल्ल्यात लवचे एक मंदिर देखील आहे.) लवपुरीला पुढे लोहपुरी म्हटले जाऊ लागले. दक्षिण - पूर्व आशियाई देश लाओस, थाई नगर लोबपुरी, दोन्ही त्याच्याच नावावर ठेवलेली स्थाने आहेत.
रामाच्या दोन्ही पुत्रात कुशचा वंश पुढे चालला. कुश पासून अतिथी आणि अतिथी पासून निषधन पासून नभ पासून पुंडरीक पासून क्षेमंधवा पासून देवानिक पासून अहिनक पासून रुरु पासून परीत्राय पासून दल पासून छल पासून उक्थ पासून वज्रनाभ पासून गण पासून व्युषिताश्व पासून विश्वसह पासून हिरण्यनाभ पासून पुष्य पासून धृवसंधी पासून सुदर्शन पासून अग्रीवर्ण पासून पद्मवर्ण पासून शीघ्र पासून मरु पासून प्रयुश्रुत पासून उदावसू पासून नंदिवर्धन पासून सकेतू पासून देवरात पासून बृहदुक्थ पासून महावीर्य पासून सुधृती पासून धृष्टकेतु पासून हर्याव पासून मरू पासून प्रतीन्धक पासून कुतीरथ पासून देवमिढ पासून विबुध पासून महाधृती पासून किर्तीरात पासून महारोमा पासून सुवर्णारोमा आणि
ह्रस्वरोमा पासून सीरध्वजचा जन्म झाला.
कुश वंशाचा राजा सीरध्वज याला सीता नावाची एक कन्या झाली. (सुर्यवंश यापुढे देखील वाढला ज्यामध्ये कृती नामक राजाचा पुत्र जनक झाला ज्याने योग मार्ग अवलंबिला होता.) कुश वंशापासूनच कुशवाह, मौर्य, सैनी, शाक्य संप्रदायाची स्थापना मानली जाते.
एका शोधानुसार लव आणि कुशच्या ५० व्या पिढीत शल्य जन्मले जे महाभारत युद्धात कौरवांकडून लढले होते. याची गणना केली तर लव आणि कुश हे महाभारत काळाच्या पूर्वी २५०० ते ३००० वर्षांपूर्वी होते म्हणजे आजपासून ६५०० ते ७००० वर्ष पूर्वी होऊन गेले.
या व्यतिरिक्त शल्य नंतर बहत्क्षय, ऊरुक्षय, बत्सद्रोह, प्रतिव्योम, दिवाकर, सहदेव, ध्रुवाश्च, भानुरथ, प्रतीताश्व, सुप्रतीप, मरुदेव, सुनक्षत्र, किन्नराश्रव, अन्तरिक्ष, सुषेण, सुमित्र, बृहद्रज, धर्म, कृतज्जय, व्रात, रणज्जय, संजय, शाक्य, शुद्धोधन, सिद्धार्थ, राहुल, प्रसेनजित, क्षुद्रक, कुलक, सुरथ, सुमित्र झाले.