Bookstruck

युद्धाचा सारांश

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पूर्व जम्मू आणि काश्मीर राज्याच्या सीमांच्या मध्ये भारतीय सेना अर्धसैनिक दल आणि पूर्व जम्मू आणि काश्मीर राज्याच्या सेना आणि पाकिस्तानी सेना अर्धसैनिक दल आणि पाकिस्तानच्या वायव्य सीमांत राज्यातील आदिवासी लढाऊ जे स्वतःला स्वतंत्र काश्मीरची सेना (आजाद काश्मीर सेना) म्हणवत असत, यांच्यात हे युद्ध लढले गेले. सुरुवातीला पूर्व जम्मू आणि काश्मीर राज्याची सेना स्वतंत्र काश्मीरच्या आदिवासी सैन्याच्या सुरुवातीच्या हल्ल्यासाठी तयार नव्हती. तिला केवळ सीमेच्या रक्षणासाठी खूप कमी संख्येत तैनात करण्यात आले होते. त्यामुळे त्यांची संरक्षण प्रणाली आक्रमणासमोर लगेचच ढिली पडली आणि त्यांच्यातील काही तुकड्या शत्रूला जाऊन मिळाल्या.
स्वतंत्र काश्मीरचे आदिवासी लढवय्ये सुरुवातीच्या या सोप्या यशानंतर लूटमार करण्यात व्यस्त झाले होते. त्यामुळे त्यांनी पुढे येऊन सहजपणे ताब्यात येऊ शकणाऱ्या प्रदेशांवर हल्ला करण्यास उशीर केला आणि महाराजांनी भारतात विलीन होण्यास मान्यता दिल्यावर भारतीय सेनेला विमानांच्या सहाय्याने सैन्य पाठवण्याची संधी दिली. १९४७ च्या अंतापर्यंत काश्मीर ताब्यात घेण्याच्या पाकिस्तानच्या अभियानातली हवाच निघून गेली. केवळ हिमालयाच्या उंचावरील काही भागात आजाद काश्मीर नावाच्या पाकिस्तानी सैन्याला थोडे यश मिळाले परंतु शेवटी त्यांना लेहच्या बाह्य भागातून जून १९४८ मध्ये हुसकावून लावण्यात आले. पूर्ण १९४८ च्या दरम्यान दोन्ही पक्षांमध्ये अनेक छोट्या लढाया झाल्या परंतु कोणालाही कोणतीही महत्वपूर्ण सफलता मिळाली नाही आणि हळूहळू एक सीमा जिला आज नियंत्रण रेषा (L.O.C. - Line Of Control) म्हणून संबोधतात, स्थापित झाली. ३१ डिसेंबर १९४८ रोजी औपचारिक युद्धविरामाची घोषणा झाली.
« PreviousChapter ListNext »