http://2.bp.blogspot.com/-U9C2oVyOqc8/VpORncDyhsI/AAAAAAAABms/JV4IcABory0/s1600/Shri-krishna-ki-10-badi-ladaiya-3.jpg

भगवान श्रीकृष्णाला आपण एक चांगला गुरुभक्त, मित्र, प्रेमी, दार्शनिक, मार्गदर्शक, राजा, सेवक, शिक्षक, रक्षक इत्यादी अनेक रूपांनी ओळखतो परंतु तुम्हाला ही गोष्ट पटेल का की महाभारतातील सर्वांत मोठा खलनायक श्रीकृष्ण होता??? त्याने ठरवले असते तर युद्ध थांबू शकले असते.. त्याची इच्छा असती तर एवढा विनाश झालाच नसता... परंतु ईश्वर हा सृष्टीचा पालनकर्ता आणि सृजनकर्ता असण्यासोबतच विनाशकर्ता देखील आहे.. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढीला लागतो तेव्हा तेव्हा धर्माच्या रक्षणासाठी विनाश आवश्यक असतो...
युद्धाच्या अठराव्या दिवशी रणांगणावर मरणासन्न अवस्थेत पडलेला दुर्योधन भगवान श्रीकृष्णाला विचारतो, "हे कंसाच्या दासाच्या उत्तराधिकाऱ्या, अशा प्रकारे अनितीपूर्ण मार्गाने मला मारण्यात तुला जराही शरम वाटली नाही? तुला जराही शरम वाटली नाही की युद्धात अतिशय नितीपूर्वक आणि वीरतेने लढणाऱ्या त्या सर्व राजांना तू कपटनीतीने मारलेस? शिखंडीला समोर ठेवून तू आमच्या पितामहांचा वध करवलास. अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला गेला तेव्हा देखील तू दुष्टतेने वागलास. आणि जेव्हा शोकाकुल होऊन गुरु द्रोणांनी जेव्हा शस्त्र भूमीवर ठेवले, तेव्हा देखील त्या दुष्ट दृष्टद्युम्नला त्यांना मारण्यापासून रोखले नाहीस. नंतर तू मानवांतील श्रेष्ठ कर्णासारख्या योद्ध्याला अशा वेळी मारायला लावलेस जेव्हा तो अडचणीत होता आणि चिखलात रुतलेले आपल्या रथाचे चाक वर काढत होता. जर तू कर्ण, भीष्म, द्रोण आणि माझ्याशी नीतीने लढला असतास तर निश्चितच तुझा विजय कधीही झाला नसता."
युद्धाच्या समाप्ती नंतर जेव्हा कृष्ण गांधारीच्या पायाला स्पर्श करायला पुढे झाला तेव्हा गांधारी म्हणाली, "दूर हो. तुझ्यामुळे आज माझा वंश नष्ट झाला. मी तुझ्यावर फार चिडले आहे, मला तुला शाप द्यावासा वाटत आहे. तुझी प्रतिभा आणि प्रभाव मला माहिती आहे. तू ठरवले असतेस तर युद्ध थांबवू शकला असतास. हे युद्ध तू घडवलेस. माझ्या मुलांनी नाही लढले, तू लढवले आहेस. तू माझ्या वंशाचा नाश केलायस. तू आपल्या तर्काने, ज्ञानाने, समजुतीने, प्रभावाने, आपल्या पौरुषाने हे युद्ध थांबवू शकला असतास. तू चांगले केले नाहीस, एका आईपासून तिचे शंभर पुत्र हिरावून घेतलेस. गांधारी रडत रडत म्हणाली, कृष्णा, ऐक ! जसे माझे भरले कुळ समाप्त झाले, तसाच तुझा वंश देखील तुझ्याच समोर समाप्त होईल आणि तू पाहशील ते. आज आम्ही दोघं किती एकटे पडलो आहोत. बघ, या महालात आता कोणीच नाहीये. जो महाल सदा माणसांनी गजबजलेला असायचा, माझी मुलं, माझे कुटुंबीय सगळे माझ्या जवळ होते, किती एकटे पडलो आहोत आज आम्ही. तुझ्या जीवनाचा अंत जवळ येईल तेव्हा संपूर्ण संसारात तू सर्वांत एकटा पडशील. तुला मारताना कोणी पाहायला देखील नसेल हा माझा शाप आहे तुला."

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel