http://religious.jagranjunction.com/files/2016/07/lovestory-1.jpg

कोणीही हे मान्य करायला तयार होणार नाही की एक अबला आणि नाजूक स्त्री एवढ्या मोठ्या युद्धाला कारणीभूत ठरू शकेल, परंतु काही लोकांचे असे म्हणणे आहे की त्रेता युगातील राम-रावण युद्धाप्रमाणेच द्वापार युगातील महाभारताच्या युद्धाला कारणीभूत देखील एक स्त्रीच होती. पाहूयात त्या काय घटना घडल्या ज्यामुळे महाभारताच्या युद्धाला द्रौपदीला कारणीभूत मानले जाते...
जेव्हा द्रौपदीच्या स्वयंवरात महारथी कर्ण पण पूर्ण करायला उतरला तेव्हा द्रौपदीने या "सूतपुत्र" योद्ध्याला बाण चालवण्यापासून असे म्हणून थांबवले की विवाह समान कुळात होतो, कोण्या सूतपुत्रासोबत नाही. आणि या अपमानाने कर्णाच्या मनात द्रौपदीच्या विषयी अपार घृणा भरून राहिली. आणि शेवटी जेव्हा एकवस्त्रा द्रौपदीला केसांना धरून फरपटत कुरु राज्यसभेत आणण्यात आले, तेव्हा कर्णाने केवळ द्रौपदीच्या वस्त्रहरणाचे समर्थनच केले नाही तर तिला पाच पुरुषांसोबत राहणारी 'वेश्या' असे म्हटले. आणि वेश्येचा कोणताही सन्मान नसतो असे म्हणून वस्त्रहरणाला योग्य ठरवले.
जेव्हा भ्रम होऊन दुर्योधन पाण्याला जमीन समजून त्यामध्ये पडला तेव्हा द्रौपदी त्याला हसली आणि म्हणाली की 'अंधाचा पुत्र अंधच असतो.' दुर्योधनाला हा अपमान सहन झाला नाही आणि इथेच महाभारताच्या युद्धाचा पाया रचला गेला.
वनवास आणि अज्ञातवासानंतर भगवान श्रीकृष्ण जेव्हा तहाचा प्रस्ताव घेऊन कौरवांकडे जात होते तेव्हा त्यांनी सर्व पांडवांकडून युद्ध व्हावे की न व्हावे यावर मत घेतले... तेव्हा द्रौपदीने युद्धाला समर्थन दाखवत रडत रडत म्हटले - धर्मज्ञ मधुसूदन! दुर्योधनाने ज्या क्रूरपणे पांडवांना राजसुखापासून वंचित केले ते आपणाला ठाऊकच आहे. संजयला राजा धृतराष्ट्राने एकांतात तुम्हाला जो आपला विचार सांगितला आहे तो देखील तुम्हाला चांगला माहिती आहे. पांडव लोक दुर्योधनाचा रणांगणावरच चांगल्या प्रकारे मुकाबला करू शकतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to महाभारत का घडले?


गीत महाभारत
महाभारतातील विस्मृतीत गेलेल्या कथा
महाभारत सत्य की मिथ्य?
कृष्ण – कर्ण संवाद
महाभारताचा कालनिर्णय- भाग १
नेहमी पडणारी स्वप्न आणि त्यांचे अर्थ
इतिहासाची सहा सोनेरी पाने
लोकमान्य टिळक
भारताचा शोध