श्रीगणेशाय नम: ।
श्रीगुरु म्हणती द्विजसी । या अनंतव्रतासी । भक्तिपूर्वक निश्चयेंसी । पूर्वी बहुतीं आराधिलें ॥१॥
युधिष्ठिर पंडुसुत । तयानें आचरिलें हें व्रत । राज्य लाधला त्वरित । ऐसें व्रत हें उत्तम ॥२॥
ऐसें म्हणता द्विजवर । करिता झाला नमस्कार । पूर्वी राजा पंडुकुमार । आणिक राज्य केवी झालें ॥३॥
श्रीगुरु म्हणती द्विजांसी । होते राज्य पांडवांसी । द्युतकर्म कौरवांसी । करुनि राज्य हरविलें ॥४॥
मग निघाले वनांतरा । कष्टत होते वर्षे बारा । ऐसे तया युधिष्ठिरा । राज्य त्यजिलें परियेसा ॥५॥
तया घोर अरण्यांत । युधिष्ठिरबंधूसहित । असे चिंताव्याकुळित । सदा ध्याय श्रीहरीसी ॥६॥
समस्त राज्य सांडूनि । वास केला त्यांहीं वनीं । कौरव कपट करोनि । नानापरि विघ्ने करिती ॥७॥
सत्व यांचे टाळावयासी । पाठविलें दुर्वासासी । त्यांसी सर्वा ठायीं ह्रषीकेशी । रक्षीतसे सर्वदा ॥८॥
नाना तीर्थे नाना व्रतें । आचरले तेथें बहुतें । कष्टत होते वनीं ते । निर्वाणरुप होऊनिया ॥९॥
भक्तवत्सल नारायण । तयांचे कष्ट पाहून । आला तेथें ठकोन । जेथें होते पंडुकुमार ॥१०॥
कृष्ण येतां देखोनि । धर्म जाय लोटांगणीं । दंड प्रमाण करुनि । वंदीतसे तये वेळीं ॥११॥
केश आपुले मोकळी । झाडी कृष्णचरणधुळी । सर्वोपस्कारपूजा तये वेळीं । करितसे विनयेसीं ॥१२॥
अर्घ्यपाद्य देवोनि । गंधाक्षता लावूनि । जीं कां पुष्पे होती रानीं । त्यांहीं पूजा करितसे ॥१३॥
पूजोनिया भक्तींसी । विनवितसे परियेसीं । जय जयाजी ह्रषीकेशी । भक्तवत्सला कृष्णनाथा ॥१४॥
जय जय अनंता नारायणा । भवसागर उध्दारणा । कृपाळुवा लक्ष्मीरमणा । क्षीरब्धिवासा वासुदेवा ॥१५॥
परमात्मा परंज्योति । तूंचि करिसी उत्पत्ति स्थिति । लय करिसी तूंचि अंतीं । त्रैमूर्ति तूंचि देवा ॥१६॥
विश्वाचा जिव्हाळा । होऊनि रक्षिसी सकळां । वास तुझा सूक्ष्म स्थळा । अणुरेणुतृणकाष्ठीं ॥१७॥
नमन तुझे चरणासी । त्रिगुणात्मक ह्र्षीकेशी । रजोगुणें सृष्टीसी । तुवां रचियेली संयोगें ॥१८॥
दुष्ट निग्रह करणें । साधुजना संरक्षणें । असें सामर्थ्य वेदपुराणें । बोलताती प्रसिध्द ॥१९॥
फेडावयां भूमिभार । घेतला तुवां अवतार । जड झाला युधिष्ठिर । तरी कां तुवां ठेवीला ॥२०॥
आपुले प्राण आम्हांसी । म्हणवोनि जगीं वनिसी । पाठवूनि अरण्यासी । कष्टविले नानापरी ॥२१॥
तुझी कृपा होय जयासी । तयासी तूं रक्षिसी । उपेक्षूनि आम्हांसी । अरण्यांत कां ठेविलें ॥२२॥
तुजवांचोनि आम्हीं ह्रषीकेशी । दु:ख सांगावें कवणापासीं । जरी आम्हां उपेक्षिसी । काय कांक्षा जीवातें ॥२३॥
इतुकियावरी भीमसेन । येऊनि धरी कृष्णचरण । उपेक्षावया काय कारण । कृपा करोनि सांगा म्हणे ॥२४॥
धनंजय तये वेळीं । वंदीतसे चरणकमळीं । विनवितसे करुणा बहाळीं । कृपाळुवा मुरारि ॥२५॥
तुझें कृपादृष्टींसी । होतों आम्ही अरण्यवासी । घडलें कष्ट सायासीं । उबगलो स्वामी बहुत ॥२६॥
आतां आमुचें कष्टहरण । पांडवांचा तूंचि प्राण । ब्रीद राखें नारायण । म्हणतसे तये वेळीं ॥२७॥
माद्रीदेवीचे कुमार । करोनिया नमस्कार । द्रौपदी येऊनि सत्वर । पाय वंदी तये वेळीं ॥२८॥
तूं आमुचा कैवारी । आम्ही असों अरण्यघोरीं । आमुचा बंधु राज्य करी । काय उपयोग आम्हासीं ॥२९॥
तुजसारिखें छत्र असतां । आम्हा कष्ट अपरिमिता । कवणें प्रकारें स्वस्थचित्तता । राज्यप्राप्ति आम्हांसी ॥३०॥
असा उपाय आम्हांसी । सांगा स्वामी ह्रषीकेशी । ऐसें म्हणतां कृष्णासी । कृपा उपजे मनांत ॥३१॥
कृष्ण म्हणे पंडुसुता । सांगेन तुम्हां एकव्रता । तात्काळिक तुम्हां प्रसन्नता । राज्य होईल जाण पैं ॥३२॥
व्रतांमध्ये उत्तम व्रत । अनंतनाम विख्यात । आचरावें तुम्हीं त्वरित । राज्य तुम्हां होईल ॥३३॥
आतां सांगेन तुम्हांसी । अनंतव्रत म्हणसी । सर्वां ठायीं आपण वासी । अनंतनाम आम्हां असे ॥३४॥
कला काष्ठा मुहूर्त आपण । दिन रात्रि शरीर जाण । पक्ष मास वर्ष आपण । युग कल्प आदि करोनि ॥३५॥
अवतरलों मी नारायण । भूभार उतरावया लागोन । दानव दुष्ट निर्दाळीन । जन्मलों वसुदेवकुळीं ॥३६॥
अनंत मीच जाणसी । संशय न धरीं गा मानसीं । त्रैमूर्ति अवतरलों सर्वांशी । ब्रह्माविष्णुमहेश्वर ॥३७॥
आपणचि सूर्य शशी देखा । चतुर्दश भुवनें मी ऐका । अष्टवसु आहेत निका । द्वादशार्कचि ॥३८॥
रुद्र आपण असती एकादश । सप्त समुद्र परियेस । ऋषि सप्त विशेष । पर्वतादिक आपणचि ॥३९॥
जितुके वृक्ष आहेत क्षितीं । आकाशीं नक्षत्रें दिसतीं । द्श दिशा आहेती ख्याति । भूमि आपण म्हणे देखा ॥४०॥
असती सप्त पाताळ । भूर्भवादि लोक सकळ । अणुरेणु तृण काष्ठ सकळ । विश्वात्मा आपणचि ॥४१॥
न धरीं संशय युधिष्ठिरा । अनंत मी निर्धारा । विधिपूर्वक पूजा करा । व्रत तुम्हांसी बरवें असे ॥४२॥
विनवी युधिष्ठिर कर जोडोनि । स्वामी सांग विस्तारोनि । व्रत करावें कवणें विधानीं । कवण दान कवण पूजा ॥४३॥
करावें व्रत कवणें दिवशीं । विस्तारोनि सांग आम्हांसी । निरोपावें वेगेंसी । पूर्वी कवणें आचरिलें ॥४४॥
कृष्ण म्हणे युधिष्ठिरासी । तुवां पुसिलें आम्हांसी । शुक्ल पक्ष भाद्रपद मासीं । चतुर्दशी परियेसा ॥४५॥
आराधितां अनंतमासी । त्वरित राज्य पावसी । पूर्वी कोणी केलें म्हणसी । सांगेन ऐका तत्पर ॥४६॥
असे पूर्वी कृतयुगेसी । सुमंतु नामें विप्र परियेसीं । उत्पन्न झाला वसिष्ठगोत्रासी । भृगुकन्या दीक्षा नामें ॥४७॥
तोचि झाली सुमंतूची भार्या । पतिव्रता औदार्या । कन्या तिसी झाली सुतनया । नाम तिचें सुशीला ॥४८॥
सुशीला कन्या सुमंतुघरीं । नित्य भक्ति सदाचारी । करीतसे विचित्रपरी । सर्वमंगळ स्वरुपें ॥४९॥
गृहशोभा करी बहुत । नानापत्रें तोरणें करीत । पंचवर्ण चूर्णयुक्त । रंगमाळिकासहित देखा ॥५०॥
स्वस्तिकादि शंख पद्म । चक्रगदादि उत्तम । नमस्कारादि मनोधर्म । देवतार्चन सोपस्कारीं ॥५१॥
वर्ततां ऐसें एके दिवशीं । विचित्र घडलें दैववशीं । सुमंतुपत्नी पंचत्वासी । पावती झाली तये वेळीं ॥५२॥
सुमंतूसी भार्याहीनत्व झालें । समस्त कर्म राहिलें । पुन:संधान पाहिजे केलें । म्हणोनि नारी आणिक केली ॥५३॥
तिचें नांव असे कर्कशी । दु:शीला आचरणीं परियेसीं । नित्य कलह करी बहुवसीं । कन्या पतीसवें देखा ॥५४॥
सुशीला कन्या झाली उपवर । सुमंतु चिंती वारंवार । इशीं एखादा मिळतां वर । कन्यादान करीन म्हणे ॥५५॥
ऐसें चिंतितां एके दिवशीं । तेथें आला कौंडिण्य ऋषि । विचारिता कन्येसी । सुमंतूनें अंगिकारिलें ॥५६॥
कन्यादान गृह्योक्तेंसी । देता झाला कौंडिण्यासी । मिळोनि होती दोन मासीं । आषाढ आणि श्रावण ॥५७॥
माता करी कन्येसी वैर । सापत्नपणाचा हाचि प्रकार । कौंडिण्य पुसे सुमंता विचार । जाऊं आश्रमा आणिक ठायां ॥५८॥
सुमंतु बहु दु:ख करी । म्हणे स्त्री नव्हे माझा वैरी । कन्या जाईल आतां दूरी । कैची पापिणी वरिली मीं ॥५९॥
शांत पत्नी नाहीं ज्याचे घरीं । तयासी अरण्य नाहीं दूरी । ऐक स्वामी त्रिपुरारि । संसारसागरीं बुडालों ॥६०॥
न चाले माझें कर्म तापस । नायके हित बोले कर्कश । कन्या असतां संतोष । नित्यदर्शन जामाता ॥६१॥
ऐसा सुमंतु चिंता करी । कौंडिण्य ऋषि त्यासी वारी । दोघे तापसी एके घरीं । असूं नये धर्महानि ॥६२॥
जाऊं आम्ही आणिक स्थाना । तप करोनि अनुष्ठाना । भेटी होईल पुन: पुन: । जवळी करूं आश्रम ॥६३॥
सुमंतु म्हणे कौंडिण्यास । आणीक रहावें बारा दिवस । सर्वसिद्धा त्रयोदशीस । प्रस्थान तुम्हीं करावें ॥६४॥
सुमंतूची विनंति ऐकोन । आणिक राहिले तेरा दिन । सुमुहूर्त बरवा पाहून । येरे दिवशीं निघाला ॥६५॥
सुमंतु म्हणे कर्कशेसी । कन्या जाईल पतिसरसी । भोजन घालावें जामातासी । व्रीहि गोधूम दे म्हणे ॥६६॥
पति सांगतांची काय जहालें । धावत घरांत गमन केले । दृढ कवाड लाविलें । पाषाण लावी द्वारवंटा ॥६७॥
कांहीं केलिया न उघडी द्वार । सुमंतु विनवी आफ़ळी शिर । सुशीला कन्या धरी कर । म्हणे जाऊं तैसींच ॥६८॥
पाहूं गेला स्वयंपाकघरा । होता कोंडा गोधूम खरा । देता झाला कन्यावरा । निरोप दिधला दोघांसी ॥६९॥
दोघे बैसौनि रथावरी । निघालीं कौंडिण्य संतोष करी । माध्याह्नकाळीं नदीतीरीं । अनुष्ठानालागीं उतरले ॥७०॥
ऋषि बैसला अनुष्ठाना । सुशीला होती तये स्थाना । तीरीं पाहतसे रम्य वना । स्त्रीसमुदाय बहु असे ॥७१॥
रक्तांबर वस्त्रेंसी । परिधान केलें बहुवसीं । व्रत म्हणती चतुर्दशी । करिती पूजा पृथक् पृथक् ॥७२॥
पाहूनि सुशीला हळूहळू । गेली तया सुवासिनींजवळू । पुसती झाली वेल्हाळू । काय व्रत करितां तुम्ही ॥७३॥
स्त्रिया म्हणती सुशीलेसी । अनंतव्रत आहे परियेसीं । पूजितां होय तात्काळेंसी । सकळाभीष्टें पावती ॥७४॥
सुशीला म्हणे नारींसी । कवण विधान सांगा मजसी । कृपा करोनि विस्तारेंसी । निरोपावें मजलागीं ॥७५॥
समस्त नारी मिळोनि । सांगताती विस्तारोनि । ऐक सुशीले बैस म्हणोनि । व्रत आद्यंतेंसी निरोपिती ॥७६॥
भाद्रपद शुक्ल चतुर्दशीसी । व्रत करावें परियेसीं । सांगूं तुज विस्तारेंसी । ऐक सुशेसेले म्हणताती ॥७७॥
रक्तपट्टसूत्रेंसी । अनंत करावा परियेसीं । घेवोनि जावें नदीसी । स्नान करावें विधीनें ॥७८॥
दिव्यांबर परिधानूनि । हळदीकुंकुम लावूनि । आणावे कलश नूतन दोनी । गंगा यमुना म्हणोनिया ॥७९॥
उदक भरोनि तयांत । पंचपल्लव-रत्नसहित । घालोनि पूजावें त्वरित । षोडशोपचारें करूनि ॥८०॥
नाना प्रकारें आरती । कराव्या गंगायमुनांप्रती । मग पूजावा दर्भग्रंथी । शेषरूपें करोनिया ॥८१॥
दोनी कलशांवरी देखा । नूतन वस्त्रें ठेवूनि निका । पद्म लिहूनि अष्टदलिका । कलशांवरून ठेवावें ॥८२॥
तया कलशांपुढें देखा । पंचवर्ण चूर्णें देखा । शंखपद्मादि अनेका । रंगमाळिका घालाव्या ॥८३॥
शेष पूजावा दर्भाचा । षोडशोपचारीं बरवा साचा । ध्यानीं ध्यास विष्णूचा । शेषशायी म्हणोनिया ॥८४॥
सप्तफ़णी शेषासी । सदा विष्णु त्यापासीं । याचि कारणें नाम तयासी । अनंत ऐसें ध्यान करावें ॥८५॥
पिंगलाक्ष चतुर्भुजेंसी । शंख पद्म सव्य करेसी । चक्र गदा वाम हस्तेसी । ऐसी मूर्ति त्वां ध्यावी ॥८६॥
ओं नमो भगवते मंत्रेंसी । षोडशोपचारें दर्भग्रंथीसी । आणोनि नव्या दोरकासी । ध्यान करावें मग तेथें ॥८७॥
अनंतगुणरत्नाय मंत्रेंसी । नव दोरक ठेवावे कलशांसी । पूजा करावी पुरुषसूक्तेंसी । अतोदेवेति मंत्रेंसहित ॥८८॥
षोडशोपचारें पूजोन । संसारेति मंत्रें दक्षिण करीं बांधोन । नमस्ते वासुदेव मंत्रें करून । जीर्ण दोरक विसर्जावे ॥८९॥
दाता च विष्णुर्भगवान् म्हणत । वायन द्यावें गोधूम घृत । प्रस्थ गोधूमाचें सघृत । फ़ळासह वायन द्यावें ॥९०॥
अपूपादि पायसेसी । सदक्षिणा तांबूलेंसी । अर्धें द्यावें ब्राह्मणासी । अर्धें आपण भक्षावें ॥९१॥
ऐसें चौदा वर्षें देखा । व्रत आचरावें विशेखा । उद्यापन करावें निका । चतुर्दश कलश द्यावे ॥९२॥
ब्राह्मणभोजन करोन । भक्तीनें करावें उद्यापन । कामना होईल संपूर्ण । चतुर्विध पुरुषार्थ ॥९३॥
ऐसें सांगती सुशीलेसी । व्रत आचरावें त्वरितेंसी । आजचि असे चतुर्दशी । व्रत करीं आम्हांसवें ॥९४॥
समस्त नारी मिळोनि तिसी । तंतु देती अनंतासी । ग्रंथी बांधोनि चतुर्दशी । पूजा करविती आपणांसवें ॥९५॥
कोंडा होता गोधूमाचा । आणोनि देतसे अर्ध साचा । वाण देऊनि सुवाचा । निरोप स्त्रियांचा घेतला ॥९६॥
समस्त स्त्रियांसी वंदोनि बाळी । आली आपुले रथाजवळी । अनुष्ठान सारूनि ऋषि तये वेळीं । येता झाला झडकरी ॥९७॥
चला म्हणोनि पुढें जाती । दोघे बैसूनिया रथीं । जाता पुढें देखती । अमरावती ऐसें नगर ॥९८॥
नगरलोक सामोरे येती । चला स्वामी ऐसें म्हणती । तुम्ही या नगरीचे अधिपति । तपोनिधि महाराजा ॥९९॥
नाना समारंभें देखा । नगरीं प्रवेशलीं दंपती ऐका । ऐश्चर्यें भोगिलीं बहुसुखा । श्रीमदनंतप्रसादें ॥१००॥
ऐसे कितीएक दिवसावरी । होतां कौंडिण्य़ सहनारी । बैसले असतां संतोषें करीं । देखता झाला अनंता ॥१०१॥
ऋषि पुसे स्त्रियेसी । काय बांधिलें हस्तासी । वशीकरण आम्हांसी । रक्त दोर बांधिला ॥२॥
सुशीला बोले भ्रतारासी । अनंत दोरा परियेसीं । याचिया प्रसादें तुम्हांसी । अष्टैश्वर्य प्राप्त झालें ॥३॥
म्यां जे दिवशीं व्रत केलें । तेणेंकरोनि दैव तुम्हां आलें । पहा दैवत प्रसन्न झालें । म्हणोनि बोले सुशीला ॥४॥
ऐसें वचन ऐकोनि । ऋषि कोपला बहु मनीं । दोरक घेतला हिरोनि । अग्नीमध्यें टाकिला ॥५॥
मग म्हणे कैचा अनंत । आपण केलें असे तप बहुत । तेणें करोनि ऐश्वर्य अद्भुत । प्राप्त झालें आम्हांसी ॥६॥
वशीकरण केलें आम्हांसी । दोरा बांधूनि अनंत म्हणसी । रागें भरोनि कौडिण्य तिसी । हिरोनि अग्नींत टाकिली ॥७॥
हा हा सुशीला म्हणोनि । धावत गेली अग्निस्थानीं । क्षीरांत घातला काढोनि । विझविती झाली दोरका ॥८॥
अनंत टाकिला अग्नीसी । हानि झाली ऐश्वर्यासी । दरिद्री झाला परियेसीं । द्विजवर कौंडिण्य तत्क्षणीं ॥९॥
नगरीं झालें सर्व शत्रु । गोधनादि आभरण वस्तु । समस्त नेते झाले तस्करु । दरिद्र झालें तात्काळ ॥११॥
गृह दग्ध झालें देखा । अवकृपा होतां रमानायका । उरलें नाहीं वस्त्र एका । सर्व गेलें तत्क्षणीं ॥११॥
मग विचारी मानसीं । म्हणे अनंत रुसला आम्हांसी । वायां घातलें अग्नीसी । मदांधें वेष्टीलों ॥१२॥
आतां करीन नेम एक । जंव भेटेल लक्ष्मीनायक श्रीमदनंत देखेन मुख । तवं अन्नोदक न घेईं ॥१३॥
म्हणोनि निर्वाण करोनि । निघता झाला घोर काननी भार्येसहित कौंडिण्य मुनि । निघता झाला परियेसा ॥१४॥
हा हा अनंत अनंत म्हणत । शीघ्र जातसे अरण्यांत । तंव देखिला वृक्ष चूत । पुष्पीं फ़ळीं भरला असे ॥१५॥
कीटकादि पक्षिजाति । कोणी त्यासी नातळती । कौंडिण्य पुसे तयाप्रती । अनंतासी देखिलें कीं ॥१६॥
वृक्ष म्हणे ब्राह्मणासी । दृष्टीं न पडेचि आम्हांसी । तुवां जरी देखिला अससी । तरी आम्हांसी सांगावें ॥१७॥
ऐसें ऐकोनि पुढें जात । धेनु देखिली वत्सासहित । हिंडतसे तृणांत । तोंडीं न ये भक्षावया ॥१८॥
द्विज म्हणे धेनूसी । जरी तुवां अनंत देखिलासी । कृपा करोनि आम्हांसी । सांग म्हणे द्विजवर ॥१९॥
नाहीं देखिलें अनंतासी । तुम्हां भेटला जरी तयासी । मजविषयीं सांगा त्यासी । अवस्था ऐसी धेनु म्हणे ॥१२०॥
ऐसें ऐकोनि द्विजवर । पुढे जाता देखिला वृषभ थोर । तयातें पुसे मुनीश्वर । तुवां अनंतातें देखिलें कीं ॥२१॥
वृषभ म्हणे तयासी । नेणों आम्ही अनंतासी । जरी तुम्हीं देखिला त्यासी । आम्हांविषयीं विनवावें ॥२२॥
पुढें जातां देखें कौंडिण्य । सरोवरें दोन रम्य । उदक मिळालें अन्योन्य । हंसादि पक्षी न सेविती ॥२३॥
कमळ कुमुदादि पुष्पेंसी । मिरविती सरोवरें ऐसीं । द्विज पुसे तयांसी । अनंतातें देखिलें कीं ॥२४॥
सरोवरें म्हणती तयासी । नेणों कैचा अनंतासी । भेटी होईल जरी तुम्हांसी । आम्हांविषयीं सांगावें ॥२५॥
पुढें जातां द्विजवर । देखिले गर्दभ कुंजर । पुसतसे तयां विचार । ते न बोलती तयासी ॥२६॥
निर्वाण झाला तो ब्राह्मण । त्यजूं पाहे आपुला प्राण । अनंत अनंत म्हणोन । धरणीवरी पडियेला ॥२७॥
इतुकिया अवसरीं । वृद्ध ब्राह्मण वेषधारी । जवळ येवोनि हांक मारी । उठीं उठीं म्हणतसे ॥२८॥
ऊठ विप्रा काय पुससी । श्रीमदनंत कोठें असें विचारिसी । दाखवीन चल आम्हांसरसी । म्हणोनि धरिलें उजवे करीं ॥२९॥
उठवूनिया कौंडिण्यासी । घेऊनि जाई गव्हरासी । नगरी पाहे अपूर्व तैसी । महदाश्चर्य पाहतसे ॥१३०॥
घेऊनि गेला नगरांत । सिंहासन रत्नखचित । नेऊनि तेथें बैसवित । आपण दाखवी निजस्वरूप ॥३१॥
रूप देखोनि कौंडिण्य । स्तोत्र करी अतिगहन । चरणावरी माथा ठेवून । कर जोडुनी विनवीतसे ॥३२॥
नमो नमस्ते गोविंदा । श्रीवत्सला सच्चिदानंदा । तुझे स्मरणमात्रें दु:खमदा । हरोनि जातीं सर्व पापें ॥३३॥
तूं वरेण्य यज्ञपुरुष । ब्रह्मा विष्णु महेश । तुझे दर्शनमात्रे समस्त दोष । हरोनि जाती तात्काळीं ॥३४॥
नमो नमस्ते वैकुंठवासी । नारायण लक्ष्मीनिवासी । जगद्व्यापी प्रतिपाळिसी । अनंतकोटि ब्रह्मांडें ॥३५॥
पापी आपण पापकर्मीं । नेणॊं तुझी भक्ति धर्मीं । पापात्मा पापसंभव अधर्मीं । क्षमा करीं गा देवराया ॥३६॥
तुजवांचोनि आपण । अनाथ असे दीन । याचि कारणें धरिले चरण । शरणागत मी तुम्हांसी ॥३७॥
आजि माझा जन्म सफ़ळ । धन्य माझें जिणें सकळ । तुझें देखिले चरणकमळ । भ्रमर होवोनि वास घेतो ॥३८॥
ऐसें स्तवितां कौंडिण्य । प्रसन्न झाला लक्ष्मिरमण । भक्तजनचिंतामणिरत्न । वरत्रय देता झाला ॥३९॥
धर्मबुद्धि दारिद्र्यनाश । शाश्वत वैकुंठनिवास । वरत्रय देत हृषेकेश । ऐक युधिष्ठिरा कृष्ण म्हणे ॥१४०॥
पुनरपि द्विज विनवी देख । म्यां देखिलें आश्चर्य एक । अरण्यांत वृक्ष एक । महाफ़लित आम्र देखिला ॥४१॥
त्याचीं फ़ळें पक्षिजाती । कोणी प्राणी नकळती । पुढें येतां मागुती । देखिली धेनु सवत्सका ॥४२॥
तृण तेथें असे प्रबळ । परी तिचे तोंडा नये कवळ । आणिक देखिलीं निर्मळ । सरोवरें दोनी तेथें ॥४३॥
अन्योन्यें एकमेकां । मिसळती तेथें दोन्ही उदका । पुढें पाहिले अपूर्व ऐका । वृषभ एक महाथोर ॥४४॥
त्याचे मुखा नये ग्रास । सर्वकाळीं उपवास । पुढें देखिला सुरस । कुंजर एक मदोन्मत्त ॥४५॥
सवेंचि देखिलें गर्दभासी । ऐका स्वामी मार्गेसी । हिंडतसे वनासी । देखिला वृद्ध ब्राह्मण ॥४६॥
न कळे याचा अभिप्राय । विस्तारोनि मज सांगा भाव । जगन्नाथा कौंडिण्य । वृक्ष तुवां जो देखिला ॥४७॥
कृपानिधि नारायण । सांगतसे विस्तारोन । ऐकतसे भक्त कौंडिण्य । वृक्ष तुवां जो देखिला ॥४८॥
पूर्वीं होता द्विजवर । तयासी येती वेदशास्त्र । उन्मत्तपणें गर्वे थोर । शिष्यवर्गा न सांगेची ॥४९॥
तेणें पापें वृक्ष झाला । तुवां देखिलें धेनुवत्साला । पूर्वी होती भूमि निष्फ़ला । दिली होती ब्राह्मणासी ॥५०॥
देखिला तुवां वृषभ एक । पूर्वीं विप्र महाधनिक । केलें नाहीं दानादिक । तेणें पापें ऐशी गति ॥५१॥
सरोवरें तुवां दोनी । म्हणसी देखिलीं नयनीं । पूर्वी होत्या दोघी बहिणी । घेतलें दान आपआपणांत ॥५२॥
खर म्हणजे तुझा क्रोध । कुंजर तो तुझा मद । जाहलें मन तुझें शुद्ध । भेटलो ब्राह्मण आपणची ॥५३॥
जें जें तुवां देखिलें । त्या त्या समस्तांतें मुक्त केलें । अखिल ऐश्वर्य भोगी वहिलें । अंतीं जाय स्वर्गासी ॥५४॥
तुवां करावा तेथें वासू । नक्षत्रांमाजी पुनर्वसू । ऐसा वर देतां हर्षू । जाहला तया कौंडिण्या ॥५५॥
ऐसा वर लाधोनि । राज्य केलें बहुदिनीं । अंतीं गेला स्वर्गभुवनी ऐक राया युधिष्ठिरा ॥५६॥
ऐसी कथा धर्मासी । सांगता झाला हृषीकेशी । आचरिलें भक्तींसी । अनंतव्रत तये वेळीं ॥५७॥
युधिष्ठिर दंपत्येंसीं । व्रत आचरिला भक्तींसी । श्रीमदनंतप्रसादें त्वरितेंसी । पांडव राज्य पावलें ॥५८॥
आणिक हेंचि भूमिवरी । व्रत केलें ऋषीश्वरी । आचरावें नरनारी । लाधे चारी पुरुशार्थ ॥५९॥
व्रतामधें उत्तम व्रत । प्रख्यात असे अनंत । तुवां आचरावें सतत । द्यावे तुझे ज्येष्ठ सुतासी ॥१६०॥
व्रत कौंडिण्य आचरला । अखिल सौख्य लाधला । आचरावें या व्रताला । अनंत पुण्यफ़ल असे ॥६१॥
अनंतव्रत महापुण्यें । आमुचे निरोपें करणें । व्रत करा एकभावपणें । एकभक्तिकरोनिया ॥६२॥
ऐसें गुरुनिरोपेंसी । व्रत केलें संतोषी । पूजा केली श्रीगुरूसी । नानापरी अवधारा ॥६३॥
नीरांजन बहुवसीं । गीतवाद्यनृत्येंसी । पूजा करिती श्रीगुरूसी । भक्तिभावेंकरोनिया ॥६४॥
समाराधना ब्राह्मणांसी । भोजन करविलें श्रीगुरूसी॥ आनंद झाला बहुवसीं । श्रीगुरुमूर्ति संतोषे ॥६५॥
येणेपरी श्रीगुरूसी । आराधोन संतोषी । गेला आपुले ग्रामासी । ऐक शिष्या एकचित्तें ॥६६॥
विप्र जो का सायंदेव । कलत्रपुत्र पाठवी ठाव । मागुती आला असे भाव । श्रीगुरुचरणसेवेसी ॥६७॥
राहोनिया श्रीगुरूपासीं । सेवा केली बहुवसीं । ऐसे तुझें पूर्वजासी । प्रसन्न झाले श्रीगुरु ॥६८॥
सिद्ध म्हणे शिष्यासी । येणेंपरी तुम्हांसी । निधान लाधलें परियेसीं । श्रीनृसिंहसरस्वती ॥६९॥
म्हणोनि सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार । ऐकतां होय मनोहर । लाधे चारी पुरुषार्थ ॥१७०॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । अनंतव्रतकथा विख्यात । नामधारका सांगत । त्रिचत्वारिंशोsध्याय हा ॥१७१॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरु श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवाद श्रीमदनंतकथानिरूपण नाम त्रिचत्वारिंशोsध्याय: ॥४२॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु॥ ओवीसंख्या ॥१७१॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.