कौरवांनी पांडवांना निदान पाच गावे तरी द्यावीत, म्हणजे युध्दाचा प्रसंग टळेल, म्हणून्भगवान श्रीकृष्ण स्वतः दुर्योधनाकडे शिष्टाई करण्याकरिता गेले. त्यावेळी दुर्योधनाने सांगितले की, "देवा, तू म्हणतोस ते सर्व बरोबर आहे. न्यायाच्या दृष्टीने तू म्हणतोस तसे काहीतरी करणे जरूर आहे. पण तसे करण्याची मला बुध्दीच होत नाही. त्याला मी काय करू? तू सर्वसत्ताधीश आहेस, तर मग माझी बुध्दी पालत म्हणजे सर्वच प्रश्न एकदम मिटेल!" परंतु तसे काही न होता पुढे युध्द झाले हे प्रसिध्दच आहे. तीच स्थिती रावणाच्या बाबतीतही दिसते. म्हणून, सगुणरूपी अवताराने वासना किंवा बुध्दी पालटण्याचे कार्य होऊ शकत नाही असे दिसते. सद्‍बुध्दी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे. म्हणूनच त्रिकालाबाधित असणार्या नामावताराची आता जरूरी आहे. नाम म्हणजे भगवंतच आहे. ते नाम अनन्य होऊन आपण घेऊ या.

एका माणसाची प्रकृती बरी होती पण त्याच्या पायामध्ये काहीतरी दोष उत्पन्न झाला. डॉक्टर म्हणाला की, "जीव वाचवायचा असेल, बाकीचे सर्व शरीर टिकवायचे असेल, तर पाय कपायला हवा." आता, नुसता प्रान आहे पण हात ह्हलत नाही, पाय हालत नाही, डोळ्यांनी दिसत नाही, कानांनी ऐकू येत नाही, पण प्राण आहे, तर उपयोग नाही. याउलट, बाकी सगळे आहे पण प्राण नाही,तरीही उपयोग नाही. प्राण आहे पण बाकीच्या गोष्टींपैकी एखादी नसली तर चालू शकेल. समजा, कानानी ऐकू येत नाही; नाही तर नाही! कुठे बिघडले? उपासना, अनुसंधान, हे प्राणासार्खे समजावे; बाकी व्यापाहे तो शरीराच्या इंद्रियांप्रमाणे समजावा. यात भगवंताचे अनुसंधान चुकले तर प्राणच गमावल्यासारखे आहे; ते संभाळून जे करता येईल तेवढेच करणे जरूर आहे. ते न संभाळता बाकीच्या गोष्टी केल्या तर अंती निराशा आहे.

आमच्या मनासारख्या गोष्टी होत नाहीत म्हणून आम्ही दु:खी आहोत असे म्हणण्यापेक्षा, ती गोष्ट आमच्या मनात आहे हेच दु:खमुळ आहे. अमकी गोष्ट सुखदायक आहे ही जी कल्पना आहे, तीच दुःखमुळ आहे, हे समजून आपण वागले पाहिजे. मांजर उंदराशी खेळते; ते त्याला धरील, परत सोडील, परत धरील, परत सोडील, पण शेवटी प्राण घेईल त्याचा. तसे काळ आपल्याशी करतो आहे; आशेत गुंतवून ठेवील, पुढे जाईल. आपण पहिल्यापासूनच हे ओळखून राहावे की असे गूंतून राहण्यात काही फायदा नाही, आणि अनुसंधान ठेवले तरच मानवाचे कल्याण होईल. नाहीतर फार कठीण आहे. मी-मी म्हणणारे, दुसर्‍याला ज्ञान सांगणारे, विद्‍वान, शास्त्री, पंडित सर्व खरे भ्रमातच आहेत. म्हणून म्हणतो, एक करा - अनुसंधान टिकवून जेवढे करता येईल तेवढेच करा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel