विक्रांत देशमुख
युवा मोरया सामाजिक संस्था,सातारा

नमस्कार

मागील दोन लेखामध्ये आपण रक्तदानाचे फायदे तसेच रक्तदान केल्यानंतर जे घटक तयार होतात त्याची माहिती,घेतली,त्याचबरोबर युवा मोरया सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गरजू रुग्णांना कशी मदत झाली ही माहिती आता जाणून घेवू़ या.

आपण रक्तदान केल्यानंतर काही अंशी सरकारी रक्तपेढया मध्ये रक्तामधील P.C.V (लाल पेशी), प्लाझ्मा (P.P.F), प्लेटलेट (पांढर्या पेशी) हे घटक वेगळेे केले जातात P.C.V हा घटक ४२ दिवस राहू शकतो, व्होल ब्लड म्हणजे रक्त हे ३५ दिवस टिकते. त्यानंतर प्लाझ्मा म्हणजे रक्तामधील पाणी हे १ वर्ष राहू शकते.आणि प्लेटलेट म्हणजे पांढर्या पेशी या ५ दिवस टिकू शकतात. त्यामध्ये बर्याच रक्तपेढया ह्या त्यांच्या उपलब्ध असणार्या रक्तसाठ्याचा विचार करून रक्तदान शिबिरे घेत असतात जर रक्तपेढीमध्ये जास्त रक्त जमा असेल व ठराविक मुदतीमध्ये त्याचा वापर झाला नाही तर ते फेकून द्यावे लागते. त्यासाठी आपण नेहमी रक्तदान शिबिराचे आयोजन करताना रक्तपेढीमध्ये किती प्रमाणामध्ये रक्त उपलब्ध आहे याची खात्री केली पाहिजे व त्यानुसारच रक्तदान शिबिराचे नियोजन केले पाहिजे.

युवा मोरया सामाजिक संस्था ही रक्तदान शिबिराचे नियोजन करताना प्रथमत: रक्तपेढीची गरज लक्षात घेत असते. म्हणजे जेव्हा  सरकारी रक्तपेढीला रक्ताची कमतरता भासली की संस्था रक्तदान शिबिराचे आयोजन करते.  उदा. सांगायचे झाले तर सर्व रक्तपेढयानां मार्च ते जून या कालावधीमध्ये अडचणी असतात कारण ऊन्हाळ्याचे दिवस असतात, तसेच काही महाविद्यालयांच्या परिक्षा असतात किंवा काहिंना सुट्टी असते, तसेच रक्तदानाची समाजामध्ये विशेषत: तरुण मुलां मुलींमध्ये जेवढी जागृकता पाहिजे तेवढी नाही. त्यामुळे त्यांना ऊन्हामुळे त्रास होईल ही भिती असते. त्यामुळे ते रक्तदानापासून दूर राहतात. मग अशाच वेळी युवा मोरया च्या माध्यमातून पूर्ण सातारा जिल्हाभर रक्तदान शिबिरे घेण्याचे काम केले जाते. तसेच जास्तित जास्त  नागरिकांनी रक्तदान करावे यासाठी युवा मोरया  जनजागृती करत असते. कारण जारी कोणी रक्तदान केले नाही तरी जे रुग्ण रुग्णालयामध्ये आहेत त्यांना रक्ताची गरज आहे अशांना तर आपण रक्तासाठी नाही म्हणू शकत नाही. त्यांना तर रक्त द्यावेच लागते. नाहीतर त्यांचा जीव जावू शकतो. यासाठी रक्तपेढीतील साठा कमी असतो, तेव्हा रक्तदान शिबिर घेणे समाजाच्या दृष्टि ने फायदेशीर असते.

याउलट आपल्या समाजामधील लोक गणेशोत्सवामध्ये, नवरात्र, २६ जानेवारी, १५ आगस्ट, या दिवशी रक्तदान शिबिरे घेतात. शिबिर घेणे हे चांगलेच आहे, पण आपण त्यानंतर आपल रक्त योग्य व्यक्ति पर्यंत पोहचवल जात कि फेकून दिल जात याची माहिती घेण गरजेचे आहे. कारण यावेळी साठा जास्त होतो व गरज ठराविक प्रमाणात असते. त्यामुळे जास्त झालेले रक्त नाईलाजास्तव फेकून द्यावे लागते.

युवा मोरया सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तसेच इतरही अनेक मंडळाच्या व ग्रुप च्या सहकार्यातून जेव्हा रक्ताची रक्तपेढीला गरजू रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी गरज असते तेव्हा-तेव्हा मोठी रक्तदान शिबिरे घेवून मदत केली जाते,व करत आहे.

रक्तदान हे सगळ्या दानामध्ये पवित्र दान आहे.  त्यामुळे त्याची किंमतही खूप मोठी आहे, ती पैशामध्ये मोजता येत नाही, तर तो एखाद्या गरजू रुग्णाचा जीव वाचविल्यानंतर आपोआप मिळत असते. त्यासाठी आपले दान योग्य वेळी व योग्य त्या ठिकाणीच पोहचले पाहिजे, असे माझे आपणांस आवाहन आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel