प्रख्यात बोधिवृक्ष आजही अस्तित्वात आहे. परंतु त्याचा पुष्कळसा ऱ्हास झालेला आहे; एक मोठे खोड, पश्चिमेकडील तीन फांद्या, अजूनही हिरव्या आहेत, परंतु अन्य फांद्या सालीसह वाळल्या आहेत. त्या हिरव्या फांद्या कदाचित् मूळ बोधिवृक्षाच्या असाव्यात, कारण तेथे असंख्य एकत्रित खोडे उघडपणे दिसतात. बोधिवृक्षाचे नियमितपणे निश्चित पुनरुजीवन झाले आहे. सध्याचा पिंपळ आजूबाजूच्या परिसरापेक्षा ३० फूट उंच ओट्यावर आहे. इ.स. १८११ मध्ये बोधिवृक्ष पूर्ण चैतन्याने बहरलेला होता. जेव्हा तो डॉ बुकॅनन (हॅमिल्टन) यांनी पाहिला तेव्हा त्यांनी त्यांचे वर्णन करतांना म्हटले आहे की, त्याचे वय १०० वर्षापेक्षा जास्त नसावे.
तथापि, पुढे तो वृक्ष कुजला आणि इ.स. १८७६ मध्ये वादळात नष्ट झाला. इ.स. १८८१ मध्ये बकिंगहॅम (Cunningham) यांनी त्याच जागेवर पुन्हा नवीन बोधिवृक्ष लावला. अलेक्झांडर बकिंगहॅम इ.स. १८९२ मध्ये म्हणतात. "मी इ.स.१८७१ मध्ये आणि इ.स. १८७५ मध्ये बोधिवृक्ष पाहिला. तो पूर्णतः कुजलेला होता. नंतर अल्पावधीतच मी इ.स. १८७६ मध्ये बोधिवृक्ष पाहिला तर त्याचा काही भाग वादळामुळे पश्चिमेकडील भिंतीवर पडलेला होता आणि जुना पिंपळ नष्ट झालेला होता. तथापि, बोधिवृक्षाच्या मूळ जुन्या झाडाच्या अनेक बिया जमा होऊन त्यांपासून झालेल्या नवीन रोपट्यांनी पुन्हा ती जागा घेतली होती."