... अचानक अभिजीतचे डोळे उघडले गेले. तो डोळे चोळत उठून बसला. काही क्षण त्याला कळत नव्हतं. कि त्याच्यासोबत नेमकं काय घडलं होतं. अचानक त्याला सगळं आठवलं. टाईम मशीनचं चुकून एका अज्ञात ठिकाणी येण, त्याचा सामना विचित्र जंगली लोकांशी होण, एक शवगृह दिसण, आणि काही रहस्यमयी शस्त्रधारी लोकांच तिथे येऊन त्याला आणि प्रोफेसरांना बेशुद्ध करणं. सगळं एक एक करून आठवत होतं. त्याने आपल्या चारही बाजुला नजर फिरवली. तो एका खोलीत होता. त्याच्या बाजूला प्रोफेसर अजुनही बेशुद्धावस्थेत पडलेले होते. अभिजीतने प्रोफेसरांना हाका मारल्या. त्यांनी हळूहळू आपले डोळे उघडले.
"अरेच्चा, सकाळ झाली वाटत. पण आज खूपच गाढ झोप लागली होती बाबा." प्रोफेसर जांभई देत बोलले.
अभिजीत आ वासून त्यांच्या तोंडाकडे बघत राहिला.
"ओ प्रोफेसर, काय बोलताय तुम्ही. काही वेळापूर्वी आपल्या सोबत काय घडलं ते विसरलात वाटत."
"काय घडलं आपल्यासोबत?" असं म्हणून प्रोफेसर आठवण्याचा प्रयत्न करू लागले आणि अचानक त्यांनाही ते सगळं आठवलं जे त्यांच्यासोबत घडलं होतं.
प्रोफेसर: अरे हो, मला आठवलं. आपल्याला काही माणसांनी बेशुद्ध केलं होतं. पण ते माणसे कोण होते? आणि आपण कुठे आहोत?
अभिजीत: जे प्रश्न तुम्हाला पडलेत ना तेच मलाही पडलेत. ही कोणती जागा आहे ते मलाही माहित नाही.
अचानक एका अपरिचित आवाजाने त्यांचं लक्ष वेधले,
"कोण आहात तुम्ही? आणि इथे कुठून आणि कसे पोहोचलात?"
अभिजीत आणि प्रोफेसरांनी आवाजाच्या दिशेने बघितलं. त्यांच्या पासून काही अंतरावर एक माणूस उभा होता. गोरापान रंग, घारे डोळे, सोनेरी केस आणि अंगात पॅन्ट शर्ट अशाप्रकारचा तो माणूस हळूहळू चालत त्या दोघांजवळ आला. अभिजीत आणि प्रोफेसरांनी एकमेकांकडे बघून काहीतरी इशारा केला. प्रोफेसर पुढे झाले आणि त्या माणसासमोर उभं राहून बोलले,
"पहीले तु सांग, तु कोण आहेस? आणि इथे कसा आणि कुठून पोहोचलास? तूच तर आम्हाला अपहरण करून नाही आणलस ना?
तो माणूस: नाही. माझं नाव अॅंड्र्यू, मी अमेरिकेतून आलोय आणि मीही इथे तुमच्यासारखाच कैदी आहे.
अभिजीत: काय? कैदी? म्हणजे तुला असं म्हणायचंय कि आपण आता ज्याठिकाणी आहोत ते एक जेल आहे?
अॅंड्र्यू: हो. तुम्ही भविष्यातून आला आहात का?
त्याच बोलणं ऐकून दोघेही जण डोळे फाडून त्याच्याकडे बघत होते.
प्रोफेसर: हे तुला कसं कळलं?
अॅंड्र्यू: कारण मीही भविष्यातूनच आलोय.
प्रोफेसर: मग तुझी टाईम मशीन कुठे आहे?
अॅंड्र्यू: ही काय.
असं म्हणून त्याने आपला डाव्या हाताच मनगट दाखवल. त्यावर एक घड्याळ होत.
प्रोफेसर: हे घड्याळ म्हणजे टाईम मशीन आहे?
अॅंड्र्यू: हो. २१५० सालात अश्याच टाईम मशीन बनतात.
प्रोफेसर: तू २१५० सालातून आला आहेस?
अॅंड्र्यू: बिलकूल. पण तुम्ही मला तुमच्याबद्दल काही सांगितलं नाहीत.
अभिजीत: हे प्रोफेसर भारद्वाज आहेत आणि मी त्यांचा असिस्टंट अभिजीत. आम्ही २०१९ सालातून आलो आहोत.
प्रोफेसर: एक मिनिट. तु अमेरिकेचा आहेस बरोबर?
अॅंड्र्यू: हो.
प्रोफेसर: मग तुला मराठी भाषा कशी काय येते?
अॅंड्र्यू: कारण मी जगातील कोणतीही भाषा बोलू, वाचू आणि समजू शकतो.
अभिजीत: बरं ओळख झालीच आहे तर आता तरी सांग कि आपण कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या काळात आहोत?
अॅंड्र्यू: तुम्हाला खरच माहीत नाही?
"नाही." दोघेही एकदम बोलले.
अॅंड्र्यू: मग ऐका. आपण १३२७ सालात आहोत.
प्रोफेसर: म्हणजे आमच्या काळाप्रमाणे ७०० वर्ष मागे?
अॅंड्र्यू: नाही. तुमच्या काळाप्रमाणे १७०० वर्ष मागे. आपण १३२७ AD मध्ये नाही १३२७ BC मध्ये आहोत.
प्रोफेसर: म्हणजे तुला म्हणायचंय कि आपण इसवी सन पूर्व १३२७ मध्ये आहोत.
अॅंड्र्यू: बरोबर. आणि आपण ज्याठिकाणी आहोत. ते ठिकाण आहे,
द ग्रेट पिरामिड ऑफ गिजा इन इजिप्त.
अॅंड्र्यूच बोलणं ऐकून अभिजीत आणि प्रोफेसर वेड्यासारखे त्याच्या तोंडाकडे पाहत राहिले.
क्रमशः