भेटायला ?”
“ पुतणी आली होती....थांबा थांबा,... दोघेही आले होते.ते आत गेले,त्याच्याशी बोलले, आणि....”
“ किती  वाजता आले होते ते?”
“अकरा च्या सुमारास.नंतर मिलिंद बुद्धीसागर  म्हणाला की काहीतरी काम आहे,आणि गाडी काढून गेला.बायकोला न्यायला दुपारी परत येणार होता , त्या प्रमाणे आला ही.”
“ मिरगल गेल्या नंतर किती वेळाने आला?”
“ फार उशिरा नाही.अनन्यात्याचे दुपारचे जेवण तयार करीत होती.टोस्ट आणि  साखरेला पर्यायी गोड गोळ्या  टाकून हॉट चॉकलेट. नंतर ती गेल्या सारखी वाटली. मला नाही सांगता येणारसाधारण नक्की पण  दहा मिनिटासाठी  असेल.मी माझे जेवण जेवण्याच्या तयारीत होतो. अगदी तेव्हाच मी अनन्याची किंकाळी ऐकली., नंतर ती धावतच खाली आली आणि डॉक्टरांना फोन केलं.नंतर पुन्हा धावतच जिना चढली.मी ही वर गेलो तेव्हा हर्षल मिरगल धापा टाकत होता.चक्कर येत होती त्याला,नंतर गेलाच तो.मला तरी तो गेला अस वाटलं.”
“ डॉक्टर यायला किती वेळ लागला?”
“ फार वेळ नाही लागला.दहा पंधरा मिनिटे. आल्यावर त्यांनी तपासलं आणि म्हणाले की नशिबाने फार वेदना न होता  गेला तो.अनन्याला पण त्याने गोळ्या दिल्या आणि झोपायला सांगितले.पुढची व्यवस्था मी करतो असे म्हणाले., ती नंतर तिच्या खोलीत जाऊन पडून राहिली.”
“ तिच्या खोलीत जायला स्वयंपाक घरातून जावे लागते?”
“ बरीबर, तिच्या झोपायच्या खोलीला काही अर्थ नाहीये.ती तळघरात आहे.जेमतेम एक बाथ रूम आणि संडासाची सोय आहे.मला कधीच कळल नाही की तिला हर्षल ने पाहुण्याना असलेली  एखादी खोली का दिली नव्हती.ती त्यालाही खूप सोयीस्कर पडली असती आणि रात्री अपरात्री केव्हाही तिला लगेचच मिरगल ला भेटता आले असते.”
“ हर्षल कडे कधीच पाहुणे येत नसत पण त्यांच्या साठी खोल्या सज्ज असत.अनन्याआणि दोन्ही पाळीतील नर्स साठी त्याने घरात बेल बसवून घेतली होती.”
“ त्याने तुझे काम हलके केले होते?” पाणिनीने विचारले.
“ बिलकुल नाही ! अनन्याआणि मला त्या रात्र पाळीच्या नर्स साठी जेवण बनवावे लागायचे. तिला रात्री सुद्धा अगदी गरम खायला हवे असायचे.मी जेमतेम जेवण करू शकतो फार चांगल नाही पण या दोन बायका त्यावरून माझ्याशी दादागिरी करायच्या, असंच बनव, तसचं कर वगैरे.”
“ हर्षल ने कधी तुला त्यांना हवे तसे बनवायला लावले?”
“ नाही कधीच नाही.”
“ अनन्याला त्याने त्याच्या घरी का बोलावले रहायला?”
“ तिला घर मिळावे म्हणून.तो तिच्या आईला चांगला ओळखत होता.”
“ती त्याची मुलगी असायची शक्यता आहे का?” पाणिनी ने विचारले.
“ मला ते समजायचा काय मार्ग आहे?”
“ मला वाटलं तस, तू म्हणालास ना की तो तिच्या आईला चांगला ओळखत होता.”
“ जेव्हा तो रात्री बाहेर जायचा तेव्हा मी हातात बॅटरी घेऊन त्याच्या मागे जात नसे ! “
“ पोलिसांना  अस वाटतंय की मिरगल च्या मृत्यू संबंधातील ज्या घटना आहेत त्या पुन्हा एकदा  चाचपून पहाव्यात.ते कदाचित तुझ्याशी संपर्क करतील.”
“ मला वाटतं तो त्यांचा हक्क आहे.” बलदेव म्हणाला 
‘’ त्या दिवशी  बुद्धीसागर जोडपे घरी आले होते तेव्हा ते स्वयंपाक घरात गेले होते का?”
“ नाही , तसे मधे मधे नाक खुपसण्यासाठी आणि नावे ठेवण्यासाठी  ते घुटमळले असतील सुद्धा.त्या पुतणी ला आपले बोट सारखे कुणावर तरी आरोप केल्या सारखे दाखवायची सवय आहे.”
“तिने तुला कधी काही सांगितलं का? किंवा तू तिला काही ?” 
“ बिलकुलच नाही.,तिला काय करायचे ते मी  करू द्यायचो मी. शेवटी तो तिचा प्रश्न  होता.”
“ पण तुला नाही वाटत की ते त्या दिवशी स्वयंपाक घरात गेले असावेत?”
“ ती गेली असेल कदाचित. मला नीट नाही आठवत.पण ते काहीही असले तरी ती वर  जाऊन हर्षल ला भेटली.नंतर तिचा नवरा वर गेला आणि हर्षल ला भेटला. नंतर तो गाडी घेऊन बाहेर गेला आणि तिला घेण्यासाठी परत आला.मला माहित्ये की तो स्वयंपाकघरात गेला आणि आला. अस वाटत होत की तो अनन्याला शोधत असावा.मग तो वर गेला.हर्षल बरोबर दहा मिनिटे होता. त्यांना त्याच्या बद्दल काहीही वाटत नव्हत.त्यांना फक्त खात्री करायची होती की त्याने मृत्युपत्रात बदल केलेला नाही.”
“ छान, मला फक्त वस्तुस्थिती जाणून घ्यायची होती. खूप धन्यवाद.”
बलदेव खुर्चीतून उठला. “ तुला आणि तुझ्या त्या माणसाना , मला दिलेल्या पैशां एवढी माहिती मिळाली ना? “ पाणिनी हो म्हणाल्यावर बलदेव पुढे म्हणाला,” आता आपण एकमेकांना काहीही देण घेण लागतं नाही.आपण पुन्हा भेटणार ही नाही. गुड बाय ! ”

(प्रकरण 9 समाप्त)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel