शहराचे पूर्वीचे नाव कलकत्ता हे कालीकाता या बंगाली नावाची आंग्ल आवृत्ती आहे. काहींच्या मते, कालीकाता हा बंगाली शब्द कालीक्षेत्र या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ “देवी कालीचे क्षेत्र” आहे. काही लोक म्हणतात की शहराचे नाव कालव्याच्या म्हणजेच बंगालीत खल याच्या काठावर वसलेल्या वस्तीच्या ठिकाणाहून आले आहे.
बंगालमध्ये वीस हजार वर्षांपूर्वीचे दगडांचे अवशेष सापडले आहेत. मूळ बंगालमध्ये कोला, भिल्ल, संथाल, शबारा आणि पुलिंदा यासारख्या आदिवासी आणि ऑस्ट्रिक व ऑस्ट्रिया-एशियाटिक वंशाच्या लोकांचा समावेश आहे. बंगालमध्ये चार हजार वर्ष जुनी संस्कृती आहे. जी गंगेच्या काठावरुन ब्रह्मपुत्रापर्यंत वाढत गेली आहे. गंगेच्या त्रिभुज प्रदेशाच्या संपत्तीने हि संस्कृती टिकवून ठेवली आहे. राज्यातील पुरातन शहरांचे मूळ हे वैदिक कालखंडातील आहेत. बांग्लादेशातील सर्वात पुरातन पुरातत्व ठिकाण “महास्थानगड” आहे. हे ई.स.वी.पूर्व ७००चे आहे.
अलेक्झांडरची माघार:
ग्रीक प्रवासी व इतिहासकार मेगास्थेनीस यांनी आपल्या इंडिका(३००इ.स.पू.) पुस्तकात बंगालचा उल्लेख “गंगारीडाई” म्हणून केला. जेव्हा अलेक्झांडरने भारतावर आक्रमण केले आणि पोरसचा पराभव केला तेव्हा त्याला संपूर्ण भारत जिंकण्याची इच्छा होती आणि त्याचे सैन्य पूर्वेकडे सरकले. जेथे त्याला गंगारीडाई योद्धांच्या पराक्रमी सैन्याबद्दल कळले. अलेक्झांडरने टॉलेमी आणि डायोडोरस यांनी लिहिलेल्या गंगेच्या त्रिभूजप्रदेशाची ख्याती वाचली होती. ग्रीक इतिहासकार डायोडोरस सिक्युलस (९०-३० ई.स.पु.) यांनी गंगारीडाई योद्धांचे चित्रण काहीसे असे केले आहे.
“या नदीला गंगा म्हणतात ज्याची रूंदी तीस स्टीडिया (साडे पाच हजार मीटर) आणि इतर कोणत्याही भारतीय नदीपेक्षा खोल आहे. यापलीकडे पुन्हा प्रासिओई व गंगारीडाई यांचे सैन्य होते. या सैन्याचा राजा झँड्रामस याच्याकडे वीस हजाराचे घोडदळ, दोन लाख पायदळ, दोन हजार रथदळ आणि चार हजार हत्तीदळ इतके सैन्य युद्धासाठी सज्ज होते. ही गंगा नदी, जी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. हि नदी पूर्वेकडील सीमारेषा बनविणासाठी मोठे योगदान देते. ह्या नदीचे पात्र खूप मोठे आहे शिवाय, ती ज्या जोरात महासागराला मिळते त्याकडे बघून वाटते जणू ती आपल्या घाटातले सारे पाणी महासागरामध्ये रिकामे करते आहे. ह्या देशात आकाराने प्रचंड मोठे आणि विशाल असे हत्ती आहेत. त्यांची संख्या जगातील इतर देशांच्या मानाने जास्त आहे.” निश्तिचपणे, गंगारीडाई योद्ध्यांच्या सैन्यबळाला घाबरून अलेक्झांडरने माघार घेतली होती.
रेशीम मार्गावरचे कोठार:
बंगाल हा भारतीय उपखंडातील पूर्व भागाचे प्रवेशद्वार होता. बंगालच्या उपसागरातून हिमालयाकडे जाणारा हा सर्वात छोटा आणि सोपा मार्ग आहे. अशा भौगोलिक फायद्यांमुळे बंगाल एक व्यावसायिक केंद्र झाले होते. ज्याने समुद्राला सुप्रसिद्ध रेशीम मार्गाशी जोडले.
महाभारतातील महत्व
पांडव राजा भीमाने पराभूत केलेल्या चित्रसेन आणि सानूद्रसेन या महाभारतात बंगाली राजांचा उल्लेख आहे. हे एका लोककथेबद्दल देखील सांगते की, भीमाला विषारी बाणाने जखमी केले होते आणि ते बरे होण्यासाठी बंगालच्या दक्षिणेकडील भागात गेला त्या प्रदेशाच नाव पत्राताल होतं. बंगालचा दक्षिणेकडील भाग सुंदरबनच्या खारफुटीच्या प्रदेशांचा होता. घटनाक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण असे आहे, तिसऱ्या शतकातील संस्कृतीचे अवशेष अलीकडेच सुंदरबनमधील पाथर प्रतिमा ब्लॉकमधील गोवर्धनपूरच्या पृष्ठभागाखाली सापडली आहे. त्या जागी औषधी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भांड्यांचे अवशेष सापडले आहेत. भीमाने हीच भांडी आपले औषध बनवण्यासाठी वापरली असतील असा अंदाज पुरातत्व अधिकार्यांनी लावला होता.
खाडीचे राजे:
नौदलाच्या विस्ताराकडे बंगालच्या राज्यकर्त्यांनी नेहमीच लक्ष दिले आहे. बंगाल, जावा, सुमात्रा आणि सियाम (आता थायलंड) मधील व्यापारी दुवे आताही सापडतात.उत्तर सोपे आहे. नौदलाच्या विस्ताराकडे बंगालच्या राज्यकर्त्यांनी नेहमीच लक्ष दिले आहे. बंगाल, जावा, सुमात्रा आणि सियाम (आता थायलंड) मधील व्यापारी दुवे आताही सापडतात. महावंशाच्या मते, श्रीलंकेच्या इतिवृत्तानुसार, बंगालचा राजा विजया सिम्हाने इ.स.पू. ५४४ मध्ये लंका आधुनिक काळातील श्रीलंका जिंकला आणि 'सिंहला' हे नाव दिले.