कलकत्त्यातला विलियम फोर्ट हा ब्रिटिशांचा भारतातील पहिला बालेकिल्ला होता. सिराज उद-दौलाहने तो किल्ला काबीज केला होता. त्याच्या मृत्युनंतर मात्र ब्रिटिशांनी त्याचा जिर्णोद्धार केला आणि आपली शस्त्रास्त्रे आणि दारु गोळा ठेवण्यासाठी वापरला. ब्रिटिशांचा तोफखानाही त्याच किल्ल्यावर होता. मुघल साम्राज्याच्या र्हासानंतर भारतीय संस्कृती आणि राजकारण ह्यांनी दिल्लीचे तख्त सोडुन कलकत्त्याची वाट धरली. कलकत्ता कालांतराने ब्रिटिश भारताची राजधानी झाली. १९११ पर्यंत कलकत्ताच ब्रिटिशांची राजधानी होती. ब्रिटीश काळात बंगालने दोन आपत्तिमय दुष्काळ पहिले आहेत. तसेच दोन विभाजनही याच काळात भोगली आहेत. बंगालासारखा समृद्ध प्रदेश तीन स्थलांतरणाच्या दुष्परिणामांच्या बळी गेला. ब्रिटीशांच्या राजवटीत बंगालवर दुर्दैवाने राज्य केले होते.
अविभाजित बंगाल
पहिल्यांदा संपर्क आणि वसाहतवाद्यांशी जवळीक असल्यामुळे, बंगाली समुदाय आधुनिक विज्ञान आणि साहित्यात सर्वात प्रगत झाला, ज्याने बंगाल नवजागृती केली.
बंगालच्या नवनिर्मितीचा काळ:
एकोणीसाव्या आणि वीसाव्या शतकात बंगाल प्रांतात, विलक्षण व्यक्तिमत्त्व आणि दूरदर्शी लोकांचा उदय झाला. विद्यार्थ्यांमध्ये मुक्त विचारसरणीला प्रोत्साहन देण्यात आले, जातीभेदाचा निषेध करण्यात आला आणि साहित्य आणि विज्ञान प्रगतीचे घटक म्हणून पाहिले गेले.
'आधुनिक भारताचे जनक' राजा राम मोहन रॉय हे नवनिर्मितीचे आणि समाजसुधारणेचे प्रणेते होते. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, स्वामी विवेकानंद, आचार्य जगदीश चंद्र बोस, सत्येंद्र नाथ बोस, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय आणि रवींद्रनाथ टागोर यांनी चळवळ पुढे आणली आणि बंगालला भारतातील प्रगती आणि संस्कृतीचा चेहरा बनवला.