दुर्गाोत्सव म्हणून ओळखली जाणारी दुर्गापूजा हा भारतीय उपखंडात सुरू होणारा वार्षिक हिंदू उत्सव आहे. जो हिंदू देवी दुर्गेला नतमस्तक जाण्याचा दिवस आहे. हे पश्चिम बंगाल, आसाम, ओडिशा, त्रिपुरा, बिहार, बांगलादेश देश आणि नेपाळमधील मिथिलांचल प्रदेशात विशेषतः लोकप्रिय आणि पारंपारिकपणे साजरे केले जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार अश्विन महिन्यात हा सण साजरा केला जातो. जो ब्रिटीश कॅलेंडरमध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात येतो. दहा दिवसांचा उत्सव असतो, ज्यातील शेवटचे पाच दिवस महत्वाचे आहेत. ही पूजा घरांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी केली जाते, ज्यामध्ये तात्पुरती स्टेज आणि स्ट्रक्चरल सजावट दर्शविली जाते. या सणाला शास्त्र ग्रंथांचे पठण, परफॉर्मन्स आर्ट्स, उत्सव, भेटवस्तुंची देवाण-घेवाण, कौटुंबिक भेटी, मेजवानी आणि सार्वजनिक मिरवणुका देखील चिन्हांकित केल्या जातात. हिंदू धर्मातील शक्तीपूजा परंपरेतील दुर्गापूजा हा महत्त्वाचा सण आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार, हा उत्सव महिषासुराच्या विरुद्ध लढाईतील देवी दुर्गेच्या विजयाचे चिन्ह आहे. म्हणूनच, वाईटावरील चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे, देवीचा उत्सव साजरा करणारा एक कापणी उत्सव आहे. सर्व जीवन व सृष्टीमागील मातृशक्तीची पूजा करणारा आहे.
दुर्गापूजा दरम्यान पूजली जाणारी मुख्य देवी दुर्गा आहे. पण उत्सवांमध्ये हिंदू धर्माच्या इतर मुख्य देवता जसे लक्ष्मी (संपत्ती आणि समृद्धीची देवी), सरस्वती (ज्ञान आणि संगीताची देवी), गणेश (बुद्धीची देवता), कार्तिकेय (युद्धाची देवता) यांचा समावेश आहे. बंगाली आणि ओडिया परंपरेनुसार, या देवतांना दुर्गेची मुले मानली आहेत. या महोत्सवाची सुरुवात महालयाने होते. असा समज आहे की, दुर्गेच्या शक्तीचा प्रवास हा तिच्या जन्माच्या घरून सुरु झाला आहे. प्राथमिक उत्सव सहाव्या दिवशी सुरू होतो. या दिवशी देवीचे विधीवत स्वागत केले जाते. हा उत्सव दहाव्या दिवशी संपतो. जेव्हा भक्त शाडूमातीच्या शिल्प-मूर्ती घेऊन नदीत किंवा अन्य पाण्याचे ठिकाणी जातात. त्या दिवशी या मूर्त्यांना घेऊन भक्त मिरवणूक काढतात आणि त्यांचे विसर्जन करतात. या मूर्तीचे विसर्जन हे दुर्गा देवी तिच्या वैइवहिक आयुष्यात परत गेलायचे प्रतीक म्हणून करतात. कैलास मध्ये भागवान शिवासह दुर्गादेवी विराजमान होते. उत्सवामध्ये प्रादेशिक आणि समुदायीक फरक अस्तित्वात आहेत.
दुर्गापूजा ही हिंदू धर्माची एक जुनी परंपरा आहे. चौदाव्या शतकात अस्तित्वात असणाऱ्या हस्तलिखितामध्ये दुर्गापूजेसाठी मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत. ऐतिहासिक नोंदीनुसार राजवंश व श्रीमंत कुटुंबे कमीतकमी सोळाव्या शतकापासून दुर्गापूजा उत्सव प्रायोजित करीत आहेत. बंगाल, ओडिशा आणि आसाम प्रांतात ब्रिटिश राजवटीत दुर्गापूजेचे महत्त्व वाढले. याचे कारण सणामुळे लोकांनी एकत्र यावे ही इच्छा होती. आजच्या काळात दुर्गापूजेचे महत्त्व जितके सामाजिक व सांस्कृतिक उत्सव म्हणून आहे, तितकेच ते धार्मिक म्हणूनही साजरे केले जाते. वर्षानुवर्षे, दुर्गा पूजा ही भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. २०१९च्या दुर्गापुचेचा मुद्दा राजभवनात गाजत आहे. या कर्जबाजारी पश्चिम बंगाल राज्य सरकारने पूजेचे आयोजन करणाऱ्या समित्यांना पंचवीस हजाराचे अनुदान देण्यात आले. परंतु त्या २०१९च्या वार्षिक बजेट मध्ये या अनुदानाची रक्कम साधारणपणे सत्तर करोड रुपये इतकी होती. हे म्हणजे हिंदू सणाच्या अनुदानाच्या नावाने तोंडाला पान पुसाल्यासारखे आहे.