महाराजांचे पाय थकले होते. अश्वाने कधीच जीव तोडला होता. महाराजांचे सर्व अंगरक्षक मारले गेले होते. जंगलांत विखुरली गेलेली सगळी मराठी सेना कदाचित मारली गेली होती. आदिलशाहीचे सैनिक आता छोट्या छोट्या तुकड्यांनी जंगलांत फिरून महाराजांचाच शोध घेत होते. महाराजांना ह्या जंगलाचा अनुभव नव्हता. पश्चिमेला एक नदी आहे हे ठावूक होते, नशिबाने साथ दिली तर नदी ओलांडता येयील आणि त्या नंतर पुन्हा सुरक्षित ठिकाणी जाता येईल असा त्यांचा विचार होता.

आपले स्वप्न उध्वस्त झाले आहे. कदाचित आपले सर्व सैनिक मारले गेले आहेत, आपले राज्य बालपणातच कदाचित मेले आहे हे महाराजांना बोचत होते. मला वाटले होते कि मी हिंदू साम्राज्य उभारेन, गनिमांना आपल्या देशांतून हद्दपार करेन आणि भारताच्या इतिहासांत आपले नाव कोरून ठेवेन असे स्वप्न आत भंगले होते. पुन फिरून आदिलशाहीच्या सैनिकांचा सामना करून वीर प्रमाणे मृत्यूला कवटाळले तर कदाचित कोणी माझ्या नावाची गाथा लिहितील असे महाराजांना वाटले.

"पण हरलेल्या लोकांच्या गाथा फार काळ लक्षांत राहात नाहीत. भले महाराणा प्रताप प्रमाणे पाने खावून आणि दगडावर झोपून दिवस काढले तरी हरकत नाही पण आपल्या हातांत देवाने जो काळ ठेवला आहे त्याचा सदुपयोग करून सर्व शक्तीनीशी युद्ध केले पाहिजे. आपले ध्येय उद्दात असून सहज सहजी प्राप्त होणारे नाही" महाराजांना आई साहेबांचे शब्द आठवले.

महाराजांचा घसा सुकला होता. जखमातील वॆदना युद्धाच्या आवेशांत लक्षांत येत नाहीत पण युद्धाचा आवेग ओसरला कि त्यांची जाणीव होते.

"निर्भायी हो असाच आशीर्वाद देते मी, पण मनात भय असल्याशिवाय माणूस शूर होवू शकत नाही. " महाराजांना पुन्हा आई साहेबांचे शब्द आठवले.

करवंदाची झाडी आजूबाजूला होती, अश्वथ आणि अशोकाची झाडे दाटी वाटीने उभी होती. आजूबाजूला घोड्यांचे किंवा सैनिकांचे आवाज येणे बंद झाले होते. आजूबाजूच्या झाडीतून वराहांचा थवा गेला असावा त्यांच्या पायांच्या खुणा अजून ताज्या होत्या. महाराज तसेच चालत पुढे गेले. पुढे एक घळी होती, घळीच्या वरून महाराजांना नदी दृष्टीस पडली. घळी उतरणे शक्य नव्हते. महाराज तसेच पाय ओढत पुढे गेले. आपली बोथट झालेल्या तलवारीचा टेकू घेत त्यांनी पुढे वाट आहे का पाहिले.

डाव्या बाजूला काही तरी हालचाल जाणवताच महाराजांनी आपली तलवार उचलली आणि सावध पाने फुलांनी भरलेल्या झाडीच्या मागे पहिले. रक्ताच्या थारोळ्यात कुणी तरी पडला होता. महाराजांनी अधिक सावध पाने पुढे पावूल टाकले. शत्रूचा एक सैनिक पडला होता. कदाचित जंगली वराहानी त्याला जखमी केला होता. पायाचे हाड पूर्ण पाने मोडून गेले होते. पोटाला एक घाव पडून आतड्यांचा काही अंश बाहेर आला होता, सैनिक ग्लानीत फार कमी आवाजांत कण्हत होता. महाराजांना काय करावे समजले नाही . शत्रू असला तरी त्या परिस्थितींत मदत करण्यासारखे महाराजा कडे काहीच नव्हते. कदाचित त्याला दया मरण द्यावे असा विचार महाराजांनी केला. महारजनी आपली तलवार त्याच्या गळ्यावर ठेवली. तो पोरसवदा महाराजा पेक्षा लहान असलेला सैनिक अचानक ग्लानीतून बाहेर आला. कदाचित वेदनेने किंवा महाराजांना पाहून त्याच्या चेहेर्यावर भय उत्पन्न झाले. "घाबरू नकोस, हे सर्व थांबेल" महाराजांनी आपली तलवार त्याच्या कंठांत घुसवली. गरम रक्ताचा फवारा उडून तो सैनिक अनंतात विलीन झाला.

"मेलेल्या सैनिकांना मारून पराक्रम गाजवत आहेत का महाराज" दुरून आवाज आला आणि महाराजांनी वळून पहिले.

अग्नीशिखाची आकृती उभी होती. "दया मरण होते ते." महाराजांनी तिला म्हटले.

"दया? दया देणारे तुम्ही कोण? दयेची गरज तुम्हाला आहे. तुम्ही हारला आहात, किमान हे युद्ध तरी. " अग्निशिखाने महाराजा कडे चालत येत म्हटले. तिच्या अंगावरील भगवे वस्त्र वार्यावर उडत होते.

"तू इथे काय करतेस?" महाराजांनी तिला प्रश्न केला. सर्व काही तिच्या आगमनाने  सुरु झाले होते हे महाराजांना आठवले.

"वाट पाहत आहे." तिने आणखीन क्लिष्ट उत्तर दिले. ती चालत त्या मृत तरुण सैनिकाच्या बाजूला बसली. पूर्वीप्रमाणे तिचा अवतार भयानक आणि घाणेरडा दिसत नव्हता. काली पासून गौरी  अस तिचा अवतार झाला होता. तिच्या गोर्यापान हातानी तिने त्या सैनिकाचे डोळे बंद केले. महाराजान तिचे सौंदर्य दैवी आणि पवित्र वाटले.

"किती तरी प्रकारचे पुरुष युद्धा साठी बाहेर सरतात. पण सर्वच सैनिक दयेस पात्र नसतात. काही कोमल हृदयी पति असतात तर काही प्रेमळ भाऊ. एक दिवस आपल्या सारखे एखादे महाराज आणि सरदार येतात आणि आपल्या शब्दांनी किंवा भयाने त्यांना  युद्ध्वर नेतात. उपाशी पोटी, मिळेल ते हत्यार घेवून भाऊ-भाऊ, वडील-मुलगा अश्या युद्धांत लढतात जिथे कोण कश्या साठी लढतो हेच त्यांना ठावूक नसते. काही मरतात तर काही आपल्या मुलांना, भावंडाना, मित्रांना युद्धांत मरताना पाहतात. शरीरावरचे घाव भरले तरी मनावरचे व्रण घेवून ते जगतात. वेळ जातो तसे त्यांचे सगळे मित्र मारून जातात, एक सरदार जावून दुसरा येतो, आज हा किल्ला तर उद्या दुसरा सर होतो. मागे बायका मुलांचे काय झाले त्यांना माहिती नसते. जिवंत राहून सुद्धा त्यांच्या जीवनाला अर्थ नसतो. सांग मला , त्या जखमी सैनिकाला जी दया दाखवली ती त्या जिवंत सैनिकांना कधी भेटेल ? " अग्निशिखाने महाराजांना पोटतिडकीने विचारले.

महाराज खाली बसले  पाठ एका अश्वथ वृक्षाला टेकवली होती. त्यांनी श्वास भरत अग्निशिखा कडे पाहिले.

"आम्हा सर्वांनाच आपले ओझे वाहून न्यावे लागते देवी. मी ४ वर्षांचा होतो, जेंव्हा इतर मुले लाकडी खेळण्यांनी खेळायची तेंव्हा पासून मी अवजड तलवारी चालवायला शिकायचो. आई साहेबांनी मृत्यूची ओळख लहान पणा पासूनच करून दिली होती. माझा ५  व नामकरण दिवस होता तेंव्हा आम्ही एका जंगलातून चालत होतो, बरोबर सुमारे ४-५ सैनिक होते. वाटेत एक गांव लागले. मुघलांचा सेनेने त्या गावावरून गाढवाचा नांगर फिरवला होता. तिथे असेलेल्या शिव मंदिराला जमीनदोस्त करून शिवलिंगाचे तुकडे करून ठेवले होते. गावांतील स्त्रियांची नग्न बलात्कारित शरीरे झाडावर फास लावून ठेवली होती. मी आई साहेबाना ह्याचा अर्थ विचारला तेंव्हा त्यांनी सांगितले कि आम्ही आपल्या माणसांचे रक्षण करण्यास समर्थ नाही म्हणून शत्रू हा अत्याचार चालवत आहे."

"माझ्या खांद्यावरच्या ह्या ओझ्याचे काय देवी ? हजारो मराठी सैनिक आज माझ्या साठी मारले गेले. यमदेव माझ्या आत्म्याला नेताना मला हे सर्व आत्मे दिसतील. त्यांना उत्तर देण्याचे ओझे आणखी कोणी वाहून नेईल देवी? आज रात्री माझ्या राज्यातील किती तरी माता भगिनी विधवा झाल्या असतील, त्यांनी लहान मुले जेंव्हा त्यांना आपल्या वडीला बद्दल विचारातील तेंव्हा त्यांना हुंदका आवरता येणार नाही आणि ते ओझे माझ्या खांद्यावर असेल. दया ही चैन आहे देवी, मी असेन राजा पण मला परवडणारी नाही. "

अग्निशिखाने महाराजाकडे सहानभूतीने पहिले.

"मृत्युच्या देवतेला मी भीत नाही पण माझ्या पूर्वजांनी जी गांवे वसवली, ज्या नदीच्या किनार्यावर ब्राम्हणांनी संध्या वंदन केले, ज्या नदीच्या किनार्यावर माझ्या पूर्वजांनी चिरनिद्रा घेतली इथे मी ह्या मूर्ती भंजक म्लेंच्छाना मी त्यांची क्रूरता दाखवू देणार नाही. भले मला नरकाच्या आगींत जाळावे लागेल पण लहान अर्भकांना त्यांच्या मातेच्या स्तना पासून ओढून काढून मारणाऱ्या ह्या परदेशी आक्रमकांचे हात मी छाटून टाकेन. एक दिवस जात जिवंत राहिलो तर सुद्धा लढेन. " महाराजांचे शब्द त्यांच्या पोटतिडकीतून येत होते.

"आपल्या रक्तांत ती धमक आहे महाराज. म्हणूनच गुरुदेवांनी मला तुमच्या कडे पाठविले आहे. मला ठावूक नव्हते कि तुम्ही पात्र आहात कि नाही पण तुमच्या मातोश्रीची भेट झाली आणि खात्री झाली. तुमच्या मातोश्री तुम्हाला रत्नागिरीच्या देवराई मध्ये भेटतील तुम्हाला तिथे जाणे आवश्यक आहे. मी तुम्हाला मदत करायला आले आहे." अग्निशिखा चे शब्द महाराजांना दिलासा देणारे होते.

"मी कसली मदत करू शकतो देवी ? माझ्या कडे सैन्य नाही. मी आणि आई साहेब युसूफच्या सैन्याकडून कसे पळून जातील ? आई साहेबाना वडिलां कडे जायला पाहिजे होते. " महाराज उद्विग्न मनस्तीतीत होते.

"आपले चिलखत द्या महाराज, युसूफच्या सैन्याला मी दिशाभूल करून पाठवेन. आपण हि घळी उतरून जा. खाली एक पायवाट दिसेल. त्याने चालत जा. काही अंतरावर तुम्हाला शत्रू सैन्याचे दोन घोडे दिसतील. सैनिकांना आधीच मी मारले आहे. ते घोडे घेवून तुम्ही तसेच पुढे गेलात तर तुम्हाला भिल्ल लोकांचे एक गांव दिसेल, इथे उङ्गा भिल्ल तुम्हाला पुढची दिशा दाखवेल. रत्नागिरीच्या देवराईत आदिशती देवीचे मंदिर आहे. तिथे आपली आई साहेब आपणाला भेटेल. मी सुद्धा तिथे पोचेन. महावराहाच्या भक्तांची मुक्ती आपल्या हातांत आहे, एकदा ती साध्य झाली कि स्वराज्य आणण्यासाठी जी मदत पाहिजे ती सुद्धा तुम्हाला भेटेल." बोलत बोलला अग्निशिखाने महाराजांचे चिलखत उतरवले.

वजन कमी होतंच महाराजांना बरे वाटले. अग्निशिखाने आपल्या झोळी मधील दिव्य लेप महारजांच्या जखमावर लावला. लेपाने जखमा अधिक तीव्र झाल्या.

महाराज उठून उभे राहिले आणि त्या औषधी किती दिव्य होत्या ह्याची प्रचीती त्यांना आली. अंगात नवीन उर्जा संचारली होती. वेदना होत्या पण मरगळ गेली होती. आता त्यांना घळी उतरायची होती. अग्निशिखाने त्यांना सोपा मार्ग दाखवला. महाराज खाली उतरले नदीचा प्रवाह वेगवान नव्हता त्यामुळे पोहून जाणे मुश्किल नव्हते.

पोहून जाताना अग्निशिखा आपले चिलखत घेवून नक्की काय करेल असा विचार महाराजांच्या मनात आला.

----
अग्निशिखा ने महाराजांची तलवार उचलली. तलवार अतिशय उत्कृष्ट धातूची होती. पण युद्धांत अति वापरणे बोथट बनली होती. तिने आपल्या झोळीतून छोटासा दगड काढला आणि तिने तलवारीला धार देणे सुरु केले. काही अवकाश झाला होता आणि तिला घोड्याच्या टापा ऐकू आल्या. ती उठून उभी राहिली. घोड्यावरून एक गनीम सैनिक आला. "तू तीच वेडी संन्यासिनी ना ? " त्या सैनिकाने विचारले. तो सैनिक गनीमाच्या वेशांतील सोमनाथ होता.

"स्मरण शक्ती चांगली आहे सोमनाथ." ती उत्तरली. "तुझीच वाट पाहत होते" तिने सांगितले.

तिच्या हातांतील महाराजांची तलवार सोमनाथने ओळखली. महाराजांचे चिलखत सुद्धा जवळ खाली पडलेले होते आणि एक मृत शरीर सुद्धा होते. ते पाहून सोमनाथच्या हृदयांत धडकी भरली त्याने घोड्यावरून उडी मारली. मृत शरीर महाराजांचे नव्हते हे पाहून त्याच्या जिवंत जीव आला.

अग्निशिखा ने महाराजांची तलवार उचलली. तलवार अतिशय उत्कृष्ट धातूची होती. पण युद्धांत अति वापरणे बोथट बनली होती. तिने आपल्या झोळीतून छोटासा दगड काढला आणि तिने तलवारीला धार देणे सुरु केले. काही अवकाश झाला होता आणि तिला घोड्याच्या टापा ऐकू आल्या. ती उठून उभी राहिली. घोड्यावरून एक गनीम सैनिक आला. "तू तीच वेडी संन्यासिनी ना ? " त्या सैनिकाने विचारले. तो सैनिक गनीमाच्या वेशांतील सोमनाथ होता.

"स्मरण शक्ती चांगली आहे सोमनाथ." ती उत्तरली. "तुझीच वाट पाहत होते" तिने सांगितले.

तिच्या हातांतील महाराजांची तलवार सोमनाथने ओळखली. महाराजांचे चिलखत सुद्धा जवळ खाली पडलेले होते आणि एक मृत शरीर सुद्धा होते. ते पाहून सोमनाथच्या हृदयांत धडकी भरली त्याने घोड्यावरून उडी मारली. मृत शरीर महाराजांचे नव्हते हे पाहून त्याच्या जिवंत जीव आला.

"महाराज कुठे आहेत ? " त्याने प्रश्न केला.

"सुरक्षित आहेत, पण तुझी मदत हवी आहे त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी'. तिने महाराजांचे चिलखत उचलत सांगितले.

"कसली मदत ? "

"हे चिलखत तू घाल आणि आम्ही पळून जावू शत्रूच्या सैनिकांना अश्या प्रकारे दिशाभूल करून आम्ही पूर्वेच्या दिशेने ओढून आणू त्यामुळे पश्चिम दिशेने पळून जाण्यास मदत होईल."

सोमनाथला तिचा विचार समजला पण १० हजार घोडेस्वरांना आपण हातावर तुरी देवून कसे पळून जावू हे त्याला समजले नाही. त्याशिवाय पकडला गेल्यानंतर आपले हाल करून ते महाराज कुठल्या दिशेने गेले ते समजतीलच.

सोमनाथने चिलखत परिधान केले. अग्निशिखाने त्याला महाराजा सारखे दाखवायला काहीही तडजोड केली नाही. अगदी हजार माशा, बाजूबंद इत्यादी चढवायला अग्निशिखाने त्याला मदत केली.

सगळे परिधान केल्या नंतर सोमनाथ ने तिच्या कडे महाराजांच्या तलवारीची मागणी केली.

अग्निशिखाने महाराजांची आत्ता धार काढलेली तलवार उचलली पण हातात देण्या पूर्वी तिला काही शब्द बोलायचे होते.

"सोमनाथ, आमच्या आयुष्यांत अनेक महत्वाच्या घटना घडतात. काही चांगल्या तर काही वाईट. कुणाचा लहान पुत्र ज्वराने मारतो तरी कोणी स्त्री प्रसव वेदनेत लहानगा मागे ठेवून मारते. एका तीराने योद्ध्ये युद्ध हरतात तर चुकीचा लग्नात अडकून सुंदर राजकुमारी पतीच्या रखेली सोबत कुंठलेले जीवन जगतात. वाईट  घटना घडल्या कि दैव किंवा विधीलिखिताला दोष दिला जातो. अश्या घटना चुकवत येत नाहीत म्हणून आम्ही आपल्या मनाला समजावतो, पण खरे म्हणजे कुठलीही घटना बदलता येते. विधीलिखित म्हणून काहीही नसते. पण काळाला निर्णायक गती देणारे क्षण जेंव्हा आपल्या समोर असतात तेंव्हा जे करायला पाहिजे ते करायची मानसिक ताकद आपल्या कडे नसते म्हणून आम्ही भविष्यात वाईट घटनांना सामोरे जातो. कधी कधी काळाच्या प्रवाहाला गती देण्यासाठी. काही कर्मे करावी लागतात जी कदाचित समाजाला आवडत नाहीत. "

'भाषण करण्यात वेळ का दवडते आहेस ? शत्रूचे टेहळणी स्वार इथे लवकरच पोचतील. " सोमनाथने आपली नापसंती दाखवली नाही.

"मला क्षमा मागता येत नाही सोमनाथ, पण तू त्यास प्राप्त आहेस" अग्निशिखा.

"क्षमा का ?" सोमनाथने विचारले.

अग्निशिखा विद्युतलते प्रमाणे फिरली. ती इतकी चपळ होती कि सोमनाथ काहीही करू शकला नाही. अग्निशिखाने एकाच वारांत सोमनाथचे धड वेगळे केले. सोमनाथचे निष्प्राण शरीर खाली कोसळले. अग्निशिखाच्या गोर्यापान शरीरावर रक्ताचे शिंतोडे उडाले. तिने तलवार भिरकावून खाली नदीत फेकली.

"महाराजांचे मृत शरीर भेटतांच युसुफ आणखीन शोध घेण्याचा प्रयत्न करणार नाही.  महाराजांचा चेहरा कुणी पाहिलाय ? " अग्निशिखाने असे म्हणून अश्वावर उडी मारली.

---

युद्ध शिंगाचे आवाज कमी झाले होते. युद्धभूमीवर होणार्या प्रत्येक हालचालीची बातमी युसुफ ला आपल्या शामियानात मिळत होती. संध्याकाळी सुरु झालेले युद्ध दुपार पर्यंत संपले होते. सुमारे ३००० मराठी सैनिकांची शवे युद्धभूमीवर पडली होती. काही शेकडो सैनिक जखमी अवस्थेंत पकडले गेले होते. तक्षक सेनेचा बिमोड करायला गेलेले सरदार कमाल आणि अमीनुद्दीन परतीच्या प्रवासावर होते. युद्धभूमी वरील प्रचंड विजयाने सेनेत फार मोठा जल्लोष पसरला होता. मराठी बंद्खोराविषयी अनेकांनी जे वलय केले होते ते निष्फळ ठरले होते. 

युसुफ ने दुपारचा नमाज पडून आपल्या मेजावर आलेली नवीन माहिती पहिली. इतक्यांत सय्यद आंत आला. 

"बंडखोर राजाचे शव प्राप्त झाले आहे सरदार" त्याने सांगितले. 

"छान ! ज्याने शीर छाटले त्याला १० चांगले अश्व, १०० सुवर्ण मुद्रा आणि किमान दोन गांवे जहागिरीत द्यावी असे पत्रक द्या" युसुफ ने हुकुम केला. 
"त्या शिवाय  ते शीर भाल्याला लावून इथे लोकांना पाहण्यासाठी ठेवावे" युसुफने पुढे सांगितले. 

"कोणी शीरस्च्छेद केला हे समजले नाही सरदार. महाराजांचे शरीर जंगलांत मिळाले. बाजूला एक आमचा सैनिक सुद्धा मारून पडला होता. अश्वाची चिन्हे सुद्धा होती" सय्यद ने माहिती दिली. 

युसुफने चेहऱ्यावर भाव दाखवले नाहीत, फक्त सय्यद कडे रोखून पहिले. 

"त्यांनी महाराजांचे चिलखत घातले होते,  त्यांचा चेहेरा आमच्या माहितीशी मिळता जुळता होता. " सय्यद ने समजून स्पष्टीकरण दिले. 

"चालणार नाही." हे मराठे सहजा सहजी हर मानणारे नाहीत. आपल्याच एका सैनिकाला त्यांनी महाराजांचे कपडे घालून इथे टाकले असेल. आमच्या सैनिकांनी त्याला मारला असता तर बक्षीस घेण्यासाठी १० जन हजर झाले असते. जंगलाच्या प्रत्येक कोपरा शोधा. जंगलांत आदिवासी भिल्ल वगैरे असतील तर त्यांना बक्षीस देवून नजर ठेवायला सांगा. कोणीही वाचता कामा नये. 

"तोरणा किल्ल्यावरून महाराजांची आई निसटून गेली अशी खबर आहे. कुठल्याही परिस्थितींत तिचे शीर सुद्धा मला पाहिजे. कासीम काद्री कडे चांगले शिकारी आहेत, त्यांना वापरून जंगल शोधा आणि अल्लाह्बाक्ष ला ३ हजार स्वार घेवून प्रत्येक गांव शोधत तोरणा पर्यंत जायला सांगा. ज्याला महाराजांची किंवा त्यांच्या आईची माहिती असेल त्याला त्याला १०० सुवर्ण मुद्रांचे बक्षीस आणि त्यांचे शीर घेवून येणार्यास १००० मुद्रांचे बक्षीस घोषित करा. " युसुफ अज्ञ देत होता तेंव्हा त्याच्या शमियनच्या बाहेर त्याला गडबड गोंधळ ऐकू आला. सय्यद बाहेत जावून पाहणार त्याच्या आधीच अल्लाहबक्ष, कासीम काद्री, मीरखान आणि इतर चार सरदार आंत आले. त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट होता. 

सय्यद चा हात आपल्या तलवारी जवळ गेला. युसुफने आधी पासूनच आपल्या अंगरक्षकांना जवळपास ठेवले होते. 

अल्लाहबक्ष ने आपल्या कमरेतून एक कागद काढला. "ह्याचा अर्थ काय आहे सरदार" त्याने कागद हातांत ठेवला. 

युसुफने कागद वाचून सर्व सरदाराना पहिले. 

"माझ्या हेरांनी हि खबर आणली होती पण जोपर्यंत खात्री होत नाही तो पर्यंत सांगणे मला बरोबर वाटले नाही. पण तुमच्या बायकोने जर पत्र पाठवून तुम्हाला कळवले असेल तर खबर खरी आहे असे मानण्यास हरकत नाही. पण आम्हाला काय फरक पडतो ? आदिलशाही चे रक्षण करणे आमचे कर्तव्य आहे, शाह असो वा शहजादा कोणीही गाडीवर असला तरी आमची मोहीम बदलत नाही" युसुफ ने सांगितले. 

"पण आपणाला तत्काळ परत यावे असे अनेक संदेश शाहजादानी पाठवले होते असे आमच्या बेगमने पत्रांत लिहिले आहे सरदार, तुम्ही जाणून बुजून आमच्या नवीन शहांच्या आज्ञेचे उल्लंघन केले आहे असेच इतर सरदार समाजात आहेत" 

"इतर सरदारांच्या वतीने बोलायचं अधिकार तुम्हाला कोणी दिला अल्लाहबक्ष. इथल्या सेनेचा सेनापती मी आहे. तुमच्या १५ बेगम मधील एक बेगम काय पत्र लिहिते ह्यावर आमची मोहीम ठरवू काय आम्ही?" युसुफ च्या आवाजांत जरब होती. ६ फुट उंचीचा अगडबंब अल्लाह बक्ष सुद्धा थोडा चरकला. 

"आदिलशाहिचे तुम्ही जितके सेवक आहात तितकाच मी सुद्धा आहे.  पण ऐकीव माहितीवर मी मोहीम अर्धी सोडून येणार नाही. शहजादाजेंव्हा मला हुकुम देईल  तेंव्हाच परत जाण्याचा हुकुम मी देईन" युसुफने सांगितले. 

"माफी असावी सरदार. पण आम्ही युद्ध जिंकले आहे. मराठी सैन्याची पूर्ण वाताहत झाली आहे आता तत्काळ बिजापूर मध्ये जाणेच शाहन पानाचे ठरेल. आमच्या घरी सुद्धा हुकुम पोचला आहे कि आम्ही युसुफ ची साथ सडून तत्काळ बिजापूर मध्ये परत यावे. आणि आम्ही आज संध्याकाळीच परतीचा प्रवास करणार आहोत." कासीम काद्री जातीने शिकारी होता, त्याचा पेहेराव एखाद्या गरीब माणसाप्रमाणे असायचा पण त्याच्या शब्दांत मात्र जबर अदब होती. 

"सेनापतीची आज्ञा तोडणे हा राजद्रोह आहे कासीम. बिजापूर मधून कोणताही संदेश आमच्या कडे आलेला नाही. आणि अश्या परिस्थितीन मोहीम पुढे चालू ठेवावी हि आमची आज्ञा तुम्हाला आहे. आमची आज्ञा तोडली तर राजद्रोही म्हणून तुम्हाला हत्तीच्या पाई मला द्यावे लागेल. " युसुफने कासीम ला दम भरला. 

"हम्म …." इतक्या वेळ शांत असलेल्या मीरखान ने गळा साफ केला. "राजाचा न्याय आम्हाला मान्य असेल सेनापती, शहाचा हुकुम असेल तर जहन्नुम च्या आगीत सुद्धा आम्ही चालू पण उपलब्ध पुराव्या नुसार शहाची इच्छा आम्ही परत यावी अशीच आहे. त्यामुळे आपले सैन्य घेवून मी मागे जात आहे. भलेही तुम्हाला मला हत्तीच्या पायी द्यायचे असेल पण ते तुम्हाला बिजापूर मध्ये येवून करावे लागेल.” 

युसुफ ने मीर खान आणि इत्यादी कडे रोखून पहिले. त्याला आधीपासूनच ह्या सरदारांचा भरोसा वाटत नव्हता. "ठीक आहे मीरखान, आपणा लोकांना बिजापूर ला जायचे असेल तर तत्काळ निघा. पण माझ्या कडे द्रोह करून जाणार्यांना दुनिया छोटी पडेल. शाह कडे माफीची भिक आधीच मागून ठेवा. माझा आणखीन समय बरबाद करू नका" 

युसुफ ने आपल्या मेज कडे तोंड केले आणि इतर सरदार पाय आपटीत निघून गेले. सय्यद ने पुढची अज्ञ म्हणून युसुफ कडे पहिले. 

"ह्या सरदाराना जायचे असेल तर जावू दे. माझे जे कोणी सरदार असतील त्यांना घोडे तयार ठेवायला सांग आम्ही पश्चिम दिशेला जावू. दिलावर खान चा मृत्यू आणि ह्या पोराची मोहीम ह्यांत काही तरी संबंध आहे असे मला वाटते. आपले काही स्वर पुढे पाठव, मराठी बंडखोर आणि त्यांची आई कुणी सापडतेय का ते बघ. नाही तर आपले सैन्य जंगलातून जाताना त्याला भुई थोडी वाटेल." युसुफ ने आज्ञा दिली. 

सय्यद बाहेर गेला तसा युसुफ ला पुन्हा रात्रीचे स्वप्न आठवले. त्याच्या स्वप्नांत एक काळभोर भुजंग दिसला होता. तक्षक सेना चे नाव काफिर लोकांच्या एका सापाच्या देवावरून आले आहे हे त्याला ठावूक होते पण युसुफ च्या सैन्याने तक्षक सेनेचा सहज पराभव केला होता. रत्नागिरीच्या देवराई मध्ये आता दिलावर खानच्या मृत्यूचे गूढ उलकाने आणि मराठी बंडखोर महाराजाचे शीर कापून भाल्यावर लावणे हि दोन कामे बाकी होती. 

चिस्ती फकीर भोंदू निघाला होता. ह्या मराठी राजाच्या रक्तांत काही विशेष नव्हते. जिवंत असला तरी बिन किल्ल्यांचा आणि बिन सेनेचा राजा कुणाचे काय वाकडे करू शकतो ? 
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel