या युक्तिवादांच्या ऐतिहासिक अचूकतेबद्दल विद्वानांमध्ये मतभेद आहेत. आदि-विश्वेश्वर परिसर हे शिवलिंगाचे मूळ निवासस्थान असल्याच्या कल्पनेची पुष्टी करण्यासाठी डायना एल. एक  हिला मध्ययुगीन इतिहास सापडला; तथापि, अनेक विद्वानांनी ‘डायना एल एक’ हिच्या मध्ययुगीन स्त्रोतांच्या असंदर्भ वापरावर टीका केली आहे.

हंस टी. बेकर मोठ्या प्रमाणावर या कथनाच्या व्यापक जोराची पुष्टी करतात, तसेच. त्याच्या मध्ययुगीन स्त्रोतांच्या वाचनावरून, तो मान्य करतो की ११९४ मध्ये नष्ट झालेले मंदिर कदाचित अविमुक्तेश्वराला समर्पित होते आणि सध्याच्या ज्ञानवापी परिसरात स्थित आहे.

साधारण १३व्या शतकाच्या उत्तरार्धात, रझिया मशिदीने "विश्वेश्वराच्या टेकडीवर" कब्जा केल्यामुळे, हिंदूंनी विश्वेश्वराच्या मंदिरासाठी रिक्त ज्ञानवापीवर पुन्हा दावा केला होता. हे नवीन मंदिर जौनपूर सल्तनतने त्यांच्या नवीन राजधानीत मशिदींसाठी बांधकाम साहित्य पुरवण्यासाठी नष्ट केले.

माधुरी देसाई मात्र हे मत फेटाळून लावते. तिच्या गाडावाला साहित्याच्या वाचनात तिला मंदिरांचे दुर्मिळ असे उल्लेख केलेले आढळतात; जर ती मंदिरे अस्तित्त्वात होती तर ती निश्चितच प्रमाणात लहान आणि नगण्य होती.याउलट १२ व्या शतकाच्या सुरुवातीचा 'निबंध कृत्यकल्पतरू, मध्ये शहरात कोणतेही मंदिर नसून अनेक शिवलिंगांचा संदर्भ आढळतो त्यापैकी एक विश्वेश्वर होता आणि त्याला कोणतेही अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले नव्हते. एकंदरीत, सुरुवातीच्या-मध्ययुगीन बनारसमधील विश्वेश्वर मंदिराचे अस्तित्व तिला संशयास्पद वाटते.

साधारण १२ व्या आणि १४ व्या शतकाच्या दरम्यान विश्वेश्वर लिंगाने हिंदूंच्या धार्मिक जीवनात एक लोकप्रिय स्थान व्यापण्यास सुरुवात केली; चौदाव्या शतकातील काशीखंडच्या लेखकांनी स्कंद पुराणात विश्वेश्वराला काशी शहराची प्रमुख देवता म्हणून समाविष्ट करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले आणि प्रथमच अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये विश्वेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य दिले. विश्वेश्वर लिंगाची लोकप्रियता आणि महत्त्व या वाढीचे तपशील आणि संदर्भ हे मजकूर आणि इतर ऐतिहासिक पुराव्यांवरून निश्चित केले जाऊ शकत नाहीत.

त्यानंतरही, पंधराव्या आणि सोळाव्या शतकातील निरनिराळ्या 'निबंध' भाष्यकारांनी वेगवेगळ्या पवित्र स्थळांवर आणि त्यानुसार काशी तीर्थाच्या पवित्र जागेची त्याच्या लेखनामध्ये पुन्हा उल्लेख केला आणि बनारसमधील अनेक पवित्र स्थळांपैकी ते एक अत्यंत महत्वाचे तीर्थस्थळ ठरले. सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून सुरू झालेल्या हिंदूवादी सक्रियतेमुळे विश्वेश्वराचे शहराच्या प्रमुख देवस्थानात रूपांतर झाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel