हा मूळ लेख http://techmr.wordpress.com वर अक्षय सावध यांनी लिहिला असून येथे प्रकाशित झाला आहे; येथे तो परवानगीने पुन:प्रकाशित केला आहे.

आजच्या जगात ज्ञान हेच धन आहे. आज ज्याच्या जवळ जास्त माहिती तो जास्त सुरक्षित आहे. त्याच मुळे आज ज्ञानाची किंमतही वाढली आहे. जसे की, कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घ्या किंवा कोणतेही पुस्तक घ्या, ते फ़ारच महाग झाले आहे. बरेचदा महागाईमुळे आपल्याला आपल्या ज्ञानाच्या भुकेला मुरड घालावी लागते.


जर हे सर्व ज्ञान मोफ़त उपलब्ध झाल्यास किती छान होईल. असाच विचार ’जिमी वेल्स’ यांनी केला व त्यावर कृती सुध्दा केली. त्यातूनच Wikipedia चा जन्म झाला. ज्ञानाचे अपरिमीत भंडार लोकांसाठी खुले झाले, ते पण मोफ़त. आपल्या पेकी बरेच लोकांना याबद्दल माहीती असेल पण Wikipedia बरोबरच Wikimedia या समुहाचे अजुन अनेक प्रकल्प आहेत. ते सुध्दा अनेक भाषेतुन उपलब्ध आहेत. हे सर्व मराठीत सुध्दा उपलब्ध आहे. त्याच बद्दल आपण जाणून घेवू.

विकिपीडिया

विकिपीडिया

विकिपिडीया हा प्रकल्पाचा उद्दिष्ट जगातील सर्व भाषेत ज्ञानकोष तयार करणे हा होय. विकिपिडियाचा जन्म १ जानेवारि २००१ ला झाला. आता यात २७३ विविध भाषेत १ करोडच्या वर लेख आहे. यात सर्वात समोर इंगजी भाषा आहे. मराठीत आता ३२,२५६ विविध विषायावरिल लेख आहे व ते वाढत आहेत.
याच प्रमाणे विकिपिडियाचे अनेक प्रकल्प आहेत ते आपण एकेक करुन पाहू.

१. Wikipedia – मुक्त ज्ञानकोश

ह्या प्रकल्पात विविध विषयावर लेख लिहिले आहे. हे लेख मायाजाळावरिल स्वयंसेवक लिहितात. आपल्याला जर संगणक विषयी, नायजेरिया बद्दल किंवा भारताचा इतिहास जाणायचा असेल तर येथे सर्व उपलब्ध आहे. हि माहिती मराठीतही उपलब्ध आहे.
दुवा – http://en.wikipedia.org
मराठी विकिपिडियाला भेट देण्यासाठी – http://mr.wikipedia.org

२. Wiktionary – शब्दकोश

ह्या प्रकल्पात विविध भाषी मोफ़त शब्दकोश प्रत्येक भाषेत तयार करायचा आहे. याचा अर्थ एका भाषेचा उपयोग करुन सर्व भाषेतील सर्व शब्दाची व्याख्या करने. या प्रकल्पाची सुरुवात दिसेंबर २००२ ला झाली. आतापर्यंत यात १५० विविध भाषेत ३० लाख शब्द साठा आहे.दुवा – http://en.wiktionary.org
मराठीतील प्रकल्प दुवा – http://mr.wiktionary.org.

मराठीतील लेख लिहिण्यासाठी आपण मराठी विकिपिडियावर जावे व मराठीतील लेखांची संख्या वाढवावी.

३. Wikiquote – अवतरणे

यात विविध प्रसिध्द लोकांचे, पुस्तकातील वा चित्रपटातील अवतरणे घेतली आहे. यात म्हणी , वाक्यप्रचार, घोषणा इ चा समावेश आहे. याची सुरुवात जुले २००३ मध्ये झाली. दुवा – http://en.wikiquote.org/wiki/Main_Page
मराठीतील प्रकल्प दुवा – http://mr.wikiquote.org

४. Wikibooks – ग्रंथसंपदा

या प्रकल्पात मोफ़त इ-पुस्तके, विविध भाषा अभ्यासक्रम इ. चा साठा तयार करणे. याच मुख्य उद्देशः विद्यार्थाना व शिक्षाकांना स्वसाहायता व्हावी याकरीता. येथे विविध पुस्तके मिळू शकतात.
याचा दुवा – http://en.wikibooks.org/

५. Wikisource – स्त्रोतपत्रे

हा विविध भाषेतील प्रकल्प नोव्हेंबर २००३ ला मोफ़त व उपलब्ध असलेले कागदे जमा करण्यासाठी सुरु झाला. यामुळे आता महत्वाचे अनेक कामे जसे की कोणत्याही देशाचे संविधान इ गोष्टी साठवून ठेवता येतात व त्याचे भाषांतर सुद्धा करता येते. यात आता पर्यंत ८.८ लाख विविध कागदे जमा झाली आहे. येथेच मला भारतीय संविधान भेटले.
याचा दुवा – http://en.wikisource.org/

६. Wikiversity – विद्यापीठ

हा प्रकल्प माहिती, शिकण्यारे समूह सोबतच संशोधन करण्यासाठी वाहिलेले आहे. याची सुरुवात १५ ऑगष्ट २००६ ला झाली. हा फ़ार महत्व पुर्ण प्रकल्प आहे. हा फ़क्त विश्वविद्यालया संबधीतच नाही तर कोणत्याहि पातळीवरिल विद्यार्थास मदत होइल असे आहे. यात २०१० पर्यत ३०,००० प्रवेश आहेत.
याचा दुवा – http://en.wikiversity.org/wiki/Wikiversity:Main_Page

७. Wikimedia Commons- सामायिक भंडार

या प्रकल्पात मोफ़त छायाचित्रे, नकाशे , व्हिडिओज, अ‍ॅनिमेशन इ चा समावेश आहे. याची सुरुवात सप्टेंबर २००४ ला झाली.
याचा दुवा – http://commons.wikimedia.org/

८. Wikispecies – प्रजातीकोश

या प्रकल्पात विविध सजीव प्राण्यांबद्दल माहिती भेटेते. याची सुरुवार १४ सप्टेंबर २००४ ला झाली. हा प्रकल्प खास करुन वेज्ञानिक गोष्टी साठी आहे. यात २०१० पर्यंत २४ लाख लेख आहेत.
याचा दुवा – http://species.wikimedia.org/

याच बरोबर खालील काही प्रकल्प आहे.

९. Wikinews – बातम्या

यात विविध बातम्या लिहिता येतात. याचे मुख्य काम म्हणजे बातमीची खात्री करणे व विश्वासह्रायता तपासणे हे होय.
दुवा – http://en.wikinews.org/wiki/Main_Page

१०. Media Wiki

हे एक सॉफ़्ट्वेअर आहे. जे की सर्व Wikimedia समुह व इतर संकेतस्थळे वापरतात.
दुवा- http://meta.wikimedia.org

याच प्रमाणे अनेक प्रकल्प wiki- वा -pedia या नावाने सुरु आहेत. पण वरिल १० प्रकल्प सोडुन कोणताही प्रकल्प Wikimedia या समूहाचा नाही. त्याच प्रमाणे Wikimedia वरिल सर्व माहिती वाचनासाठी व वापरण्यासाठी मोफ़त आहे.

याच वर्षी विकिपिडियाला १० वर्षे पुर्ण झाली. आता विकिपिडिया भारतातकडे खास लक्ष देणार आहे. त्यासाठी त्यांनी भारतीय भाषेचा प्रकल्प सुरु केला आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला ते कळवा. त्याच प्रमाणे अधिक माहिती असल्यास सर्वांसोबत वाटा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel