टेक मराठीच्या पहिल्या सभेत मी मराठी लेखना साठी उपयुक्त अश्या काही साधनांबद्दल माहिती दिली होती. ही सभा जून मध्ये झाली, आणी जुलै मध्ये एपिक browser चे आगमन झाले.बंगलोर स्थित Hidden Reflex ह्या भारतीय start-up ने mozilla चे engine वापरून हा भारतीय browser बनवला आहे. मला आवडलेला भाग म्हणजे ह्या browser मधे कुठल्याही एक्स्ट्रा plugin किंवा configuration शिवाय भारतीय भाषां मधून लिहीणे अतिशय सोपे आहे. उदा. जर तुम्हाला मराठीतून ट्वीट करयचे असेल तर एपिक browser मधून ते सहज शक्य आहे.

पण एपिक वापरत असताना खरे तर ट्वीट करायला ट्विटरच्या वेबसाइट वर जायची गरज नाही कारण ट्विटर साइडबार मधे उपलब्ध आहे.

आजकाल बर्‍याच मराठी वृ॒त्तपत्रांच्या वेबसाइटवर मराठीतून प्रतिक्रिया नोंदवण्याची सोय असते (टेकमराठी च्या वेबसाइटवर सुद्धा ही सोय आहे) पण जर एखाद्या साईट वर अशी सोय नसेल तरी सुद्धा एपिक browser वापरून मराठी प्रतिक्रिया नोन्दवू शकता.हे झाले एपिकच्या भारतीय भाषा वापरणे सोपे करण्या बद्दल, पण एपिक मधली बाकिची वैशिष्ठ्ये सुद्धा तितकीच महत्वाची आहेत. मुख्य म्हणजे, हा browser – Mozilla वर आधारीत असल्यामुळे, Firefox चे बरेचसे plugins जसेच्या तसे चलण्याची शक्यता खूप जास्त आहे. माझ्यामते ही एक मोठीच जमेची बाजू आहे. शिवाय ह्यात antivirus अंतर्भूत केलेले असल्यामुळे तुम्ही download केलेल्या file आधी scan करण्याची सोय आहे. (ह्या शिवाय anti-virus साईडबार मधून संपूर्ण मशीन सुद्धा scan करता येते)

त्या शिवाय साईड्बार अप्लिकेशन्स हे एपिक browser चे महत्वाचे वैशिष्ठ म्हणावे लागेल. एपिक browser मधे बरीच साईड्बार अप्लिकेशन्स आहेत. एपिक ऍप्स मधे जावून पूर्ण सुची बघता येते. त्यातली आपल्याला हवी असणारीच ठेवून बाकीची न दाखवण्याची सुद्धा सोय आहे.

ह्यातले मला आवडलेली काही अप्लिकेशन्स

  1. इन्डिक – जर तात्पुरते काही भारतीय भाषेमधे लिहायचे असेल तर ह्याचा उपयोग आहे. सारखे लागणारे मराठी शब्द किंवा वाक्य इथे साठवून ठेवता येतात.
  2. anti-virus – ह्या बद्दल आधीच सांगितले आहे
  3. to-do – कामाची यादी करता येते. ह्यात एखादे काम विशिष्ठ वेळी पूर्ण करायचे असेल तर अलार्म लावता येतो. मला एक खटकलेली गोष्ट म्हणजे इथे फक्त english entry करता येते. (indic dropdown येत नाही) अर्थात इन्डिक ह्या अप्लिकेशन मधे टाईप करून इथे आणता येते.
  4. वर उल्लेख केल्या प्रमाणे ट्विटर पण साईडबार मधे उपलब्ध आहे.
  5. ह्या शिवाय जिमेल, याहू, गूगल मॅप सुद्धा आहेत. पण मला ट्विटर अप्लिकेशन इतके हे तीन आवडले नाहीत.
  6. जर तुम्हाला एपिक browser चा चेहरा मोहरा आवडला नसेल (लूक ऍन्ड फील) तर skins ह्या साईड्बार अप्लिकेशन मधे जावून तुम्ही तो बदलू शकता. हे अप्लिकेशन mozilla persona वर आधारीत आहे.
  7. एपिक मधे write नावाचा HTML editor आहे. अर्थात तो HTML editor आहे ते माहीत नसलं तरी काहीच बिघडत नाही. शिवाय auto-save सुविधेमुळे तुम्ही वेगवेगळ्या files मधे save केलं पाहिजे असंही नाही. तुम्ही ह्याचा वापर scratch pad म्हणून देखील करू शकता. अर्थातच ह्यात सुद्धा भारतीय भाषांमधे लिहिण्याची सोय आहेच. हा editor, Xinha Here! वर आधारीत आहे.
  8. snippet नावाचे अप्लिकेशन (firefox च्या scrapbook plugin वर आधारीत) browsing करीत असताना सापडलेल्या महत्वाच्या गोष्टी drag-and-drop इतक्या सोप्या पद्धतीने साठवून ठेवण्यास मदत करते. तुम्ही ह्याचा कात्रणवही म्हणून वापर करू शकता. नंतर ह्या notes मधून योग्य ती माहीती शोधू शकता (खर्‍या कात्रणवहीतून हवी ती माहीती शोधणे इतके सोपे असते तर ?)

अर्थात एपिक नवीन browser असल्या मुळे त्यात काही bugs सुद्धा आहेत, परंतू मला तरी अजून एकही शो-स्टॉपर प्रॉब्लेम सापडलेला नाही. शिवाय एपिक मधील भारतीय भाषां साठी गूगल transliteration services वापरल्या मुळे इंटरनेट connection नसल्यास भारतीय भाषांमधे टाईप करता येत नाही. अर्थात हा web browser असल्यामुळे इंटरनेट connection असावे ही अपेक्षा रास्त आहे.

जर तुम्हाला प्रत्यक्ष एपिक browser वापरून बघायचा असेल, तर ह्या संकेतस्थळावरून download करा.

टीप : मी आधी हा लेख एपिक write मधे लिहायला सुरूवात केली होती, पण मला बराह सोपे वाटत असल्यामुळे (शिवाय बराहसाठी इंटरनेट connection ची गरज नसल्यामुळे नंतर बराहमधे पूर्ण केला)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel