सदर लेख, प्रभास गुप्ते द्वारा लिखित http://prabhasgupte.com/2009/12/20/how-to-create-google-friendly-sites/ या लेखाचे भाषांतर असून, http://prabhasgupte.comच्या माध्यमातून घेतले आहे.

१. आपल्या वाचकांना त्यांना हवी असणारी माहिती द्या.
आपल्या संकेतस्थळावर (websites) दर्जेदार माहिती द्या – विशेषत: मु्ख्यपृष्ठावर (homepage). जर आपल्या पानांवर उपयुक्त माहिती असेल तर वाचक आपल्याशी जोडले जातील. दर्जेदार व उपयुक्त माहिती देण्यासाठी विषयांची मांडणी नीट आणि नेमकी करा. कोणत्या शब्दावर लोकं शोध (search) घेतील याचा विचार करा.

२. इतर संकेतस्थळं (web-sites) तुमच्याशी जोडल्या गेल्या आहेत याची खात्री करा.

लिंकस(links), गूगल क्रॉलरला (Google crawler ) तुमचे संकेतस्थळ (web-site) शोधायला मदत करतात. ते तुम्हाला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवते. संकेतस्थळाचे (Web site) “मूल्य” ठरवण्यासाठी गूगल (Google) कडे स्वत:चा अलगोरिदम (algorithm) आहे. “अ” कडून “ब” ला असलेली लिंक (link) म्हणजे “अ” कडून “ब” ला असलेले मत. जर “अ” हे मूल्य जास्त असेल तर त्यामुळे गूगल(Google)अनुसार, तुम्हालाही चांगले मूल्य लाभते.

३. गूगल अलगोरिदम (Google Algorithm) हा नॅचूरल लिंकस (natural links) व अननॅचूरल लिंकस (unnatural links) मधे फरक करू शकतो.


जेव्हा एखाद्या संकेतस्थळाला (web-site) ला तुमच्या संकेतस्थळावरची (web-site) माहिती उपयोगी वाटते तेव्हा ते संकेतस्थळ (web-site) तुमच्या वेब पेजला (web page) लिंक (link) देते, जेणेकरुन लिंक (link) देणा‍र्‍या संकेतस्थळाचे (web-site) वाचक तुम्ही दिलेली माहितीसुद्धा वाचू शकतील. याला नॅचूरल लिंकस (natural links) म्हणतात. पण जेव्हा जाणून बुजून अशा लिंक (link) बनवल्या जातात, तेव्हा ती अननॅचूरल लिंक (unnatural link) ठरते. गूगल (Google) या दोन्हीमधे फरक करू शकते, नॅचूरल लिंकस (natural links) आणि अननॅचूरल लिंक (unnatural link)ओळखू शकते. स्वत:ची इंडेक्स (index) बनवताना गूगल (Google) फक्त नॅचूरल लिंकसचाच( natural links ) विचार करते.

४. तुमचे संकेतस्थळ सहज उपलब्ध होईल असे ठेवा.

तुमचे संकेतस्थळाची (web-site) रचना तार्कीकतेअनुसार केलेली असावी. प्रत्येक पान हे एखाद्यातरी स्टॅटिक लिंकशी (static link) जोडलेलं असावं. कोणताही टेक्सट ब्राउझर (text browser) जसं की lynx वर तुम्ही तुमचे संकेतस्थळ तपासून पाहू शकता. बहुतेक वेळा, क्रॉलरस (crawlers) तुमचे संकेतस्थळ त्याच पद्धतीने पाहतील. काही फिचरस (features) जसं JavaScript, cookies, session IDs, frames, DHTML, Flash etc जर टेक्सट ब्राउझर (text browser) मधे दिसत नसतील तर ती गूगलला (Google)आणि इतर क्रॉलरलापण (crawler) दिसणार नाहीत.

५. अशा गोष्टी ज्या तुम्ही टाळायला हव्यात.
केवळ क्रॉलरसाठी(crawler), तुमची पानं किवर्डसच्या (“keywords”) यादीने भरवू नका. जर तुमच्या संकेतस्थळामधे अशी पानं, लिंकस(links) किंवा टेक्स्ट कंटेंटस (text contents) असतील जे वाचकाने पाहू नयेत अशी तुमची इच्छा असेल तर, गूगल (Google)अशा लिंकसना धोकादायक समजून तुमचे संकेतस्थळ वगळू शकते.
कुठल्यातरी search engine optimization service चा लाभ घ्या. पण निवडताना मात्र काळजी घ्या! अशा सेवा असा दावा करतात की गूगल रिझल्टस (Google results) मधे संकेतस्थळ पहिल्यांदा येईल ,आणि असं करण्यासाठी एकतर ते कंटेंट्स (contents) मधे सुधारणा करतात आणि चूकतात किंवा गूगलला फसवण्याची/ दिशाभूल करण्याची कुठलीतरी धोकादायक पद्धत अवलंबतात. पण जर तुमचे डोमेन (domain) या सगळ्याशी संलग्न असेल तर गूगल (Google) त्यांच्या इंडेक्स (index) मधे तुमचे संकेतस्थळ संपूर्णपणे वगळू शकते.
महत्वाची नावे, कंटेंट्स (contents) वा लिंकस (links) दाखविण्यासाठी इमेजेसचा (images) वापर करू नका. गूगल क्रॉलर (Google crawler) हा ग्राफिक्स (graphics) मधील टेक्स्ट (text) ओळखू शकत नाही. जर पानांवरील मुख्य नावे वा कंटेंटस (contents) साध्या HTML मधे format करता येत नसतील तर, ALT attribute चा वापर करा.

सदर लेख, प्रभास गुप्ते द्वारा लिखित http://prabhasgupte.com/2009/12/20/how-to-create-google-friendly-sites/ या लेखाचे भाषांतर असून, http://prabhasgupte.comच्या माध्यमातून घेतले आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel