संपूर्ण एक आठवडा निघून गेला. आणि सरतेशेवटी प्रोफेसर ब्रिज  डॉक्टर वैशंपायन यांच्या कॅबीन मधून बाहेर पडले.

हा संपूर्ण आठवडा त्यांनी कपडे देखील बदलले नव्हते. जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांचे दाढी आणि केस वेड्यासारखे वाढलेले होते.

“ चला कामाला लागुया...” प्रोफेसर ब्रिज  डॉक्टर वैशंपायन यांना म्हणाले. ते दोघे प्रयोगशाळेत पोहोचले आणि सर्व यंत्रामध्ये फेरबदल करू लागले

जवळ जवळ दोन दिवस सलग मेहनत केल्यानंतर प्रोफेसर ब्रिज  डॉ. वैशंपायन यांचा असिस्टंट विनय समोर गेले आणि म्हणाले,

“ कम डीअर, सगळ्यात अगोदर आपण तुझे सूक्ष्म शरीर तयार करू.”

“म.. माझे? का का?” विनयची बोबडी वळली होती.

“ घाबरतोस कशाला? काही होणार नाही? जे काही होईल ते तुझ्या सूक्ष्म शरीराला होईल.”

त्यांनी जबरदस्तीने विनयला एका गोलाकार मशीनच्या मधोमध एका खुर्चीवर बसवले. मग प्रोफेसर ब्रिज  यांनी एक बटण दाबले.

त्या मशीन मधून रंगीबेरंगी किरणे बाहेर पडू लागली. त्या रंगीत किरणांमुळे विनयचे शरीर इतके चमकू लागले कि बाकी लोकांना विनयला ओळखणे शक्य होत नव्हते.

त्या तेजस्वी प्रकाशामुळे विनयचे तर डोळेच दिपले होते. त्याने डोळे घट्ट बंद करून घेतले होते.  

“ तुला काही दिसतंय का?” प्रोफेसर ब्रिज  यांनी विचारले.

“इतका प्रखर उजेड डोळ्यांवर सोडलाय. कसं दिसेल?” विनय बोलताना थरथर कापत होता.

“ लक्ष नीट केंद्रित कर आणि डोळे बंद असताना काही दिसत का हे पहायचा प्रयत्न कर.” प्रोफेसर म्हणले.

विनय काही वेळ गप्प राहिला आणि मग अचानक म्हणाला,  “ मला माझ्या आजूबाजूला छोटे छोटे गोळे फिरताना दिसत आहेत.”

“गुड...! आपला प्रयोग यशस्वी झाला आहे.” प्रोफेसर ब्रिज  डॉक्टर वैशंपायन यांना म्हणाले.

“ बरं आता तुम्ही समोरच्या भिंतीकडे बघा तिथे तुम्हाला एक छोटासा प्रकाशमान बिंदू दिसतोय का? हेच विनयचे सूक्ष्म शरीर आहे.

“ येस..प्रोफेसर ब्रिज  यु आर सिम्पली जीनियस..!” डॉक्टर वैशंपायन यांचा आनंद गगनात मावेना.  

“ परंतु विनयला नक्की कसले गोळे दिसत आहेत? “ शंकेखोर गौतमने प्रश्न विचारला.

“ जे बंद डोळ्यांनी त्याला जे काही दिसतय ते त्याचं स्वत:च सूक्ष्म शरीर आहे. आणि त्याच्या आजूबाजूला त्याला अणूरेणू दिसत आहेत.” डॉक्टर वैशंपायन

“ तू त्या गोळ्यांना स्पर्श करू शकतोस का?” प्रोफेसर

“ प्रयत्न करतो.” विनय बसल्या बसल्या हवेत हात हलवू लागला. “नाही सर. या गोळ्यांची गती प्रचंड जास्त आहे.

“ ठीक आहे. नाऊ स्टाप दि एक्सपेरीमेन्ट। “ प्रोफेसर ब्रिज  यांनी डॉक्टर वैशंपायन यांना स्वीच बंद करायला सांगितले.

विनयने डोळे उघडले तो डोळे किलकिले करून चहूबाजूना पाहत होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel