ज्या प्रमाणे कुठलेही अवार्ड सचिन तेंडूलकर साठी त्याच्या कारकीर्दीसाठी पुरेसे नाही त्याच प्रमाणे Leonardo De Caprio साठी ऑस्कर अवार्ड पुरेसे नाही. आश्चर्य हेच होते कि लिओ ला इतकी वर्षे जबरदस्त अभिनय करून सुद्धा हे अवार्ड भेटले कसे नाही. The Revenant हा चित्रपट लिओला पहिले ऑस्कर देणारा चित्रपट म्हणून लक्षांत राहील पण कुठलाही रसिक हे मान्य करेल कि ह्या पेक्षा कितीतरी चं अभिनय ह्या अभिनेत्याने वठवला आहे.
ह्या श्रेणीत लियो ची टक्कर त्याच्याच तोडीच्या Matt Damon बरोबर होती पण शेवटी लिओ विजेता ठरला. ह्या चित्रपटांत लिओ अश्या एका सैन्काची भूमिका वठवत आहे हे अमेरिकेतील कुणीही गेला नाही अश्या भागांत जनावरे पकडण्यासाठी शेकडो मैल दौड करून जातात. वाटेत त्यांच्यावर अमेरिकेतील आदिवासी हल्ला करतात आणि त्यांना माघार घ्यायला भाग पडते. लिओचा एक मित्र घात करून त्याला जखमी अवस्थेंत माघारी ठेवून जातो आणि इतरांना सांगतो कि त्याचा मृत्यू झाला आहे. जखमी लिओ केवळ प्रचंड इच्छा शक्तीच्या जोरावर जीव वाचवून परत येतो.
साभार : विकिपीडिया