माझ्या मते ह्या श्रेणीत Room मधील ब्रि आणि कॅरोल मधील केट द्या दोघांतच खरी स्पर्धा होती आणि शेवटी ब्रि ने ती जिंकली. ब्रीने एका तरुण मातेचा अभिनय केला आहे जिला एक नराधम ७ वर्षाची असताना अपहृत करतो आणि एका रूम मध्ये कायमची कैद करून ठेवतो. तिच्यावर वारंवार बलात्कार करून शेवटी तिला एक मुलगा होतो. ह्या लहानग्याने आयुष्यांत ती रूम सोडून काहीही पहिले नसते आणि त्याची आयी सुद्धा त्याला त्याला हि रूमच सत्य असून टीवी वर दिसणाऱ्या इतर सर्व गोष्टी खोट्या आहेत असे शिकवते. एक दिवस ती मुलाला तो मेला आहे असे नाटक करायला शिकवते. मुलगा मेला असे समजून त्याचे शरीर नष्ट करण्यासाठी तो नराधम त्याला आपल्या गाडीत टाकून जातो पण मुलगा निसटतो, पोलिस त्याची आणि त्याच्या अयीची सुटका करतात.
नवीन जगांत ह्या मुला adjust करणे फार मुश्किल जाते पण आपल्या सकरात्मक दृष्टीने तो शेवटी त्यात यशस्वी होतो.