सुरूवातीच्या नोंदींच्या मते याला आँध्र किंवा सतवाहन साम्राज्याचा भाग मानलं जातं. १२व्या शतकात चालुक्यचं राज्य पडल्यानंतर देवगिरीच्या यादवांनी बरारवर ताबा मिळवला. १३४८ मध्ये बहमनी राजवटीच्या स्थापनेनंतर बरार त्याच्या राज्याच्या पाच प्रांतापैकी एक होतं ज्यावर महान सरदारांचं राज्य होतं. बहमनी राजवटीच्या वाटपानंतरच्या काळात फठुल्लाह इमाद उल मुल्क ने स्वतःला स्वतंत्र घोषित केलं व इमादी साम्राज्याची स्थापना केली. त्यांनी नंतर लवकरच माहुरला आपल्या राज्याचा भाग बनवुन घेतलं. १५०४ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा वंश अला उद दिन ने गुजरातच्या सुलतानाबरोबर हात मिळवणी करून अहमदनगराच्या ताब्यात जाण्यापासुन वाचण्याचा प्रयत्न केला. पुढचा राजा दरयानेही याच उद्देशाने विजापूरशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. १५६८ मध्ये अहमदनगराच्या मुर्तजा निजामशहाने हल्ला करून तेव्हाचा राजा तुफल खान, त्याचा मुलगा शम्स उल मुल्क व माजी राजा बुरहानचा मारलं आणि बरारला अहमदनगरचाच भाग बलवुन घेतलं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel