ब्राम्हण लोकांची स्वार्थासाठी सिद्धी प्राप्त करणे आणि त्यासाठी नास्तिकतेच्या दिशेला वाटचाल आणि त्यानंतर त्यांची शिव आराधना यांच्याशी निगडीत आहे श्री सिद्धेश्वर महादेवाच्या स्थापनेची कथा. पौराणिक कथांनुसार एकदा देवदारु वनात समस्त ब्राम्हण गण एकत्र होऊन सिद्धी प्राप्त करण्याच्या हेतूने तप करू लागले. कोणी शाकाहाराने, कोणी निराहाराने, कोणी केवळ पानांच्या आहाराने तर कोणी वीरासनाने अशा अनेक प्रकारांनी ब्राम्हण तपस्या करू लागले. परंतु शेकडो वर्षे तप करून देखील त्यांना सिधी काही प्राप्त होत नव्हती. त्याम्य्ले सर्व ब्राम्हण दुःखी झाले आणि हळूहळू त्यांचा धर्मग्रंथ, वचन इत्यादिन्वरचा विश्वास उडू लागला. ते नास्तिकतेकडे वाळू लागले. तेव्हाच आकाशवाणी झाली की तुम्ही सगळ्यांनी स्वार्थापोटी एकमेकांशी स्पर्धा करत तप केले आहे, म्हणूनच तुमच्यापैकी कोणालाही सिद्धी प्राप्त झालेली नाही. काम, वासना, अहंकार, क्रोध, मोह,लोभ इत्यादी हे सर्व तपश्चर्येची हानी करणारे घटक आहेत. या सगळ्यांना वर्ज्य करून जे कोणी तपश्चर्या आणि देव पूजा करतात, केवळ त्यांनाच सिद्धी प्राप्त होऊ शकते.
आता तुम्ही सर्वांनी महाकाल वनात जा आणि तिथे वीरभद्र च्या जवळ असलेल्या दिव्य शिवलिंगाचे दर्शन पूजन करा. सिद्धीचे दाता केवळ भगवान शिव हेच आहेत. त्यांच्याच कृपेने सनकादिक देवतांना सिद्धी प्राप्त झाली होती. याच शिवलिंगाचे पूजन करून राजा वामुमन याला खंड सिद्धि, राजा हाय याला आकाशगमन सिद्धि, कृतवीर्य ला हजार घोडे, अरुण ला अदृश्य होण्याची सिद्धी, इत्यादि सिद्धी प्राप्त झाल्या आहेत. त्या त्या लिंगाची निःस्वार्थ आराधना केल्यामुळे तुम्हा सर्वांना देखील सिद्धी प्राप्त होईल.
तेव्हा ते सर्व ब्राम्हण लोक महाकाल वनात आले आणि इथे येऊन त्या सिद्धी प्राप्त करून देणाऱ्या दिव्य शिवलिंगाचे दर्शन पूजन अतिशय मनोभावे केले, आणि त्यांना सिद्धी प्राप्त झाली. त्याच दिवसापासून हे शिवलिंग सिद्धेश्वर महादेव या नावाने प्रसिद्ध झाले.
मान्यता आहे की जो कोणी मनुष्य नियामीय ६ महिन्यांपर्यंत श्री सिद्धेश्वर महादेवाचे दर्शन पूजन करतो त्याला इच्छित सिद्धी प्राप्त होते. कृष्ण पक्षाच्या अष्टमी आणि चतुर्दशीला जे श्री सिद्धेश्वर महादेवाचे दर्शन घेतात त्यांना शिवलोक प्राप्त होतो. श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर उज्जैन मध्ये भेरुगड क्षेत्रात सिद्धानाथ च्या मुख्य द्वारावर स्थित आहे. सिद्धनाथ जाणले श्रद्धाळू इथे येऊन दर्शनाचा लाभ घेतात.