भारतात आज जेवढ्या म्हणून भाषा बोलल्या जातात त्या सर्वांचा उगम संस्कृत पासून झाला आहे आणि त्यांचा इतिहास केवळ १५०० ते २००० वर्ष जुना आहे. त्यापूर्वी भारतात संस्कृत, प्राकृत, पाली, अर्धमागधी इत्यादी भाषा प्रचलित होत्या.
आदिकालात भाषा नव्हत्या, केवळ ध्वनी संकेत होते. ध्वनी संकेतांवरून मानव समजून घेत असे की कोणत्या व्यक्तीला काय सांगायचे आहे. पुढे चित्रलिपी वापरण्यात येऊ लागली. प्राथमिक मनुष्याने भाषेची रचना आपल्या विशेष प्रतिभेच्या बळावर केली नाही. त्यांनी आपल्या आपल्या ध्वनी संकेतांना चित्र रूप आणि नंतर विशेष आकृती रूप देण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे भाषेचा विकास झाला. त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या बौद्धिक किंवा वैज्ञानिक क्षमतेचा उपयोग करण्यात आलेला नाही.
संस्कृत अशी भाषा नाहीये जिची रचना करण्यात आली आहे. या भाषेचा शोध लावण्यात आलेला आहे. भारतात काही लोकांना पहिल्यांदाच हे समजले आणि जाणवले की मानवाजवळ काही एक लिपियुक्त आणि परिपूर्ण भाषा असली पाहिजे जिच्या माध्यमातून केवळ विचार - विनिमय आणि संभाषण करणे एवढेच नव्हे तर तिला काही वैज्ञानिक आणि मनोवैज्ञानिक आधार देखील असला पाहजे. हे ते लोक होते जे हिमालयाच्या आसपास राहत होते.
त्यांनी अशा भाषेत बोलायला सुरुवात केली जी सर्वसंमत होती. पहिल्यांदाच नीट विचार करून कोणत्या भाषेचा अविष्कार झाला असेल तर ती होती संस्कृत. तिचा अविष्कार करणारे देवलोकातले देवता होते, त्यामुळे तिला देववाणी म्हटले जाऊ लागले. संस्कृत देवनागरी मध्ये लिहिली जाते. देवता लोक हिमालयाच्या उत्तरेकडे राहत होते. ब्राम्हांडातील ध्वनींच्या रहस्याच्या बाबतीत वेदांतूनच माहिती मिळते. या ध्वनींना अंतराळ वैज्ञानिकांची संघटना नासा आणि इस्रो यांनी देखील मान्य केले आहे.
असे म्हटले जाते की अरबी भाषेला कंठातून आणि इंग्रजी भाषेला केवळ ओठांतून बोलले जाते परंतु संस्कृत वर्णमालेला स्वरांच्या आवाजाच्या आधारावरून कवर्ग, चवर्ग, टवर्ग, तवर्ग, पवर्ग, अंत:स्थ आणि ऊष्म वर्ग यांच्यामध्ये विभागण्यात आले आहे.