नौकावाहनाची कला आणि नौकावाहनाचा जन्म ६००० वर्षांपूर्वी सिंधू नदीत झाला होता. विश्वातील सर्वांत पहिले नौकावाहन संस्कृत शब्द नवगती पासून उत्पन्न झाले आहे.
भारताचा सर्वांत प्राचीन ग्रंथ ऋग्वेदामध्ये जहाज आणि समुद्रायात्रा यांचे अनेक उल्लेल्ख आहेत (ऋक् 1. 25. 7, 1. 48. 3, 1. 56. 2, 7. 88. 3-4 इत्यादि). याज्ञवल्क्य संहिता, मार्कंडेय तसेच अन्य पुराणांमध्ये देखील अनेक स्थळांवर जहाज आणि समुद्र्यात्रा संबंधित कथा आणि वार्ता आहेत. मानुसंहितेमध्ये जहाजाच्या प्रवाशांशी संबंधित नियमांचे वर्णन आहे.
इ.स.पू. चौथ्या शताब्दी मध्ये भारत अभियानावरून परतत असताना सिकंदर चा सेनापती निआर्कसने आपल्या सेनेला समुद्रमार्गाने मायदेशी पाठवण्यासाठी भारतीय जहाजांचा जत्था एकत्रित केला होता. इ.स.पू. दुसऱ्या शतकातील निर्मित सांची स्तूपच्या पूर्व आणि पश्चिम द्वारांवर अन्य मूर्तींच्या मध्ये जहाजांच्या प्रतिकृती देखील आहेत. भारतवासी जहाजांवर आरूढ होऊन जलयुद्ध करीत असत ही गोष्ट वैदिक साहित्यामध्ये तुग्र ऋषींचे उपाख्यान, रामायणात केवर्त कथा आणि लोकसाहित्यामध्ये राघूचे दिग्विजय यांच्यावरून स्पष्ट होते. प्रभू श्रीरामाने यमुना पार करण्यासाठी देखील नौकेचा वापर केला होता.