भास्कराचार्य प्राचीन भारताचे सुप्रसिद्ध गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. भास्कराचार्यांनी लिहिलेल्या ग्रंथांचे जगातील अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांच्या ग्रंथांनी अनेक विदेशी विद्वानांना देखील शोधाचे मार्ग दाखवले आहेत. न्यूटन च्या ५०० वर्षे आधी भास्कराचार्यांनी गुरुत्वाकर्षणाचा नियम देखील माहिती करून घेतला होता आणि त्यांनी आपला दुसरा ग्रंथ "सिद्धांत शिरोमणी" मध्ये त्याचा उल्लेख देखील केलेला आहे.
गुरुत्वाकर्षणाच्या नियामासंबंधी त्यांनी लिहिले आहे, "पृथ्वी आपल्या आकाशातील पदार्थ स्वशक्तीने आपल्याकडे खेचून घेते त्यामुळे आकाशातील पदार्थ पृथ्वीवर पडतो." यावरून सिद्ध होते की पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. सन ११६३ मध्ये त्यांनी "करण कुतूहल" नावाच्या ग्रंथाची रचना केली. या ग्रंथात लिहिले आहे की जेव्हा चंद्र सूर्याला झाकतो तेव्हा सूर्यग्रहण आणि जेव्हा पृथ्वीची छाया चंद्राला झाकते तेव्हा चंद्रग्रहण होते. हा पहिला लिखित स्वरूपातील पुरावा होता की लोकांना गुरुत्वाकर्षण, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण यांची व्यवस्थित माहिती होती.