ज्वाला गुट्टा चा जन्म ७ सप्टेंबर १९८३ रोजी महाराष्ट्रातील वर्धा इथे झाला. तिचे वडील एम. क्रांती हे तेलगू तर आई येलन चीनमधील आहे. तिची आई येलन गुट्टा १९७७ मध्ये आपल्या आजोबांसोबत प्रथमच भारतात आली होती. ज्वाला गुट्टा हिचे प्राथमिक शिक्षण हैदराबाद इथे झाले आणि इथेच तिने बैडमिंटन खेळायला सुरुवात केली. १० वर्षांच्या वयातच ज्वालाने एस. एम. आरिफ यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. एस. एम. आरिफ हे भारतातील प्रख्यात प्रशिक्षक आहेत ज्यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पहिल्यांदा वयाच्या १३ व्या वर्षी ज्वालाने मिनी नेशनल बैडमिंटन चैंपियनशिप जिंकली होती. सन २००० मध्ये ज्वालाने वायाय्च्या १७ व्या वर्षी जूनिअर नेशनल बैडमिंटन चैंपियनशिप जिंकली होती. याच वर्षी तिने श्रुती कुरियन हिच्यासोबत जोडी बनवून महिलांच्या डबल्स जूनिअर नेशनल बैडमिंटन चैंपियनशिप आणि सिनिअर नेशनल बैडमिंटन चैंपियनशिप मध्ये विजय संपादन केला. श्रुती कुरियन सोबत तिची जोडी खूप काळ चालली. २००२ पासून २००८ पर्यंत सात वेळा ज्वाला गुट्टाने महिलांच्या नेशनल दुहेरी स्पर्धेत विजय संपादन केला.
महिला दुहेरी सोबतच तिने मिश्र दुहेरी मध्ये देखील यश मिळवले आणि भारताची दुहेरीतील सर्वोत्कृष्ट खेळाडू बनली. २०१० कॉमनवेल्थ खेळांमध्ये देखील ज्वाला गुट्टाने आपली सहकारी अश्विनी पोनाप्पा हिच्यासोबत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले. कॉमनवेल्थ नंतर पुन्हा एकदा ज्वाला गुट्टा भारतीय बैडमिंटन मध्ये चर्चेचा विषय बनली आहे.
ग्लासगो मधील २०१४ कॉमनवेल्थ मध्ये देखील ज्वाला गुट्टाने सुवर्ण पदक जिंकले आहे.
सायना नेहवाल
सायना नेहवाल भारतीय बैडमिंटन खेळाडू आहे. सध्या ती जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असून हे पद मिळवणारी ती पहिलीच भारतीय महिला आहे. सोबतातच एका महिन्यात तीन वेळा प्रथम स्थानावर विराजमान होणारी देखील ती एकमेव महिला खेळाडू आहे. लंडन ऑलिम्पिक्स २०१२ मध्ये सायनाने इतिहास रचत बैडमिंटन मधील महिला एकेरीचे कांस्य पदक जिंकले होते. बैडमिंटन मध्ये असे करू शकणारी ती भारताची पहिली खेळाडू आहे. २००८ मध्ये बीजिंग येथील ऑलिम्पिक्स मध्ये देखील ती क्वार्टर फायनल पर्यंत पोचली होती. ती बीडबल्युएफ विश्व कनिष्ठ प्रतियोगिता जिंकणारी पहिली भारतीय आहे. सध्या ती सर्वोत्कृष्ट महिला भारतीय बैडमिंटन खेळाडू आहे आणि भारतीय बैडमिंटन लीग मध्ये अवध वैरियर्स तर्फे खेळते. सायनाला भारत सरकारतर्फे पद्मश्री आणि सर्वोच्च क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.