अबदुल रषीदला गांधीजींनी ‘भाअी’ म्हणून अुल्लेखिले नि त्यांच्याविरूध्द सर्व हिंदू जगत संतप्त झाले असता त्याचा पक्ष घे।̊न दोन षब्द बोलण्यास ते सिध्द झाले ही गोश्ट किती स्वाभाविक आहे? प्रत्येक नटाला आपली भूमिका अधिकाधिक रंगेल असा अभिनय करावाच लागतो अन् संसार हे अेक नाटक असून मनुश्यमात्र हा नट आहे. गांधीजींनी महात्म्याची भूमिका घेतलेली असल्याने त्यांनी तिला रंग भरेल अषी वाक्ये अुच्चारू नयेत तर काय अेखाद्या षिवाजी रामदासारख्या सामान्य अल्पात्म्याप्रमाणे ‘न्यायाचा जो अभिमान, तोचि जाणावा निरभिमान।। न्याय अन्याय समान, होणे नाही,’ म्हणून ज्या जातीत आपण जन्मलो त्या जातीचा पक्ष घ्यावा!
आपणा प्रत्येक हिंदूची अिच्छा अषीच आहे की, कितीही घोर अपराधी असला तरीही त्याला त्याचा पक्ष मांडणारा कोणीतरी पाठीराखा मिळावा. मग अबदुल रषीदला गांधीजी मिळाले यात काय वावगे झाला? गांधीजीहून अबदुल रषीदला दुसरा कोणी मनुश्य पाठिंबा देण्यास निघता तर त्याला षोभलादेखील नसता!
पण हे हिंदू लोक किती दुधखुळे आहेत! ‘भाअी’ अबदुल रषीदचा पक्ष मांडण्यास गांधीजी पुढे सरसावलेले पाहून विचारतात की, ‘जर अबदुल रषीद भाअी आहे’ तर मग गोपीनाथ सहाला गांधीजींनी अगदी पटकन असे ‘भाअी’ म्हणून का म्हटले नाही? जर अबदुल रषीदचा प्र९ा मांडणे हे न्यायाचे नि महात्म्याच्या भूमिकेस अत्यंत सुसंगत होय तर गोपीनाथ सहाचा पक्ष मांडण्यास ते अितक्या तत्परतेने, अगदी ती बातमी अैकताच गहिवरूनन कां पुढे आले नाहीत? अितकेच नव्हे तर गोपीनाथ सहाचे नाव जरा ममत्वाने अुच्चारताच देषबंधू दासांवर आग पाखडण्यास ते कां प्रवृत्त झाले?
दुधखुळयांनो! कां म्हणजे काय? गोपीनाथ सहा हिंदू होता म्हणून! गोपीनाथ सहासारख्या हिंदूचा पक्ष मांडण्यास किंवा त्यास ‘भाअी’ म्हणून सद्गद अंतःकरणाने म्हणण्यात कोणा महात्म्यांस षोभेसे ते काय होते? त्याचप्रमाणे गोपीनाथ सहा हत्यारी 1⁄4खुनी1⁄2 होता नि तो हिंदू होता, तरीही त्याचा पक्ष मांडण्यास देषबंधू दासांनी नि अखिल बंगाल प्रांतिक परिशदेने धजावे हे पाहून दासांवर गांधीजींनी आग पाखडावी हेही क्रमप्राप्तच होते. हत्यारी मनुश्याचा पक्ष नि तो हिंदू असताना मांडण्यासाठी पुढे येण्यास दासांस काय अधिकार होता? दास केवळ ‘देषबंधू!’ हत्यारी माणसाचा पक्ष घेण्याचा अधिकार कोणा महात्म्यावाचून अितरांस पोचतच नसतो!
अन् त्यातही अेक वेळ त्या गोपीनाथ सहाचा हिंदू होण्याचा अपराध विसरून अेखादा दुसरा स्निग्ध षब्द त्याच्याविशयी महात्माजी बोलतेही; अबदुल रषीदच्या आत्म्याविशयी केली. तषी गोपीनाथाच्या आत्म्याविशयीही त्यांनी देवाजवळ करूणाही भाकली असती; पण गोपीनाथ सहाने कोणा हिंदू संन्याषास थोडेच मारले होते. त्याने अेका निरपराध गृहस्थास मारले होते. अिंग्रज गृहस्थाची हत्या करणान्́याचा पक्ष घेण्याचा अन् त्यास कळवळून तत्काळ प्रकटपणे ‘भाअी’ म्हणण्याचा अधिकार दासांसारख्या कोणा देषबंधूला तर काय पण प्रत्यक्ष महात्म्यांनादेखील नाही. अिंडियन पिनल कोडापासून स्पेषल आॅर्डिनन्स अॅक्टपर्यंत सर्व धर्मग्रंथ याविशयी अेकमत आहेत. पण दुधखुळया हिंदू लोकांस हे सूक्ष्म भेद काय कळणार!
महात्मा गांधीजींनी याचविशयी बोलताना सांगितले, की मी मुसलमानांचा मित्र आहे. ते मुसलमान माझे ‘र७ाचे भाअू’ आहेत. आता यात ते चुकले कोठे; खरोखरच मुसलमान आपले र७ाचे भाअू आहेत. त्यांच्यातील अर्धे अधिक लोक हिदूंतूनच मुसलमानांत ओढले गेले आहेत. म्हणून त्यांच्यात हिंदू र७ अजून खेळत आहे. याहूनही ताल्̈िवक विचार केला तर मुसलमानही मनुश्य आहेत. तेव्हा मानवीय र७ाच्या प́श्टीनेही आपले नि त्यांचे र७ अेकच आहे. मग त्यास माझे र७ाचे भाअू म्हणून म्हणण्यात महात्माजींनी अगदी सत्य तेच सांगितले नाही का?
पण हे दुधखुळे हिंदू लोक! महात्माजींचे वरील विधान वाचून विचारतात की, ‘काय हो, गेल्या वर्शी ‘यंग अिंडियात’ अेका क्रांतिकारक हिंदूने जेव्हा महात्माजीस म्हटले होते की, आम्हा हिंदूच्या नसांत प्रतापाचे अन् षिवाजीचे र७ खेळत आहे, तेव्हा गांधीजींनी साल्̈िवक संतापाने अुसळून अुल्̈ार दिले. होते की, ‘छट्, तुमच्या किंवा माझ्या अंगात प्रतापाचे नि षिवाजीचे र७ नाही! हिंदू लोकांत जाती जाती भिज्डा असल्याने रजपुताचे किंवा मराठयाचे, ब्रां́णाचे किंवा बनियाचे र७ कसे म्हणता येअील!
अन् पुन्हा हेही ध्यानात ठेवले पाहिजे की, माझ्यात प्रतापाचे, षिवाजीचे, गोविंदसिंहांचे र७ आहे; ते माझे र७ाचे भाअू आहेत हे हिंदूने म्हणण्यात महात्मापण ते काय होते? अषी वाक्ये सामान्य प्रामाणिकपणेदेखील अुच्चारित, पण मुसलमान माझे मित्र आहेत, ते माझे र७ाचे भाअू आहेत हे सत्य, विषेशतः ज्या दिवषी श्रध्दानंदाचे हिंदू र७ मुसलमानी र७ाने सांडले गेले त्या दिवषी म्हणणे हेच महात्मापणास दिव्य षोभा आणणारे आहे.
आता विसंगततेचा अेक आक्षेप आहे की, जातिभेदामुळे बेटी व्यवहार बंद असल्याने जर हिंदू लोकांस माझ्यात प्रतापाचे, षिवाजीचे, वषिश्ठाचे किंवा श्रध्दानंदाचे र७ वाहत आहे असे म्हणता येत नाही तर मग त्याच जातीतून बाटून गेलेल्या मुसलमानांचे र७ माझ्या अगं ात आहे, ते मुसलमान माझ्या र७ाचे भाअू आहेत हे तरी कसे म्हणता येअील? ही विसंगतता ं́ा दुधखुळया हिंदूस वाटणे साहजिकच आहे. पण त्यांनी हे ध्यानात ठेवावे की, विसंगतपणा हा महात्म्यांच्या विधानास बंधनकारक होअू षकत नाही. नाहीतर प्रत्यक्ष बहिणीवरही बलात्कार करण्यास येणान्́या पाप्यावरही निरूपायाने षस्त्र चालविणे हीही हिंसा असल्याने, ती करू नये असे म्हणणारे महात्माजी अिंग्लिषांचा पक्ष घेअून जर्मन लोकांची कल्̈ाल अुडविण्यासाठी अिंग्रजी सैन्यात भरती व्हा म्हणून हिंदी तरूणांस अुपदेष करीत आजारी पडेतो अप्́हासाने प्रयत्न करते का?