महात्मा गांधींनी वसाहती स्वराज्य नि निःषस्त्र असहकारिता या विशयी जे समर्थन चालविले, त्यामुळै ‘पायोनियर’ अित्यादी पत्रे फार संतुश्ट झालेली आहेत. पायोनियर म्हणजे, “There can be little doubt but that the wide spread conservative elements in the land will once more rally round the Government and among them the foremost would be Mahatmaji. The revolutionary movement in the country would be isolated and left in the air and there would still be a chance of preserving India for the British Commonwealth of Nations! If no such step is taken, the futures would be black indeed!!’’

”अर्थात सरकारने आता सर्व नेमस्त लोकांस पुन्हा अेकदा आपल्या ध्वजाभोवती अेकवटावे अन् अिंग्लिष सरकारषी अजूनही अेकनिश्ठ असणान्́या या लोकांत महात्माजीच प्रमुख आहेत. त्यांना सरकारने जवळ करावे नाहीतर ब्रिटिष साम्राज्याचे भविश्य अंधकारमय होअील. ब्रिटिष साम्राज्य हिंदुस्थानला नित्याचे मुकेल. पण महात्माजींसारख्या अिंग्रजी साम्राज्याच्या अजूनही हितचिंतक असणान्́या षांतिवाद्यांस जर सरकार
आपल्या कक्षेत ओढील, तर क्रांतिकारकांची चळवळ अजूनही दडपून टाकता येअीलण् क्रांतिकारकानां दडपून
टाकण्यासाठी महात्माजींच्या नेमस्त, षांततावादी, अहिंसक नि अिंग्रजी साम्राज्याषी अजूनही अेकनिश्ठ राहणान्́या पक्षास आपल्याभोवती अेकवटा.“
‘पायोनिअर’ ही गांधीजींस आजकाल न विसरता ‘महात्माजी’ म्हणतो. महात्माजींच्या कलकल्̈याच्या धरपकडीसंबंधी अिंग्लंडचा ‘मॅचेस्टर गार्डियन’ ही म्हणतो की, बंगाल सरकारची बुध्दी कुठे गेली आहे! आज अिंग्रजी राज्याच्या हितार्थ जर कोणा मनुश्यास मोकळे सोडणे अुचित असेल तर ते महात्माजींना होय. कारण ते जगातील अेक थोर पुरूश आहेत. ं́ा मनुश्याला पकडून ठेवून क्रांतिकारकांचा मार्ग निश्कंटक करण्याचा मूर्खपणा सरकार करीत आहे यास काय म्हणावे?

अशा प्रकारे ‘Rally round the Gandhites’ हा अेकच बीजमंत्र सर्व ब्रिटिष राजनीतिज्ञ अुच्चारीत आहेत. हा तोच बीजमंत्र की, याच क्रांतिकारकांस, दडपण्यासाठी पूर्वी ऋशी मोर्लेने अुच्चारला! ‘Rally round the moderates’ मोर्ले म्हणाले, ‘Rally round the Gandhites’ ‘पायोनियन’ - ‘गार्डियन’ म्हणते.

हे त्यंाचे म्हणणे अयोग्य आहे असे कोण म्हणेल? खरोखरच ं́ा नश्ट क्रांतिकारकांच्या तडाख्यातून सरकारास नि ं́ा हिंदुस्थानास जर वाचविणे असेल-अर्थातच हिंदुस्थान ब्रिटिष साम्राज्यात दडपून ठेवणे म्हणजेच तो वाचणे - तर महात्माजींच्याच कार्यक्रमास अुचलून धरणे आपणा सर्वांस अवष्य आहे. कारण आज पाच-सहा वर्शे मागच्या नेमस्त पक्षाची जागा नवीन अनत्याचारी असहकारितावाद्यांनी भरून काढल्यापासून क्रांतिकारकांच्या अुग्र चळवळीच्या मार्गात सरकारची ओडवायरषाही किंवा रौलेट बिलषाही अितकी आडकाठी करू षकली नाही की जितकी महात्माषाही करू षकली. त्यांच्या राजकीय अुपयोगास विसरणे म्हणजे सरकारने आपल्या हितकत्र्यांषी वि९वासघात करणे आहे. आम्ही अनत्याचारी, अहिंसावादी ब्रिटिष साम्राज्यलिप्सू सर्व हिंदी लोक महात्माजींच्या पक्षाचे अुपकार कधीही विसरणार नाहीत. सरकारनेही विसरू नयेत. गांधीजींच्या प्रवासास अडथळा करणे तर दूरच, पण अुलट रेल्वे खर्च स्वतः सोसून त्यांस सरकारने हिंदुस्थानभर हिंडू देणे अिश्ट आहे. ही ‘पायोनियरा’दिकांच्या मताप्रमाणे आमचीही विनम्र सूचना आहे. कारण सरकार स्वतःविशयी सांगू षकणार नाही. अषा पुश्कळ महल्̈वाच्या गोश्टी महात्माजींचा पक्ष लोकांस पटवू षकतो; अन् क्रांतिकारकांच्या ज्या मार्गाचे ब्रिटिष साम्राज्यास अेखाद्या मारक विशाप्रमाणे भय वाटते, त्या मार्गापासून लोकांची परावृल्̈ाी करून राजकीय, सामाजिक, धार्मिक, औद्योगिक, षैक्षणिक अित्यादी सर्व दिषांनी ब्रिटिष साम्राज्यास सापेक्षतः अत्याधिक सोयीच्या नि न्यूनतम हानीच्या मार्गावर, हिंदी असंतोशास थोपवून धरू षकतो. ब्रिटिष साम्राज्याच्या हितार्थ नि हिंदुस्थानच्या हितार्थ- कारण ब्रिटिष हित म्हणजे हिंदी हित-सरकारने महात्माजीस पुन्हा केव्हाही असे अडवू नये.
अन् तषा अडकण्याची फारषी भीतीही आता अुरली नाही. कारण सरकारने ‘पायोनियरा’दिकांचा अभिप्राय संमत केला, हे दिल्लीच्या चहापानावरून अघड आहे. नि पकडले तर षक्य तितक्या अुपायांनी सुटून जाण्याचे धोरण म. गांधीजींनीही अंगीकारले आहे. हे त्यांनी स्वतःचा जातमुचलका दिला यावरून अुघड आहे. बिचारी असहकारिता! अेका चहाच्या पेल्यात बुडून मेली!

‘मॅन्चेस्टर गार्डियन’ ने अेक गोश्ट मात्र जरा आणखी स्पश्ट करावी. जे ‘मिस्टर गांधी’ सर्व ब्रिटिष पत्रांतून महात्माजी म्हणून वंद्य झाले ते तसे केव्हापासून झाले? ‘ते जगातील अेक अत्यंत थोर पुरूश’ जे झाले ते आजच झाले का जेव्हा त्यांस ‘swollen headed’ हणून सहा वर्शे तुरूंगात टाकण्यात आले तेव्हाही ते अत्यंत थोरंातील अेक होतेच?

दुसरी अेक प्रेमपूर्वक सूचना आहे ती अषी की, महात्मा गांधीच्या राजकीय, धार्मिक, सामाजिक अित्यादी अुपदेषांचे नि कार्यक्रमांचे कौतुक अिंग्लिष पत्रांनी प्रथमतः फारसे करू नये. कारण त्यामुळे गांधीजींचे कोठेतरी चुकत आहे, असा आरोप करण्यास या नश्ट क्रांतिकारकांस फावते. दुसरे की, जर अुघड कौतुक करावयाचेच झाले तर निदान ‘क्रातिकारकांची चळवळ आम्हा अिंग्रजांच्या सल्̈ोच्या मर्मीच घाव घालीत आहे, त्या घावापासून आम्हास वाचविण्यास महात्माजींची षिकवण नि कृती ही अेक बिनखर्ची अुपयु७ ढाल आहे म्हणून गांधीस जवळ करा’ असा कोटिक्रम तरी अिंग्रजांनी अुघडपणे करू नये. कारण त्यायोगे गांधीजींचा कार्यक्रम ब्रिटिष सल्̈ोच्या मर्मी कधीच झोबंणार नाही असे क्रांतिकारक सहज सिध्द करू षकतात नि त्यामुळे सरकारच्या मर्मस्थानी घाव घालण्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे बेसावध झालेले तरूण लोक पुन्हा अुच्छंखल होअून त्या मर्मीच हात घालू पाहतात. अिंग्लिष पत्रांच्या अषा कोटिक्रमास वेळच पडली, तर सरकारने अेखादा नवीन प्रेस अॅक्ट करून दंडनीय करावे. कारण क्रातिकारकांच्या लेखांपेक्ष ा अिंग्रजी पंत्राचे हे सत्यकथनच गांधीजींच्या धोरणास अधिक विघातक नि क्रांतिकारकांच्या चळवळीवर अधिक पोशक होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel