आपण वाचत असलेला हा लेखसंग्रह ठरवून लिहिला गेला नाहीये, किंवा या लेखसंग्रहातील लेख देखील एक ठराविक विषय घेऊन लिहिलेले नाहीत. हा लेखसंग्रह म्हणजे माझ्या लहानपणापासून मी लिहिलेले काही निवडक लेख, कथा आहेत. हा लघुकथा संग्रह ३० ते ४० कथांचा सहज करता आला असता, जर मी हे सर्व ठरवून केलं असतं.
दरवर्षी १ मे या तारखेला मी माझं एक तरी पुस्तक प्रकाशित करेन असं ठरवून मैत्र जीवांचे (२०१३), महाराष्ट्राचे शिल्पकार (२०१४), अग्निपुत्र (२०१५), पुन्हा नव्याने सुरुवात (२०१६) असे पुस्तक प्रकाशित झाले देखील. २०१७ साली टेरर ऍटॅक ऍट डोंबिवली स्टेशन हे पुस्तक प्रकाशित करायचं ठरवलं. २६/११ मध्ये शहीद झालेल्या पोलिसांना मानवंदना म्हणून त्या कादंबरीचं पहिलं प्रकरण प्रकाशित सुद्धा केलं, आता फक्त ट्रेलर बनवायला आणि मार्केटिंग करायची बाकी असताना मी ते पुस्तक वाचले. माझी लेखनशैली त्यात होती, पण एखाद्याने प्रेरणा घ्यावं असं काही त्यात नव्हतं. माझ्या आधीच्या कादंबरीमधून वाचकांना भरपूर सायंटिफिक ज्ञान मिळाले, माझी पुस्तकं वेगळी ठरली ती तरुणांना सहज समजून येईल अशा आधुनिक भाषाशैली, वैज्ञानिक पुरावे आणि कल्पनेच्या पलीकडे नेणाऱ्या मूळ कथांमुळे. यावेळी मला तो अनुभव नाही आला आणि म्हणून मी त्यात बदल करायचं ठरवलं.
पुस्तक प्रकाशनाला एक महिना राहिला असल्याने आणि हातात बरेच प्रोजेक्ट्स असल्याने मी पुस्तकाचं प्रकाशन पुढे ढकललं. तर मग १ मे २०१७ रोजी काय? आहे तेच पुस्तक प्रकाशित करण्याचा शब्द पाळता आला नाही, कमीत कमी ठरल्या दिवशी पुस्तक प्रकाशित झालं पाहिजे, हा शब्द तरी पाळू शकतो. या विचारांतूनच हा कथासंग्रह प्रकाशित करता आला.
यावेळी मी एक प्रयोग करायचं ठरवलं, ते म्हणजे पुस्तकातील लेख प्रूफ रिडींग न करता आहे तसेच प्रकाशित करायचे. कारण प्रस्तुत पुस्तकातील बरेचसे लेख मी माझ्या डायरीमध्ये लिहिले होते. तर माझ्या डायरीत मी कसं लिहू शकतो हे तुम्ही प्रस्तुत कथासंग्रहमध्ये वाचू शकता असं आपल्याला गंमतीने म्हणता येईल.
पुस्तकातील काही लेख व्हाट्सअपवर याआधी व्हायरल झाले होते, जे आपल्याला पुस्तक वाचताना लक्षात येईलच. तरी आपला जास्त वेळ न घेता मनोगत इथेच संपवतो, आशा करतो कि हा लेखसंग्रह नक्कीच आपल्या पसंतीस पडेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.