सातव्या इयत्तेत गेल्यापासून एकट्याने रेल्वेचा प्रवास करू लागलो होतो, तेव्हाच्या प्रवासाची एक आठवण.
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नाशिकला माझ्या आज्जी-आजोबांना भेटायला गेलो होतो. जाताना मम्मी आणि लहान भावासोबत गेलो, पण आमच्या इथे क्रिकेटचे सामने असल्यामुळे मी काही दिवसांसाठी ठाण्याला जाण्याचा हट्ट धरला. पप्पा कामामुळे येऊ शकत नव्हते आणि मामा मला ठाण्याला घेऊन जाणार नव्हता, तर अण्णांनी मला एकट्याने ठाण्याला जाण्याची परवानगी दिली.
अण्णा मला पंचवटीमार्गे नाशिक बस डेपोपर्यंत घेऊन गेले. तिथून त्यांनी मला कसाराला जाणाऱ्या एसटीमध्ये बसवून दिलं ते एका अटीवर, ते म्हणजे क्रिकेटचे सामने संपल्यावर पुन्हा गावी यायचं. मी आधीच अट मान्य केली होती. पहिल्यांदाच मी एवढा लांबचा प्रवास एकट्याने करत होतो.
एसटीचा प्रवास एकट्याने सुरू झाला आणि घरातील सर्व मोठ्या मंडळींचे चेहरे डोळ्यासमोर आले.
मम्मी, ‘काय अडलंय त्या क्रिकेटमध्ये? गावी आला आहेस तर आराम कर ना! आजी अण्णांसोबत वेळ घालव.’
पप्पा, ‘नाशिकला सुद्धा मुलं क्रिकेट खेळतात, तिथे खेळ. मॅचसाठी ठाण्याला यायची काय गरज आहे? अभ्यासासाठी कधी एवढं केलं नाहीस.’
मोठा मामा, ‘माझी गाडी घे आणि पाहिजे तेवढा हिंडत बस.’
आज्जी, ‘मला कुरोड्या, पापड बनवायला मदत केली असतीस.’
छोटा मामा, ‘मॅच जाऊ दे, आपण पांडवलेणीला जाऊ, तिथे पांडव राहिले होते.’
मोठी मामी, ‘तू खरंच एकट्याने प्रवास करू शकशील का?’
मी एकट्याने नाशिकहून ठाण्याला जाणं, ते सुद्धा फक्त क्रिकेटची मॅच खेळण्यासाठी, ते सुद्धा सातव्या इयत्तेत असताना, हे म्हणजे या सर्व मंडळींना न पचण्यासारखं होतं. अण्णांना मात्र माझ्यावर नेहमी विश्वास असायचा आणि मोठ्यांना त्यांच्याबद्दल आदर, आणि म्हणूनच अण्णांनी मला परवानगी दिल्यावर कोणी काहीही बोललं नाही.
शेजारच्या बिल्डिंगशी लावलेली मॅच माझ्यासाठी त्यावेळी खूप महत्त्वाची होती. जणू काही वर्ल्ड कपच. ते एक वय असतं जेव्हा या गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्वाच्या असतात. माझ्या बाबतीत देखील तसंच होतं. डोळ्यासमोर फक्त मॅच जिंकायची आहे एवढंच लक्ष्य होतं. पण त्यासाठी मी चक्क नाशिक ते ठाणे एकट्याने प्रवास करत होतो या गोष्टीचं मला काहीच वाटत नव्हतं, दुसऱ्या कोणत्या कारणासाठी ठाण्याला जात असतो तर या प्रवासाबाबत माझं मत घरातील वरिष्ठांसारखं असतं.
आमची एसटी कसाऱ्याला पोहोचली. उतरल्यावर कुठे जायचं हे मला माहीत नव्हतं. लोक ज्या दिशेने चाललेत त्या दिशेने रेल्वे स्थानक असेल असं समजून मी देखील त्याच दिशेने जाऊ लागलो. हो, ते रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात होते. वाटेत मी मीठ मसाला लावलेले पेरू आणि जांभूळ घेतले. मी तिकीट काउंटरजवळ पोहोचलो. प्लॅटफॉर्मवर गाडी उभी होती आणि पुढची गाडी दोन तासांनी होती.
मला काहीही करून त्याच गाडीने जायचं होतं. मी पहिल्यांदाच रेल्वेचं तिकीट काढत होतो. पुढे बरीच मोठी रांग होती. हो नाही म्हणता माझा नंबर आला आणि गाडी सुटण्याची घोषणा झाली. मी घाईघाईत तिकीट आणि उरलेले पैसे घेतले आणि प्लॅटफॉर्मच्या दिशेने धावू लागलो.
मला उशीर झाला होता. ट्रेन हळू हळू पुढे सरकत होती. तिचा वेग कमी होता, पण मी कधी चालती गाडी पकडली नव्हती, आणि ट्रेनमध्ये चढताना मम्मी-पप्पांचा हात मी नेहमी पकडलेला असायचो. आज ते दोघेही नव्हते आणि गाडी प्लॅटफॉर्मवरून निघत होती. त्या गाडीत चढण्याची माझी हिम्मत होत नव्हती. हातात पेरू, जांभळाचं द्रोण, सुटे पैसे आणि तिकीट घेऊन मी तसाच उभा होतो. पुढे काय होईल याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. डोळ्यासमोरून मी गाडी जाताना पाहत होतो आणि वेगळं काहीतरी घडलं.
माझ्याच वयाची काही मुलं माझ्या पाठीमागून धावत पुढे निघून गेली. दहाबारा मुलं होती ती, उनाडक्या करणारीच होती बहुतेक. त्यांच्या कपड्यांवरून तसं वाटत होतं.
तर धावत ती सगळी मुलं एकेक करून मिळेल त्या डब्ब्यात चढले. आणि दारापाशीच उभे राहिले. त्यांच्यापैकी एकाने माझ्याकडे पाहिलं आणि मला सुद्धा धावत ट्रेन पकडायला सांगितली. कसली ती ओळख? तो म्हणाला आणि मी धावत सुटलो. त्याच्यासोबतचे इतर ट्रेनमधून ओरडत मला प्रोत्साहन देत होते. प्लॅटफॉर्मवरील लोकांसाठी तो चांगलाच टाईमपास होता. मी धावतो धावतो धावतोय आणि एकदाची मी ती ट्रेन पकडली.
त्या मुलांनी आधी माझं कौतुक केलं, मग थोड्याच वेळात मैत्री करून त्यांनी माझ्यासोबत काकडी आणि पेरू संपवले. ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबली की ते खाली उतरायचे आणि ट्रेन सुरू होताच धावत ते ट्रेन पकडायचे. प्लेटफॉर्मवरील लोकांना चिडवायचे. आमच्यात गप्पा रंगल्यानंतर माझी मोठेपणा सांगायची वेळ आली, मी क्रिकेटमध्ये काय काय केलं ते त्यांना सांगत होतो. माझ्याशिवाय माझी टीम जिंकूच शकत नाही आणि म्हणूनच मी नाशिकहून एकटा ठाण्याला चाललो आहे.
त्या मुलांना काहीच वाटलं नाही. नेहमी कौतुक ऐकण्याची सवय असल्याने मला त्यांचा राग आला. आश्चर्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर नव्हतेच, उलट माझ्या क्रिकेटच्या ट्रिक्सवर देखील त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण प्रवासात कोणी ओळखीचं नाही म्हणून मी त्यांच्यासोबत बोलत राहिलो.
काही स्थानकं गेल्यानंतर त्या मुलांनी मला सीटवर जाऊन बसायला सांगितलं. मला कधी दरवाजाजवळ उभं राहता आलं नव्हतं, ते आता मोठं कोणी सोबत नाही म्हणून उभा होतो. ना ते ऐकायला तयार ना मी. बाहेर डोकावून मग ते मला एवढंच म्हणाले, हम जो कर रहे है वो तुम मत करो। ये हमारा रोजका है। तुम अच्छा खेलते हो, तुम क्रिकेट खेलो। आगे कभी मुलाकात हुई तो आगे का बादमें देखेंगे।’
ती मुलं एवढंच म्हणली आणि ट्रेन एका पुलावरून जात असताना त्यांनी वेगवेगळ्या दरवाजांमधून एकेक करून पुलाखालील पाण्यात उडी मारली. मी होतो त्या डब्यातून दोघांनी पाण्यात उडी मारली.
क्षण दोन क्षण सगळं स्तब्ध झालं. माझ्या वयाच्या मुलांनी चालत्या गाडीमधून उडी मारली, का तर पाण्यात पोहायचं होतं. एका क्षणात त्यांनी माझा खोटा मोठेपणा काढून टाकला. मी मिलिटरी स्कुलचा विद्यार्थी}असून देखील त्यांच्या त्या प्रकाराने थरथरत होतो. या संपूर्ण प्रवासात मला पहिल्यांदाच भीती वाटत होती. ट्रेनमधल्या इतर प्रवाशांनी मला आत नेलं आणि बसवलं. ते काय बोलत आहेत मला काहीच कळत नव्हतं. माझी क्रिकेट, माझं मिलिटरी स्कुलमधील कामगिरी, माझी चित्रकला, माझा एकट्याने प्रवास करण्यात मला वाटलेला मोठेपणा, सगळं मला त्यांच्या उडीपुढे छोटं वाटलं. संपूर्ण प्रवासात मी गप्प राहिलो.
ठाण्याला उतरल्यावर मला पप्पा भेटले. त्यांना माझ्या एकट्याने प्रवास करण्याचं कौतुक वाटत होतं आणि माझ्या डोळ्यासमोर त्या मुलांची ट्रेनमधून मारलेली उडी होती, जी मला स्लामडॉगमधील पुढील गाणं ऐकताना नेहमी आठवते.
They cant touch me
We break off run so faster
They cant even touch me
Been that you see
Touch me.. i ll show you choose
Run zig zag quickly
Pick up the pack of my journey
Dont suddenly start to follow me
I m a luck… some days the suck
We live by the buck
We get for the family
One day i wanna be a star
So i get to hang in a bar
I ll go to vegas and play off
Just to forget my scars
Ek do teen char panch che saath aat nao das gyara bara teraa…
Sweat shops have made me shifty
Like a ninja with speed i am nifty
I hope i live till i am fifty
See my city go a quick to a thrifty

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.