आशिष अरुण कर्ले

३२ शिराळा (सांगली)
९७६५२६२९२६ | ashishlarle101@gmail.com


हरे कृष्ण

ISKCON (International Society for Krishna Consciousness)

'आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ' या संस्थेची स्थापना श्री श्रीमद ए सी भक्तीवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांनी १९६६ साली न्यूयॉर्क अमेरिकेत केली. त्यावेळी त्यांचे वय ७० वर्षे होते. आपले गुरू भक्तीसिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज यांची आज्ञा पूर्ण करण्याच्या उद्देशाने प्रभुपाद १३ ऑगस्ट १९६५ रोजी आपल्या ६९ व्या वाढदिवसादिवशी ‘जलदुत’ नामक मालवाहू जहाजातून अमेरिकेला रवाना झाले. सर्वसामान्यपणे या वयात लोक आपल्या कार्यातून निवुत्ती घेऊन विश्रांती घेतात अशा वयात प्रभुपाद अमेरिकेला गेले. त्यांच्यासोबत फक्त वैदिक साहित्याने भरलेली एक पेटी, अवघे ४०₹ आणि थोडे कोरडे धान्य होते. तब्बल ३७ दिवसांच्या कठीण प्रवासांनंतर प्रभुपाद अमेरिकेच्या बोस्टन बंदरात पोहचले या कठीण प्रवासादरम्यान प्रभुपादांना हृदयविकाराचे झटके येऊन गेले परंतु भगवान श्रीकृष्णांच्या कृपेनं ते सुखरूप अमेरिकेत पोहचले. एका वर्षाच्या कठोर परिश्रमानंतर त्यांनी जुलै १९६६ मध्ये ‘इस्कॉन’ संस्थेची स्थापना केली. प्रभूपादांच्या तत्वज्ञानाकडे अमेरिकेतील तरूणपिढी आकर्षित होऊ लागली.जुलै १९६५ ते १४ नोव्हेंबर १९७७ या अवघ्या १२ वर्षात प्रभूपादांनी संपूर्ण जगभरात १०८ राधाकृष्ण मंदीर, गुरुकुल, आश्रम फार्म कम्युनिटींची स्थापना केली.प्रवचनांसाठी त्यांनी संपूर्ण पृथ्वीला १४ वेळा प्रदक्षिणा घातली. प्रभूपपादांनी ८० हुन अधिक पुस्तके लिहिली, त्यांनी लिहिलेल्या Bhgavad Gita As It Is (भगवद्गीता जशी आहे तशी ) या ग्रंथाचे जगभरातील ४० हुन अधिक भाषेत भाषांतर झाले आहे शिवाय अमेरिकेतील ९०% हुन अधिक विश्वविद्यालयात पाठ्यक्रमात निर्धारित केली आहे. आत्तापर्यंत या पुस्तकाच्या ६ कोटींपेक्षा अधिक प्रती वितरित झाल्या आहेत याचशिवाय प्रभूपादांच्या श्रीमद भागवत महापुरात या १८००० श्लोकांचे इंग्रजी भाषेत भाषांतर (तात्पर्यासहित) केले. दररोज प्रभातभ्रमणाच्यावेळी त्यांनी कित्येक शास्त्रज्ञ, तत्वज्ञान, धार्मिक मंडळी यांच्याशी चर्चा केली. पाच हजारहून अधिक शिष्यांना दिक्षा दिली. त्यांच्या पश्चात आज त्यांचे अनुयायी या संस्थेचे काम पाहत आहेत. प्रभूपादांनी इस्कॉनच्या स्थापनेपूर्वी 'बॅक टू गॉडहेड' हे मासिक सुरू केले. या मासिकाचे लेखन, छपाई, प्रकाशन, वितरण अशी सर्व कामे स्वतःहुन एकहाती चालवत असत आज त्यांचे अनुयायी जगभरातील कित्येक भाषांत हे मासिक प्रकाशित करतात. मराठीमध्येही हे मासिक ‘जाऊ देवाचिया गावा’ या नावाने प्रकाशित होते.

कित्येक संस्थेच्या संस्थापकाच्या पश्चात बंद पडतात पण इस्कॉन या सर्वाला अपवाद आहे. २०१६ रोजी इस्कॉन च्या स्थापनेला ५० वर्षें पूर्ण झाली आज जगभरात इस्कॉनची ६०० हुन अधिक मंदिरे आहेत शिवाय कित्येक गुरुकुल, आश्रम,फार्म कम्युन्यूटी आहेत. इस्कॉन द्वारे दररोज लाखो विद्यार्थ्यांना खिचडी प्रसाद मोफत दिला जातो. लाखों भक्तांना प्रसाद वितरित केला जातो. 'भक्तीवेदांत बुक ट्रस्ट' ही वैदिक साहित्यांचे मोठ्या प्रमाणावर वितरण करणारी बुकट्रस्ट आहे. प्रभूपादांनी इस्कॉन हे एक अस घर निर्माण केलं आहे ज्यामध्ये संपूर्ण विश्व सामावू शकेल...

Prabhupad, He Built A House In Which Whole World Can Live.

संपूर्ण विश्वामध्ये शांती आणि एकता निर्माण होण्यासाठी आणि प्रत्येक जिवात्म्याला मूळ घरी भगवत्धामात परत जाण्यासाठी दिलेली एक अमूल्य भेट आहे!

हरे कृष्ण.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel