आशा पाटील, सोलापूर
आई मी लावेन छोटस झाडं
त्यांना नाही मी कधी मारणार
माझी नी त्यांची गट्टी जमनार
झाडही हळूहळू मोठ्ठी होणार
त्यांना मी रोज पाणी घालणार
गप्पा गोष्टी मी करणार
झाडांची बाग मी फुलवणार
झाडांना येतील फुलं नी फळं
त्यांना पहायला येतील ना मुलं
त्यांच्यांशी खूपखूप मी खेळणार
झाडांमुळे येतील पक्षीच पक्षी
बागेत पाखरं किलबिलणार
त्यांना दाणे मी देणार
चारापाणी ही ठेवणार
खूपखूप गट्टी मी करणार
शाळा शिकुनी मोठ्ठा होणार
एवढ्याशा बागेचा मी राजा
राज्य मी इथे खुशाल करणार
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.