लाभोनी हा जन्म मंत्रे कां फसावें । आंतचि रिघावें शरण गुरुसी ॥१॥

त्यजुनि शास्त्र शंका मान महत्व लज । वराव पुन्हा राजयोगीमंत्र ॥२॥

देववावा आधईं कांतेसी मग स्वयें । घ्यावा संप्रदाय उपदेश ॥३॥

करो नये विचार जरी आड येती । वाळवेही पती माता पिता ॥४॥

बुड्विती स्वहित तेचि साच वैरी । नेती यमपुरी पुर्वजेंसी ॥५॥

खोवाव कां तारुं अक्षय ब्रह्मदाता । जन्मीचेया कांता पती सर्व ॥६॥

झाले जे अनन्य राजयोगीयांसी । नलगे तयासी करणें योग ॥७॥

होवोनि जीवें दासी राजयोगीयाची । पावावें पद तें ची तयासंगे ॥८॥

नाहीं भरंवसा आयुष्य बुडबुडा । नाशायां बापुडा मग म्हणे ॥९॥

सांगे गुरु तेंचि करावें सर्व देहें । हें करी नोहे हें म्हणे नये ॥१०॥

गात्र शक्ती तारुण्य इंद्रिये जंव तंव ॥ व्हावे देहें देव नोहे मग ॥११॥

म्हणे जनार्दन सदुरुपायी लोटी । उघडी भ्रमताटी एकनाथा ॥१२॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to श्रीजनार्दनस्वामींचे ताटीचे अभंग