आले श्रीगुरुनाथ अथवा येती कळे । व्हावें उतावीळ जावें तेथे ॥१॥

आणावे सेवावें सर्वस्वे निरंतर । तरीचशिष्य येर जाती नरका ॥२॥

असो कांही काज हर्ष का संकट । समय प्राणांत होवो कांहीं ॥३॥

देवो कोणी ताप जावो देह प्राण । उडवो शीर आण शपथ वाहो ॥४॥

जावो देवो नये तारकासी कंही । पडो ब्रह्मांडही कोसळोनि ॥५॥

घाडलिया होय सर्वस्वाची बुड । पुरवावे कोड सर्व कांही ॥६॥

विकावे देहें धरुं नये लाज । साधावें निजकाज याचि देहें ॥७॥

घेवोनि शपथ होवोनि निर्भय । वरावे अक्षय तारकासी ॥८॥

दिधले देवें गात्र शक्ति हें वैभव । मन बुद्धी सर्व अंतरबाह्म ॥९॥

न मिळे न जन्म ऐसा हा पुढती । खोविल्या मागुती कांही केल्या ॥१०॥

नेमें नित्य निशी साठ घटीं आत । साधावे निजहित झटी एक ॥११॥

नसेचि सुलभ राजयोगा ऐसें । याचि देहीं दिसे देव डोळां ॥१२॥

एकांती अभ्यास निकट गुरुक्षेत्री । करावा बसोनि घरीं करु नये ॥१३॥

पुरुषें पत्‍नीसह करावा अभ्यास । घ्यावा उपदेश उमयतां ॥१४॥

आकारिली वस्तु रुपें स्त्रीपुरुष । एकचि प्रत्यक्ष मासे दोन ॥१५॥

म्हणोनि श्रौत स्मार्त योगयाग सर्व । करावें सर्वथैव पत्‍नीसह ॥१६॥

मोगोनि विलास साधावा राजयोग । हटी तो निहर्ग वसे वनी ॥१७॥

असोनिया पत्नी करोनये एकाकी । नेदावे कवतिकी तारकेही ॥१८॥

वदो नये निमित्त काम धंदा आळस । निर्वाहाचे मीष सच्छिष्येंही ॥१९॥

सेवनी प्रेमें सुखें राहोनी संसारी । व्हावे स्वयें हरी आपेंआप ॥२०॥

म्हणे जनार्दन साठवावा संपुटी । उघडी भ्रमताटीएकनाथ ॥२१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to श्रीजनार्दनस्वामींचे ताटीचे अभंग