बोधावें सकळां गुरु प्रेममरें । वर्णोनि चरित्रें श्रीगुरुचीं ॥१॥
फिरुनी स्त्रियां नरां विनवावेंसलगी ॥ स्वामीसेवें लागीं अभय दानां ॥२॥
शिबिका न्हाणी गाणीं विंजणे चौफळा करावे मंगळ जयजयकारे ॥३॥
सुवासिनी करेंकुंकुम आरत्या । करव्या ब्रह्मादात्या सहस्त्र नित्य ॥४॥
कडुनि सहस्त्र विप्रा तुळसी विल्व पुष्पें । अर्पावें साक्षेपें नित्य नेमें ॥५॥
तांबुल विलास भोग वेळों वेळां । भोगावावा सोहळा श्रीतारका ॥६॥
पदार्थ शर्करा नवनीत दुग्ध । अर्पावा नैवेद्य क्षणोक्षणी ॥७॥
नेमें नित्य तीर्थें प्रसादे पावन । करावें विश्व संपुर्ण श्रीगुरुच्या ॥८॥
नसे गुरुवीण तीर्थ देव ब्रह्मा । नेणोनि मुढ वर्म शिणती वायां ॥९॥
म्हणे जनार्दन खुणेची गुज गोष्टी । उघडी भ्रमताटी एकनाथा ॥१०॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.