दुर्लभ नर जन्म भाग्योदय वेळ । जिंकुनी कळी काळ व्हावे मुक्त ॥१॥
प्राप्तवेळे जना बुडाले डोहळे । पुन्हा हा न मिळे कांही केल्या ॥२॥
वेष दंभ ज्ञान सकळांसी मान्य म्हणती शरण होऊ तया ॥३॥
त्यागोनि हेंमौढ्य मनें सावधान । करावेम नित्य श्रवण गुरुशास्त्र ॥४॥
करोनि मनन तेंचि आचरावें । सदुरुप्ती व्हावे शरण भावें ॥५॥
करो कांही आज्ञा तैसेची करावें । तेंचि करवावें सकळां कडोनि ॥६॥
वाद भेद वर्म त्यागोनिया अन्य ॥ व्हावे पैं शरण योगी यासी ॥७॥
म्हणे जनार्दन घावो नये होटी । उघडी भ्रमताटी एकनाथ ॥८॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.