कोरोना व्हायरसचा सामना कसा कराल?

Covid-19 नामकरण

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि काही उपाययोजना

Covid-19 नामकरण

Co- Corona
Vi- Virus
D- Disease
19- २०१९ मध्ये सापडला म्हणून १९.

व्हायरस हे होस्ट स्पेसिफिक असतात म्हणजेच एका प्रजातीला बाधित करणारे व्हायरस दुसऱ्या प्रजातीला बाधित करतीलच असे नाही. म्हणलं जात कि, वटवाघूळामध्ये खूप सारे व्हायरस असतात. चीनच्या वूहानमधील ज्या लॅबमधून कोरोना सुटला अस म्हणलं जात आहे, त्याठिकाणी सुद्धा वटवाघुळांवर शोध कार्यक्रम चालू होते. वटवाघूळ आणि Pangelion ( खवल्या मांजर) या दोन प्राण्यांच्या शरीरात सापडणारा कोरोना हा सध्याच्या Covid-19 सारखाच आहे.