(खाली नाव व पदनाम काल्पनिक आहे,)
प्रथम टप्पा
दिनेश परदेशातून आला होता. विमानतळावर त्याला ताप नव्हता. त्याला घरी जाऊ दिले. परंतु विमानतळावर त्याला तो १४ दिवस घरातच स्वतःला कैद करून घेईल असे प्रतिज्ञापत्र देण्यात आले. आणि ताप येईल तेव्हा xxxxxxxx या नंबरवर संपर्क साधण्यास सांगण्यात आले. घरी जाऊन त्याने प्रतिज्ञापत्रात दिलेल्या अटींचे पालन केले. तो घरात कैद होता. त्याने घरातील सदस्यांपासूनही अंतर ठेवले.
दिनेशची आई म्हणाली की तुला काहीही झाले नाही. अलग राहू नको. बर्याच दिवसांनंतर तुला घरातील जेवण मिळेल, ये किचिनमध्ये मी गरम गरम जेवण देते. दिनेशने नकार दिला.
दुसर्या दिवशी सकाळी मम्मीने पुन्हा तेच सांगितले. यावेळी दिनेश रागावला. तो मम्मीला ओरडला, मम्मीच्या डोळ्यात अश्रू आले. आईला वाईट वाटलं.
दिनेश एकांतात राहिला.
६-७ व्या दिवशी, दिनेशला ताप, सर्दी खोकला ही लक्षणे दिसू लागली. दिनेशने हेल्पलाईनला फोन केला. कोरोना चाचणी घेण्यात आली. तो पॉझिटिव निघाला.
त्याच्या कुटुंबातील सदस्यांचीही चाचणी घेण्यात आली. ते सर्व निगेटिव निघाले.
१ कि.मी.च्या परिघामधिल लोकांची चौकशी करण्यात आली, आणि अशा सर्व लोकांचीही चाचणी घेण्यात आली. सर्वांनी सांगितले की दिनेशला घराबाहेर पडताना कोणी पाहिले नाही. त्याने स्वत: ला चांगले प्रकारे isolate केल्यामुळे, कोरोनाचा प्रसार त्याने इतर कोणालाही केला नाही. दिनेश तरुण होता. कोरोनाची लक्षणे अगदी किरकोळ होती. फक्त ताप, सर्दी खोकला, शरीरावर वेदना इत्यादी. ७ दिवसांच्या उपचारानंतर तो पूर्णपणे बरा झाला आणि हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर तो घरी आला.
काल जी आई भावुक झाली होती, ती आज संपूर्ण घरात कोरोना नाही म्हणून आनंद साजरा करीत आहे.
हा पहिला टप्पा आहे जिथे कोरोना फक्त परदेशातल्या माणसामध्ये असतो. त्याने तो दुसर्या कोणालाही दिला नाही.
********
स्टेज २
कोरोना रवीमध्ये पॉझिटिव निघाला. त्याला त्याच्या मागील दिवसांची सर्व माहिती विचारण्यात आली होती. त्या माहितीवरून तो परदेशात गेला नसल्याचे दिसून आले. परंतु अलीकडेच परदेशात आलेल्या व्यक्तीशी संपर्क आला आहे. परवा तो एका सोनाराकडे दागिने खरेदी करण्यासाठी गेला होता. तेथील सेठजी नुकतेच परदेशातून परत आले होते.
परदेशातून आल्यावर सेठजींना विमानतळावर ताप आला नाही. म्हणूनच त्याला घरी जाऊ दिले. परंतु त्याचे प्रतिज्ञापत्र पूर्ण केले गेले की, पुढील १४ दिवस ते पूर्णपणे एकटे राहतील आणि घर सोडणार नाहीत. कुटुंबातील सदस्यांपासूनही दूर राहील. परदेशातून आलेल्या सेठ यांनी विमानतळावर भरलेले प्रतिज्ञापत्राची खिल्ली उडवली. तो घरी सर्वांना भेटला. संध्याकाळी आपली आवडती भाजी खाल्ली आणि दुसर्या दिवशी तो त्याच्या दागिन्यांच्या दुकानात गेला. (सिझन असल्यामुळे शेटजी, दुकान बंद थोडीच करणार होता. हंगामात लाखोची विक्री होणार होती.)
६ व्या दिवशी शेटजींना ताप आला. त्याच्या कुटूंबातील सर्वांना ताप आला. कुटुंबातील सदस्यांमध्ये वृद्ध आईसुद्धा होती. प्रत्येकाची चौकशी करण्यात आली. सर्व तपासात पॉझिटिव आले.
म्हणजेच परदेशातला माणूस स्वतः पॉझिटिव असतो. मग तो घरातील सदस्यांनाही पॉझिटिव करतो.
याव्यतिरिक्त, तो दुकानातील ४५० लोकांच्या संपर्कात आला. जसे नोकर, ग्राहक इ. त्यापैकी एक रवी होता.
आता सर्व ४५० लोकांची तपासणी केली जात आहे. त्यांच्यात काही पॉझिटिव असले तर तो दुसरा टप्पा आहे.
भीती अशी आहे की आता या ४५० लोकांपैकी प्रत्येकाला हे माहित नव्हते की ते कुठे गेले. एकंदरीत, स्टेज २ म्हणजे कोरोना पॉझिटिव माणूस परदेशी गेला नाही. परंतु अलीकडेच परदेशातुन आलेल्या व्यक्तीशी त्याने संपर्क साधला आहे.
********
स्टेज ३
सर्दी खोकल्याच्या तापामुळे मनोजला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे तो कोरोना पॉझिटिव्ह आला. पण मनोज कधीच परदेशात गेला नाही. किंवा अलीकडे परदेशात आलेल्या कोणाशीही तो संपर्कात आला नाही. म्हणजेच आता मनोजला कोरोनाची लागण कोठे झाली हे आपल्याला माहित नाही?
स्टेज १ मध्ये तो माणूस स्वतः परदेशातून आला होता.
स्टेज २ ला माहित आहे की स्रोत सेठजी आहे.
आता सेठजी आणि त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची चाचणी घेतली आणि १४ दिवस त्यांना isolate केले.
स्टेज ३ मध्ये आपल्याला स्त्रोत माहित नाही.
जर आपल्याला स्त्रोत माहित नसेल तर आपण शोध घेऊ शकत नाही. त्यांना अलग ठेवू शकत नाही. तो स्रोत कोठे असेल आणि किती लोकांना अनवधानाने संसर्ग होईल याची त्यांनाही जाणिव नाही.
स्टेज ३ कशी तयार होते?
४५० लोक सेठजींच्या संपर्कात आले होते. सेठजी पॉजिटिव असल्याची बातमी पसरताच त्यांचे सर्व ग्राहक, नोकर, घरातील, शेजारी, दुकानाचे शेजारी, दुधवाला, भांडीवाला, चाय वाला… सर्व जण दवाखान्यात धावले. एकूण आकडा ४४० होता. परंतु १० लोक अजुन आले नव्हते. जर त्या १० पैकी कुणीही मंदिरात, बाजारात, किंवा ईतर सार्वजनिक ठिकाणी प्रवेश केला तर हा विषाणू बराच पसरू शकेल.
ही स्टेज ३ आहे जिथे आपणास स्त्रोत माहित नाही.
स्टेज ३ चे उपाय
१४ दिवस लॉकडाउन, कर्फ्यू लागू करा. १४ दिवस शहर लॉक करा. कोणालाही बाहेर पडू देऊ नका.
या लॉकडाउनने काय होईल ???
प्रत्येक माणूस घरात बंद आहे. जो माणूस संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला नाही तो सुरक्षित आहे. अज्ञात स्त्रोतही त्याच्या घरात बंद आहे. जेव्हा तो आजारी पडेल, तो रुग्णालयात दाखल होईल आणि आपल्याला कळेल की हा अज्ञात स्त्रोत आहे.
हे शक्य आहे की या अज्ञात स्त्रोताने त्यांच्या घरातून आणखी ४ लोकांना संक्रमित केले आहे, परंतु बाकीचे शहर वाचले आहे.
जर लॉकडाउन नसते. तर त्या स्त्रोतास थांबवता आले नसते. आणि अशा हजारो लोकांमध्ये त्याने कोरोना पसरविला असता जे निरोगी आहेत. मग हे हजारो अज्ञात लोक लाखोंच्या संख्येने त्याचा प्रसार करतील. म्हणूनच संपूर्ण शहर लॉकडाऊनमधून वाचेल आणि अज्ञात स्त्रोत पकडला जाईल.
स्टेज २ ही स्टेज ३ मध्ये न बदलण्यासाठी उपाय.
लवकर लॉकडाउन म्हणजे स्टेज ३ येण्यापूर्वी लॉकडाउन. हे लॉकडाउन १४ दिवसांपेक्षा कमी असेल.
उदाहरणार्थ सेठजी विमानतळावर उतरले पण त्यांनी नियमांचे पालन केले नाही आणि घरभर कोरोना दिला. सकाळी उठून दुकान उघडण्यासाठी गेले.
(हंगामात लाखोंची विक्री होते म्हणुन आपले दुकान कसे बंद करावे म्हणुन त्यांनी दुकान चालु ठेवले) पण शटडाऊन असल्यामुळे. पोलिस काठी घेवुन सेठजीच्या दिशेने धावतील. काठी पाहून सेठजी शटर खाली करून दुकान बंद करतील. सर्व बाजार आता बंद असल्याने. ते ४५० ग्राहकही आले नाहीत. सर्व वाचले. रविही वाचला. बस फक्त सेठजीच्या कुटुंबाला कोरोना झाला. परंतु ६ व्या ते ७ व्या दिवसापर्यंत कोरोनाची लक्षणे उद्भवतात तेव्हा लॉकडाऊन असल्यामुळे त्यांना व जे लोक परदेशातून परत आले आहेत त्यांना ७ व्या दिवसांपर्यंत कोरोनाची लक्षणे दिसतील व त्यांना रुग्णालयात नेले जाईल. एकतर ते निगेटिव असतील किंवा त्यांचा ईलाज होईल.
लॉकडाऊनला सपोर्ट करा