-    भाग्यश्री मार्तंड लाठकर

जागतिक सुट्टी म्हणजे सक्तीची विश्रांती. खूप दिवसानंतर निवांत वेळ मिळाला स्वतः शी संवाद साधायला.या काळात आजपर्यंत जे काही करायचं राहुन गेलं ते हळू हळू बाहेर यायला लागले.रोजच्या धावपळीत रांगोळी,पेंटिंग,वाचन,लिखाण यासाठी वेळच मिळत नसे.पण या काळात मी रांगोळीतून काही व्यक्तिचित्रे काढली. एक वर्षापासून भिंतीवर वारलीचे पेंटिंग करण्याचं ठरवलं होत तेही मी या टाळेबंदीच्या सुट्टीमध्ये केलं. मनात राहून गेलेल्या खूप गोष्टी या काळात केल्या. दररोज मी लॉक डाऊन या विषयावर लेख लिहित आहे. २२ मार्च पासून ते आज पर्यंत लेखन चालूच ठेवले आहे आणि ते लेख मी सोशल मीडियावर प्रसिद्ध करत आहे. सामाजिक विषयावर कविताही केल्या आहेत. त्यापण प्रसिद्ध करत आहे. जे काही सुचत आहे ते मी माझ्या कवितेतून मांडत आहे. वेगवेगळ्या विषयांवरही लेख लिहिले आहेत. पेन्सिल शेडींग अनेक व्यक्तिचित्र रेखाटली आहेत. काही खाण्याचे पदार्थ बनवले  आहेत. प्रत्येकानी आपल्याला आवडेल असा एखादा छंद जोपासला तर नक्कीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. याबरोबरच मी माझ्या व बालमैत्रिनिना मन मोकळे बोलले. खूप वर्षानंतर पुन्हा बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला.जणू परत त्या जगात जायला. मिळाल. एक आठवणीतलं जग परत भेटायला आलं ते फक्त लॉक डाऊन मुळे. या निवांत वेळेत प्रत्येकानी आपल्या बालमित्र, मैत्रिणीला फोन करून बोलावं अन् आपल्याच बालपणाशी संवाद साधावा. प्रत्येकात काही न काही तरी सुप्त कला गुण असतात ते बाहेर येऊ द्यावेत. आपल्या कलेतून व्यक्त होत जावं. तो आनंद काही वेगळाच आहे. त्यातून तुम्ही उत्साहानं जगायला मिळेल.सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. स्वनिर्मितिचा आनंद जगण्याची ऊर्मी देऊन जातो.

अंतरंगात डोकावताना खरंच धावळीमुळे थकलेलं मन दिसतं. वाटतं आपण आतापर्यंत किती धावत होतो.कधी विश्रांती मिळेल असं वाटतं होतं.थकलेल्या मनाला मात्र सक्तीची विश्रांती मिळाली.स्वतःशीच संवाद साधला अन् मनात होतं की आपण खूप लिखाण करावं. सकारात्मक लिहावं मी ते लिहिलं जे मलाही वाटत नव्हते मी लिहीन म्हणून. पण या लॉक डाऊनच्या काळात मी खूप लेख लिहिले तेही प्रथमच. या लेखातून मला अनेक देशातील आजची परिस्थिती, परिणाम मांडता आले. त्यामुळे आपले दुःख कुरवाळत बसण्यापेक्षा समोरच्या लोकांचं दुःख किती मोठं आहे हे त्यातून शिकत गेले अन् माझे विचार मी मांडत गेले. जे आत होतं ते व्यक्त लेखनातून होतं गेलं. हे सगळं लॉक डाऊन मुळे शक्य झालं. माझ्याच विचाराच्या कक्षा रुंदावल्या गेल्या. सारं जग स्तब्ध असताना मात्र विचारांचं चक्र चालूच होतं. ते मी माझ्या लेखातून अन् कवितेतून मांडलं आहे. अन् घरातल्या छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणारा मोठा आनंद अनुभवाला मिळाला. अंतरंगात डोकावताना मनाचे धागे सैल होतात अन् ते शब्दातून व्यक्त होतात.

लॉक डाऊन मध्ये मिळालेला वेळ आपल्याशी संवाद साधण्याचा आहे. आत्मपरीक्षण करण्याचा आहे. या काळात निसर्गाशी मुक्त संवाद साधता येतो. पक्ष्यांची किलबिल, सकाळचं कोवळ ऊन या सर्वांचा आनंद घेता येतो. कारण आपल्याला कुठे जायचं नाही कुणी येणार नाही. त्यामुळे आपणच स्वतःला कामात व्यस्त राहण्याचा प्रयत्न करत रहावा लागतो. कोरोना मुळे आलेल्या संकटाला सामोरं जाऊ शकतो ते फक्त आपल्या सहकार्यानेच. या संकटाला आटोक्यात आणण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत. तरी हे संकट दाट होत जात आहे.आपल्या देशात खूप लोकसंख्या असूनही आपण हे संकट आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत अन् यशस्वी होत आहेत. भारतातील अनेक शहरं ग्रीन झोन मध्ये आली आहेत. हे सर्व यश प्रशासनाचे अन् सरकारचे आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel