गाधीवधाच्या दगलीत, गावातील कुळकर्ण्याची आटहि घरं जळली. वाडवडिलानीं बाधलेले कडीपाट वाडे नाहीसे झाले. ब्राह्मणाची कुटुवं उघड्यावर पडली. मग कुणी त्या जळक्या घरांतच पत्र्याचा आडोसा करून राहू लागले. कुणी आपल्या रानात वस्त्या घालून तिथ राहू लागले. कुणी धर्मशाळेत, देवळात बि-हाड टाकली. ब्राह्मणाची अशी दशा दशा झाली तेव्हा लोक म्हणाले, "बामणाची घर उठली. आता असल्या दिवसात पुन्हा पयल्यासारख्या इमारती उभारणं ह्याच्या देवाच्यान होणार न्हाई!" लोकाच हे बोलणं ब्राह्मणानी ऐकल आणि ते ईपेला पेटले. दंगलीचा वणवा विझेपर्यंत त्यानीं दम धरला आणि मग पूर्वीपेक्षा चौपट वाडे धरले ! झाडं तुटूं लागली. वडराच्या सुतक्या दगड फोडताफोडता बोथटल्या. गावचे सुतार, लोहार आणि गवी कामाखाली दुमते झाले. तासलेल्या लाकडाच्या ढलान्या, घडलेल्या दगडाच्या कपन्या याचे गावात जागी ढीग पडले ! कापीव लाकडाच्या सुवासान, घाणीत रगडल्या जाणाऱ्या चुन्याच्या तिखट दोन गाव घमघम् लागला. बामणानी चौमोपी वाडे धरले आणि हा हा म्हणता पुरेहि करीत आणले. लोक म्हणूं लागले, "बामणाची जात निवडुगासारखी-माळावर टाकलं तरी उगवायची !' गावांत अशी धमाल उडाली. नवीन नवीन इमारती उठू लागल्या. तेव्हा सोन्या साळ्यास इसाळ आला. आपल वडिलार्जित पडकं घर आतबाहेरून न्याहाळीत तो बायकोला बोलला, केरे, बामणानी वाडं धरलं. आपण माडी बाधू या दोनमजली !" "

१२  " केरीला नवऱ्याच्या ईर्षेचं कौतुक वाटलं. गांवातल्या इतर कुणाहि पुरुषापेक्षा केरीचा नवरा सरस होता. सोलापूरसारख्या शहरगावी राहून तो मोटा ज्ञानी झाला होता. गणा चलपत्यालाहि तो उजवा झाला असता. पण गणानं मुशाफिरी करून बक्कळ पैसा मिळविला आणि तो साठवला. सोन्यानं जे मिळवलं तें मटणमुर्गीत खर्च केल ! खंक होऊन तो माघारी आला आणि जमिनीचं एक तुकडं विकून त्यावर जगू लागला. दावणीची एक गाय मोडून त्यानं गणा चलपत्याप्रमाणं अंगचा दिवा असलेली सायकल आणि चार सेलवाली हातबत्तीहि घेतली होती. पिवळा हत्तीशिवाय तो काही ओढीत नसे. डोईवर जरीकाठी फेटा, अंगात मल्मली सदरा, त्याला चादीची बटणं, हातात घड्याळ आणि पायांत काळे बूट. तो गावांत टेशींत फिरे. भेटेल त्याला सिगारेट देई. कुणी म्हणे, कशाला आमाला ही पदवी सोन्या ? आपली तंबाखू आन् चिलिम दे !" तर हा झ्याकीत उत्तर देई, " अरं ओढ. जोपतूर हा सोन्या आहे तोपतूर सिगारेटशिवाय ओढूं नकोस ! मला गड्या एकट्याला ओढू वाटत नाही. संगत पायजे! सोलापूरला होतो तेव्हा दारू प्यायला एकटा कधीच गेलों न्हाई. सोबत नेहमी चारदोन दोस्त मंडळी. हां !" बाजागला गेला म्हणजे सोन्या रंगी धनगरिणीच्या हॉटेलात बसे. गांवच्या ओढ्याला लागून तट्टे, पत्रे आणि बाबू याच्या साहाय्यानं तयार केलेलं हे हॉटेल कचऱ्याच्या ढिगासारख दिसे. धुरकटलेल्या टेबलाशी रंगी वाणीण बसलेली असे. जाग्रणाजाग्रणानं पिवळी झालेली, चोपलेली ही बाई लाक- डाच्या ढलपीसारखी होती. तिचा मागचा भाग आणि छाती अगदी सपाट होती. विड्या ओढत आणि फाजील बोलत ती गल्ल्यावर बसे. तिची आणि सोन्याची चागली घसट होती. पाचपंचवीस रुपये उधारी करण्याइतकी पत होती. बाजारच्या दिवशी तो मुद्दाम बाईपाशी बोलत बसे. बाजाराला आलेले गावकरी त्याला बघत आणि एकमेकांत कुजबुजत, " सोन्या हाटेलवालीशी लागून आहे. " आणि ही कुजबुज कानी आली म्हणजे सोन्याला विलक्षण आनंद होई. हांका मारमारून तो गांवकऱ्यांना बोलावून घेई. बेसन लाडू,

माडी विकले आहे. शेवचिवडा, स्पेशल चहा असले अपूर्वाईचे जिन्नस त्याना खाऊ घाली.आणि मग गांवातले लोक सोन्याविषयी फार चागल बोलत. त्याच्यासारखा अगत्यशील, उदार माणूस या पिढीत नाही असं म्हणत ! माडी बांधायची म्हणजे पैसा पाहिजे. तो आणावा कसा ? पण ही चिंता

सोन्याला पडण्यासारखी नव्हती. शेवटचं जमिनीचं तुकडं त्यानं विकायला काढलं. नाल्या नेवरासारखी जनलोक काय म्हणतील याची पर्वा करणारा तो नव्हता. नुसत्या जमिनीवर पोट भरणारा अमला तर त्यान ही चिंता करावी. सोन्याला गिरणींतल्या कामाची माहिती होती. गावाबाहेर पडला तर पोटापुरतं कमावण्याची त्याची ताकत होती. त्यानं जमीन विकली ! केरी कुरकुरूं लागली तशी तिची समजूत घातली, " केरे, अग आपल्याला काळजी नाही. तुजं माझं पोट भरण्याइतकी विद्या माझ्यापाशी हाय. चार वर्ष सोलापूरला काढली तर असल्या आट घेईन तू डरतीस का ? आपल्या पोटात पोरबाळ न्हाई. काळजी कुनासाठी करायची ?" केरी म्हणाली, व्हय. पर जिमिन इकून घर बाधायला इकत कुटं त्यावाचून अडलया ? आपन काय रानावनात पडलोया का ? पडकं सडक का असना, पर घर हाय न्हवं? हाय खर, पर माझी आपली हौस हाय्. बामणानी वाड धरल गावांत आन् आपण गप्प बसण खर का ? माझी आपली इर्षा हाय. तूं आड नको येऊस ! गावात न्हाई असली फसकलास बगली उठवतो. बामणानी नुसत टकाटका बघत रहाव ! बायकोची अशी समजूत घालन सोन्यानं जमीन विकली आणि पैशाची पिशवी आणून घगत ठेवली. मग पटक्याला रोज एक वेगळा रग देऊन तो गांवात हिंडूं लागला. भेटलेल्याला सांगू लागला, " माडी उठवतो ! पयलं घर पडाय आलय. गांवात सावली पायजे. हतं कोन हातया खेड्यात खरं, मी जाणार सोलापूरलाच, पर गावांत घर पायजे. घ्या शिग्रेट, ओढा, पिवळा हात्ती हाय !" गांवाला सोन्याची ईर्षा आवडली. बामणांना शह देण्याची त्याची ईर्षा खरो- खरीच वावगी नव्हती. त्यांनी वाडे धरले तर सोन्या दोनमजली माडी बांधा- यला निघाला. शाब्बास बहाद्दर ! मग सोन्या वडराकडे गेला. बोलला, "

"वडरा, दगडं पाड. मी माडी धरलीया !" बामणांच्या वाड्यांचे दगड पाडतां पाडता वडर जिकिरीला आलं होतं. तें म्हणालं, "नाय् रे पाटला. आता माज्या देवाच्यान् व्हनार न्हाई. बामनांची कामं व्हऊदेत, मंग तुज बगंन !" पण सोन्यानं ऐकलं नाही. चारपाच रुपये टाकून कोंबडी आणली आणि केरीकडून झकास बनवली. सध्याकाळी वडराला घरी बोलावून चारली. चपात्या आणि कोबडी खाऊन वडर टम् फुगल तेव्हा त्याला गळ घातली, "वडरा, दगड पाड. बामणानी दिलं त्यापरिस चार रुपयं आगाव घे, पर दगडं पाड!" वडरानं आणखी थोडे आढेवेढे घेतले आणि मूळ दामापेक्षा दीडपट रक्कम कबूल करून सौदा पटला. लगोलग सोन्यानं पंचवीसभर रुपये विसार त्याला देऊन टाकला. वडर कामाला लागल्यावर सोन्या इमारतीच्या कामासाटी बाभळीलिंबाची झाडं शोधीत सगळे मळेखळे हिंडला. पण बामणाच्या आट वाड्यानी बहुत झाडं खाल्ली होती. सोन्याच्या वाट्याला झाड राहिलं नव्हत. मग सायकलीवर टाग टाकून तो आसपासच्या वाड्या हिंडला. सायकलीवर आलेला, रंगीत पटका बांधलेला आणि हातात घड्याळ असलेला हा माणूस बघितल्यावर झाडाच्या मालकानीं दर वाढवले. सोन्यानं ते घासाघीस न करता दिले. रोजगारी लावून झाड तोडली आणि भाड्याच्या गाड्या करून गावी आणली. ईर्षेनंच सगळं करायच म्हटल्यावर काय ? गांवातले सुतार गुतले होते तेव्हा त्यानं जबर दाम देऊन तालुक्याचे सुतार बोलावले. गवंडी दगड घडू लागले. सुतार लाकडं कापूं लागले. सोन्याची माडी बाधली जाऊ लागली. महिना गेला. दोन महिने गेले. सहा महिने गेले. माडी पुरी झाली नाही. गवंडी, सुतार, वडर सगळ्यानींच नाशिकच्या न्हाव्याप्रमाण केलं ! चार दगडं काढल्यासारखी करून वडर नाहीसा झाला. चार फाडी घडल्यासारख्या करून गवंडी दुसऱ्या कामाला लागला. चार लाकडं तासल्यासारखी केली आणि

१६ " 6 " सुतारहि परागंदा झाला. सगळ्यांनी कामाचे आगाऊ पैसे मात्र सोन्याकडून खुबीने वसूल करून घेतले होते. आणि मोठेपणाच्या झ्याकीत येड्या सोन्यानं ते दिले होते! दर दोन दिसांनी सुतार यायचा आणि काकुळती येऊन बोलायचा, मालक, घरात आन्न न्हाई. पैशे थोडं द्याल तर उपकार व्हत्याल !" लेका, काम अजून रुपायातलं चार आणे झाल न्हाई आन् पैशे तेवढं सगळं मागता का ?' "कामाची तुमाला का काळजी ? बघा तर, चार दिसात सगळं हाणतो!" मग सोन्या पाघळायचा आणि पैसे काढून द्यायचा. ते कनवटीला लावून सुतार परागंदा व्हायचा. गवंड्यानं नऊ कामं एकाच वेळी घेतलेली. सोन्यानं फार शिव्या दिल्या म्हणजे तो यायचा, एखादा थर चढवायचा आणि नाहीसा व्हायचा. सोन्याला झीट आली ! फळ्या पाड रे, खिळेमोळे आण रे, दगडं घड रे, नाना व्याप ! गवंड्याच्या मनांतून काम करायचं नसेल तर तो एखादा तळखडा, एखादी कोपरी घडतांना हातोडीचा ठोका असा हाणायचा की दगड फुटावा. मग त्याविना काम अडे. पुन्हा वडर, पुन्हा दगडाची खाण, ती आणायला गाड्या ! अशा झिंबड्या मारता मारता जवळची रक्कम केव्हांच उठून गेली. दावणीची दुसरी गाय गेली. केरीच्या अंगावरचे डाग आणि स्वतःच्या हातातली अंगठी गेली, तरीहि माडी पुरी झाली नाही ! पण सोन्या पक्का जिद्दीला पेटला होता. ईर्षेला पडला होता. त्यानं पुन्हा हजार बाराशे कर्ज काढलं, दुसरे गवंडी आणि सुतार लावले आणि स्वतः देखरेख करून माडी पुरी केली ! अखेर सोन्याची माडी उठली ! • वास्तुशांति झाली. केरीला घेऊन सोन्या नव्या माडींत राहूं लागला. आल्यागेल्याला बोलावून सिगारेट, विडीकाडी देऊ लागला. माडीवर बसून सारं गाव बघू लागला ! महिना पंधरा दिवस झाल्यावर सोन्या उठला आणि गबा वाणिणीच्या दुकानीं गेला. शाईची पुडी, बोरू, कोरा कागद घेऊन बसला. आणि जाड, ढोबळ अक्षरांत लिहिलेली पाटी त्यानं नव्या माडीवर लावून टाकली. .

१७ " 'माडी विकने आहे !' ही पाटी गणा चलपत्यानं वाचली आणि साऱ्या गावांत बभ्रा झाला. लोक विचारू लागले, "लेका सोन्या, घर रे कशापायी इकतोस ?' सोन्या बोलला, "तें बाधण्यापायी झालेल कर्ज कशानं बरं फेडूं? माडी विकतो आणि लोकाचं देणं भागवतो. मोकळा होतो! "गाढवीच्या, मग बाधलीस कशापायीं इकता आटापिटा करून ?" 'हौसला मोल न्हाई ! आन् जरी ही माडी कुणी इकत घेतली तरी तुम्ही तिला म्हणाल कुणाची ? सोन्या साळ्याची माडी म्हणूनच वळखाल न्हव ? मग ? पिढ्यान् पिढ्या माझं नाव राहील का न्हाई गावात ?"

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel