जून महिन्यातल्या ओल्या सकाळी गांवांत एक भला मोठा वानर आला. एकटाच. त्याचा गोतावळा त्याच्या मागं नव्हता. आमच्या भागात हा प्राणी अगदीच विरळा. त्यामुळंच सर्वाच्या कौतुकाचा, आदराचा. जवळ जवळ दहा बारा वर्षांनी तो गांवांत दिसला. कुठून आला आणि कसा आला कोण जाणे! पण आला तो शेपटीची चवरी मिरवीत गावमारुतीच्या देवळात शिरला. गाभाऱ्यांत गेला आणि घटकाभरानं बाहेर येऊन शिखरावर बसला. लाब शेपटी हलवीत उनाला बसला. हा विलक्षण प्रकार पांडू गुरवाच्या बायकोन बघितला, आणि पोरगी काखेला मारून ती बाहेर पडली. घोडं चारायला रानात गेलेल्या नवऱ्याला ही हकिगत सागणं अगदी जरूर होतं. कारण मारुती गावात आला होता. देवळात जाऊन आला होता! देवळाजवळ असलेल्या शाळेत येण्यासाठी गांवांतली गुलाम पोरं पाटीदप्तर हलवीत आली आणि शाळेच्या पायरीवर येऊन बसली. कारण शाळा अद्याप उघडलीच नव्हती. मास्तराचा चहा अद्याप व्हायचा होता. तारेवर चिमण्या बसाव्यात तशी ती पोर पायरीवर दाटीवाटीनं बसली आणि आपल्या मिचमिच्या डोळ्यानों नव्या सूर्याचा चमकदार प्रकाश बघू लागली तेव्हां मारुतीच्या शिखरावर बसलेला तो नवखा प्राणी त्यानी पाहिला. आनंद, आश्चर्य आणि भीति यामुळे त्याची मनं उडूं लागली. मग मुसलमानाचं धीट पोर पुढं झालं आणि आपलं नकटं नाक खाजवीत ओरडलं, अरं, वांडर वांडर हुप् तुझ्या शेंडीला शेरभर तुप !"
४० 2 त्याची री सर्वांनीच ओढली. तेव्हां वानर आपलं काळं तोंड विचकून पोरांना भिवडवू लागला. जागच्याजागी नाचूं लागला मग मुसलमानाच्या पोरानं धोंडा उचलला आणि नेमानं त्याच्या पाठींत बकावला. त्यासरशी वानर हातभर उडाला. वेदनेनं कळवळला. ची ची ओर- डत पळाला आणि पिंपळाच्या शेंड्यावर जाऊन पानात दडला. पोरं खाली जमा झाली तेव्हा त्याना दम देऊ लागला. त्यामुळं पोरं जास्तीच चेवली आणि भराभर धोंडे फेकू लागली. पण वानर फार उंच होता. धोंड्याची फेक त्याच्यापर्यंत पोचेचना. हे त्या धूर्त प्राण्याच्या ध्याना माल. पिंपळाची कोवळी पानं खात तो आरामात बसला. दरम्यान ही बातमी पांडू गुरवाला मिळाली होती. तो घाईघाईनं घरीं आला आणि टोपल्यातली कोरभर भाकरी घेऊन पिंपळाखाली गेला. धपाटे घालून त्यानं पोरं हुसकून लावली. आरडाओरडा केला. " कुठं फेडाल रं हे पाप ? बागघरची बारा जमून आलाया आन् मारत- रायाला धोंडं घालत बसला. त्यानं काय केलय् रं तुमच ?" गुरवानं धुडकावली तेव्हा ती चाबट पोर गुरवाला शिव्या घालीत आणि त्याची उंडग्या बायकाशी असलेली लफडी मोठमोठ्यानं उच्चारीत पळाली. हातातला भाकरीचा तुकडा वर करून पाडू वानराला बोलावू लागला, या या हनुमंता, हे घ्या !" पण वानर पालेच खात बसला. त्यान गुरवाकडे बघितलं नाही. रानांत जातां जातां ही मजा बघत उभे राहिलेल्या म्हाताऱ्या आबानानानी गुरवाला वेड्यात काढलं. हनुवटीला झोले देत म्हटलं, "लेका पांड्या, आज वार कोणता ?" सनवार, नाना !" मग भाकरी कशी घेणार रं तो मारुतराया मग?" "अरं फराळाबिराळाचं काय आण, गाढवा ! नाना वारकरी होते. मोठे भाविक होते. गांवांतली चार मंडळी जमवून ते " " " " "
भजन करीत. भजनाचा, टाळ, मृदंग इत्यादि सारा सराजम त्यांच्या घरी होता. रामजन्म, मारुतिजन्म, असले समारंभ ते मोठ्या हौसेनं करीत. म्हाता- न्याच्या शब्दाला गावांत चागला मान होता ! नानांचं हे बोलणं गुरवाला पटल. धादलीनं घरी जाऊन तो मूठभर शेंगदाणे घेऊन आला. ते दाखवून वानराला विनवू लागला,
४२ " देवा या, हे घ्या. देवा , खाली उतरा !" पण वानर नुसताच डोकावून खाली पाही. पाढऱ्या पापण्याची चमत्कारिक उघडझाप करी. आपल्या काळ्या, लाबसडक बोटानी काखेत खाजवी आणि कोवळा पाला ओरबाडून खाई. वानर बधेना तेव्हा गुरव नानाना बोलला, "नाना, माझ्या पायाच्या हातचा फराळ घेणं त्याला पसंत नाही. तुम्ही बघा. तेव्हा नाना पुढं झाले आणि शेंगदाणे हाती घेऊन विनवू लागले, "देवा, मी तुमचा दासानुदास आहे, माझा निवद्य घ्या. म्हाताऱ्याची सत्त्वपरीक्षा घेऊं नका!" नानानी नाना परीनं विनवलं, पोथीत ऐकलेल्या सबोधनानी हाका घातल्या, तेव्हां वानर खाली उतरूं लागला. आतापर्यंत बरेच गांवकरी गोळा झाले होते. मारुती खाली उतरूं लागला तशी त्यांची मनं अधीर झाली. वानर बुंध्याशी आला. पिंपळाच्या बेचक्यात बसला. नाना जवळ गेले. आणि त्यांनी हात वर केला. वानर पुढं वाकला. नानांशी भिडला. आपल्या काळ्या पंजांनी त्यानं म्हाताऱ्याचा हात धरला. गमतीदारपणं इकडेतिकडे बघितलं. नाना म्हणाले, घ्या. घ्या आता अनमान का?" मग एकाएकी वानरानं तोंड पुढं केलं आणि मकेचं कणीस दातरावं तसा नानांचा हात दातरला. काडरला. आणि शेपुट उडवीत तो पुन्हा झाडाच्या शेड्याशी गेला. त्या चाव्यानं नाना कळवळले. झीट येऊन खाली बसले ! लोक धावले. म्हातान्याला आल्हाद उचलून आणून त्यांनी घरांत झोपवलं. आणि हातावर गांवठी उपचार केले. बापाचा हात फोडलेला बघतांच थोरला पोरगा कळव- ळला. पेरणीच्या कामी म्हातारा निकामी झाला. आता रोजगारी गडी बघणं आलं या विचारानं फार हळहळला.
मग गावातले लोक कुजबुजले की, नानाचा आपल्या सुनेशी संबंध आहे हे खरं असलं पाहिजे. त्याशिवाय वानरानं त्याना फोडलं नसतं ! आणि त्यानंतर मारुतीला शेंगदाणे द्यायला कुणीच तयार होईना. कुणीच धजेना. विषाची परीक्षा बघा कुणी ? पण गावात आलेला देव उपाशी ठेवावा कसा ? गुरवाच्या मनाला ही गोष्ट पटली नाही. आपल्या आठ वर्षाच्या मुलीला शेंगदाणे देऊन तो वानराला म्हणाला, " देवा, हे लेकरु अस्राप हाय. ह्याच्या हातच तरी घ्या ! " ती अजाण पोर हातात शेंगदाणे घेऊन उभी राहिली तेव्हा वानर पुन्हा खाली आला आणि पोरीची पोटरी फोडून गेला ! सोनाराच्या लिंबावर जाऊन बसला. गुरवाच्या बायकोन उर बडवून घेतल. आणि वानराच्या नावानं बोटं मोडली. तालुक्याच्या दवाखान्यात दाखवण्यासाठी पोर पाठीशी टाकून गुरव निघून गेला. यावर लोक कुजबुजले, गुरवाची आणि त्याच्या बायकोचीहि चालचालवणूक बरी नाही त्यामुळं असं झालं." वानर कुणाच्याच हातच खाईना तेव्हा सर्वाना मोठी पचाईत पडली. पानाच्या चंच्या सोडून, घोळक्याघोळक्यान उभ राहिल्याराहिल्या त्याच्या चर्चा चालू झाल्या. दरम्यान सोनाराच्या लिबावरून वानर लव्हाराच्या जांभळीवर गेला. तेव्हा खाली बघून मुकाट मोट टोकणारा लव्हार, तोंडातला तंबाखूचा गुळणा टाकून उटला आणि पोराला पाजत असलेल्या बायकोला म्हणाला, " थोड्या शेंगा दे ग. वानर आलाय आपल्या दारात ! " " येडं का काय तुमी ? मरू दे त्यो वानर. आपलं काम बघा. अग, दारात आलाया आपणहून. त्याला काय तरी दिल पाहिजेल ! " बायकोची वाट न बघतां बयत्याच्या आलेल्या शेंगातल्या ओंजळभर काढून तो बाहेर आला आणि वानगला दाखवून बोलावू लागला. आजुबाजूस कुणी नाही हे पाहून वानर खाली आला आणि लव्हाराचं तंगड चावलून धूम
पळाला. गावांतला एकुलता एक लव्हार जायबंदी झाला. आतां शेतकीची अवजारं बनविणार कोण ? त्या लठ्या वानरानं सकाळपासून तिसरा प्रहरपर्यंत असा धुमाकूळ घातला. पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणं ते दिसेल त्या माणसावर दात चालवू लागलं. तेव्हां नानांचा थोरला पोरगा अधिक खवळला. बचकेसारखे धोंडे हाती घेऊन जाभळीखाली आला. रागानं वानराला म्हणाला, राया, तू फार डाळ नासलीस! !" आणि नेम धरून त्यान धोंडा भिर्कावला. हिकमतीनं एका अंगाला होऊन वानरान तो चुकवला आणि दात विचकीत तो नानांच्या मोठ्या मुलावर धावून आला. दुसरा धोडा उचलून पोरगाहि हुषार राहिला. तेव्हा वानर चारी पायावर अल्हाद उड्या घेत आण्णा जरगाच्या मळ्यात घुसला. हातात धोंडा घेऊन नानाचा पोरगा त्याच्यामागं काळासारखा लागला. त्याचा आवेश बघून गावातली आणखी काही तरणींबाड पोर त्याच्याबरोबर धावली. काठ्या, धोडे घेऊन धावली. दोन चार मैल ताणपट्टा काढल्यावर वानर थकला. अंगावर आलेले धोंडे चुकविण्यात त्याच्याकडून कुचराई होऊ लागली आणि मग दहा बारा धोंड्यांत तो खाली पडला. पडला तसा पोरांनी गराडा घालून त्याला मधे घेतला. आता आपण वाचत नाही हे जाणून तो शहाणा प्राणी केविलवाणे हातवारे करून आपल्याभोवतीच फिरू लागला. तेव्हा वाण्याचा सदा हात आवरून नानाच्या पोराला म्हणाला, अर अर, तो हात जोडतोय. पाया पडतोय. मला मारु नका म्हणतोय् .' पण नानाच्या पोराला क्रोध आवरला नाही. आवेशानं पुढं होऊन त्यानं वानराला काठ्या घातल्या. बाकीच्या पोरानी निर्दयपणे त्याला धोंडळला. नाका- तोडाला रक्ताचे बुडबुडे येऊन, हातपाय झाडून वानर मेला. निचेष्ट पडला. तेव्हां त्याचे दोन्ही पजे एकमेकांत गुतले होते, आणि केसांचं शिप्तर अस- लेलं त्याचं डोकं मातीत भरलं होतं. ती त्याची दशा बघून नानाच्या पोराला कणव आली. "
" तो विचार करून बोलला, 'पोरानूं , एकजण हतं रहा. आमी जाऊन टाळमृदंग घेऊन येतो. मारु- तीला वाजत गाजत माती देऊ!" त्याचा आवाज विलक्षण मऊ आला होता. मेल्या वानराकडे दयाळूपणानं बघून सदा बोलला, "गरीब आपल्या हातनं मेला. वाईट गोष्ट झाली! मग सर्वांच्या सांगण्यावरून तो गिधाडं वारायला तिथं राहिला आणि पोर गांवांत आली. वानर मारल्याची हकीगत लोकाना कळली, तेव्हा त्यानी हात जोडले आणि गावात घडलेल्या या अपराधाबद्दल क्षमा कर, अशी मारुतीला विनवणी केली. भजनी मंडळीसहित पोरं रानांत गेली. रामनामाचा गजर करीत त्यानी मोठ्या मानसन्मानानं वानराला ओढ्यात आणला आणि माणमासारखा जाळला ! नानाच्या जिवाला ही गोष्ट फार लागली. दुखण्यातून बरे झाल्यावर त्यानी ज्या जागी वानर मारला त्या जागी एक दगडी चौथरा बाधला. आतां भाविक लोक जाता येता त्याच्या पाया पडतात!