अनंत कल्याण गुणैकसिंधो ॥
विनायकाधीश्वर सुप्रसिद्ध ।
हेरंब लंबोदर मां प्रसीद ॥१॥
हेरंब लंबोदर भालचंद्रा ।
विनायका तूं गुणरत्नसांद्रा ।
श्रीमध्वनाथा करुणासमुद्रा ।
शोभे तुझी मंगलरूपमुद्रा ॥ २॥
भोगूर गोवर्धन नासिकी हो ।
या त्रिस्थळीमाजि निदासकी हो ॥
घेऊनियां अंकुश पाश कीहो ।
करीतसे संकट नाश कीहो ॥३॥
गोदावरीच्या तटिं दिव्य हस्ती ।
गोवर्धनीं नांदत पद्महस्ती॥
जो वंदीला देवगणी समस्तीं ।
तो पूजीला म्यां कमळी प्रशस्तीं ॥ ४ ॥
विनायकें आणुनि स्वस्थळासी ।
तोडूनियां संशयशृंखलासी ॥
पाजूनियां गौतमिच्या जळासी ।
दिले मला चिन्मय त्या फळासी ॥५॥
तपोवना- च्या अति संनिधी हो ।
भोगूरिचा देव दयानिधी हो॥
जो दुष्ट दैत्यांस बळे वधी हो ।
दासा न दे अंतर तो कधीं हो ॥६॥
तपोवनी नांदत रेणुका हे ।
जे भक्तवत्साप्रति धेनुकाहे ।
ते शारदा शांभवि अंबिका हे।
प्रसन्न जाली कवि त्रिंबका हे ॥७॥